कष्टाचे पैसे व दागिने चोरी करुन हैदराबाद येथे निघालेल्या चोरास अवघ्या काही तासांतच खडक पोलीसांनी केले अटक .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

२,००,०००/- रुपये रोख रक्कम व १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिणे असे एकुण २,५०,३००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त

पुणे, दि.10 ऑक्टोबर.

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

लोहिया नगर गंजपेठ येथे लग्नासाठी कष्टाने पै पै करून जमविलेल्या अडीच लाख रुपयांवर (२,५०,००० / रु ) फरार होण्याच्या प्रयात्नात असलेल्या चोरास खडक पोलीसांनी मोठ्या शिफातीने अटक केली आहे.

सदर बाबत अधिक माहिती अशी की, दिनांक ०८/१०/२०२२ रोजी सायंकाळी १७/०० वा.ते १७/४५ वा. चे दरम्यान ५४ एफपी १८० लोहीयानगर गंजपेठ पुणे येथे आरोपी

नामे मोहम्मद तमीम कलीमउद्दीन चौधरी वय १८ वर्षे, सध्या राहणार-अंजुमन मस्जिद समोर लोडीयानगर पुणे मुळ राहणार वल्लभभाई पटेल नगर, रोडा मिस्त्री नगर, जिल्हा-रंगारेड्डी, राज्य हैदराबाद

याने फिर्यादी आरिफ रौफ शेख यांचे राहत्या घराचा दरवाजाची कडी उघडुन दरवाजावाटे आत प्रवेश करून फिर्यादीचे २,००,०००/- रुपये रोख रक्कम व १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिणे असे एकुण २,५०,३००/- रुपये किमतीचा माल चोरी करून नेल्याने फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन खडक पोलीस ठाणे, पुणे गुन्हा रजि. क्र.३०२/२०२२ भा.दं.वि. कलम ३०० प्रमाणे गुन्हा नोंद आहे.

वरीलप्रमाणे गुन्हा दाखल झाल्यानंतर श्रीमती संगीता यादव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक खडक पोलीस स्टेशन पुणे व श्री. राजेश तटकरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), खडक पोलीस स्टेशन पुणे यांनी तात्काळ दोन तपास पथके तयार करून आरोपी मोहम्मद तमीम कलीमउददीन चौधरी यास पकडणेकामी तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना योग्य त्या सूचना देवून मार्गदर्शन करुन तपास पथके रवाना केली. त्याप्रमाणे आरोपी मोहम्मद तमीम कलीमउददीन चौधरी याचा शोध चालू असताना पोलीस अंमलदार संदीप तळेकर व विशाल जायय, सागर घाडगे यांना त्यांचे बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, आरोपी मोहम्मद तमीम कलीमउददीन चौधरी हा इनामके मळा लोहीयानगर गंजपेठ पुणे या ठिकाणी आलेला आहे.

सदर बातमीचे ठिकाणी तपास पथकाचे अधिकारी श्री. राकेश जाधव व त्यांचे पथकातील अंमलदार हे गेले असता तेथे आरोपी मोहम्मद तमीम कलीमउददीन चौधरी यास शिताफीने पकडण्यात आले.सदर आरोपी मोहम्मद तमीम कलीमउददीन चौधरी यास गुन्हयामध्ये दिनांक ०९/१०/२०२२ रोजी १७.३० वा. अटक करण्यात आली असून, त्याचेकडुन गुन्हयातील चोरीस गेलेले २,००,०००/- रुपये रोख रक्कम व १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिणे असे एकुण २,५०,३००/- रुपये किंमतीचा माल जप्त करण्यात आलेला आहे.

नमुद कारवाई श्री. अमिताभ गुप्ता पोलीस आयुक्त, श्री. राजेंद्र डहाळे, अपर पोलीस आयुक्त पश्चिम १. प्रादेशिक विभाग पुणे, डॉ. प्रियंका नारनवरे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ १ पुणे व श्री. सतिश गोवेकर, सहा पोलीस आयुक्त फरासखाना विभाग यांचे मार्गदर्शनाखाली खडक पोलीस स्टेशनचे श्रीमती संगीता यादव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. राजेश तटकरे पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. राकेश जाधव सहा. पोलीस निरीक्षक, श्री. अतुल बनकर, पोलीस उप निरीक्षक व पोलीस अंमलदार अजीज बेग, संदीप तळेकर, विशाल जाधव, सागर घाडगे, लखन ढावरे, राहुल शिंगे, मंगेश गायकवाड, रफिक नदाफ, अक्षयकुमार चाबळे, नितीन जाधव, महेश पवार, महेश जाधव, समीर शेख यांचे पथकाने केली आहे.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *