संगीत विशारद युवकाकडून वाहनचोरीचे चार गुन्हे उघडकीस.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

दरोडा व वाहनचोरी विरोधी पथका ने केली संगीत विशारद युवकाकडून वाहनचोरीचे चार गुन्हे उघडकीस.

दरोडा व वाहनचोरी विरोधी पथका ची कामगिरी वाहन चोरी करणारे आरोपीला केली अटक.

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

संगीत विशारद युवकाकडून वाहनचोरीचे चार गुन्हे उघडकीस
दि.२६/०९/२०२२रोजी दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाकडील अंमलदार हे हडपसर, वानवडी पोलीस स्टेशन हद्दीत वाहनचोरी विरोधी पेट्रोलिंग करत असताना.


पोलीस अंमलदार शिवाजी जाधव आणि मनोज खरपुडे यांना त्यांचे बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की,हडपसर येथे एक संशयित इसम हा एका नंबर नसलेले दुचाकीसह थांबला आहे अशी खात्रीशीर बातमी मिळालेने सदर ठिकाणी स्टाफ च्या मदतीने सदर इसमास गाडीसह जागीच ताब्यात घेऊन त्यास त्याचे नावे पत्ता विचारता त्याने आपले नाव 1) गुरुप्रसाद बाबासाहेब वाळुंज वय २२ रा.गल्ली नं३, गणपती मंदिराशेजारी,काळेपडळ, पुणे असे सांगितले.सदर दुचाकीबाबत त्याचेकडे विचारणा केली असता त्याने सदर दुचाकी ही आपण चोरी केली असल्याचे सांगितले, त्यास आणखी विश्वासात घेऊन तपास केला असता त्याने आणखी ३ वाहने चोरी केली असल्याचे सांगितले. नमूद इसम हा संगीत क्षेत्रात पारंगत आहे परंतु झटपट पैसे कमावण्यासाठी त्याने वाहनचोरी केली असल्याचे कबूल केले.


नमूद इसमाचे ताब्यातून एकूण १,३०,०००/- ची ४वाहने जप्त करणेत आली असून खालील प्रमाणे गुन्हे उघड झाले आहेत:-


१) बंडगार्डन पो स्टे गु र २) येरवडा पो स्टे गु र ३) दिघी पो स्टे गु र
४) चाकण पो स्टे गु र प्रमाणे दाखल असून आरोपीस करून पुढील कारवाई कामी बंडगार्डन पोलीस स्टेशन चे ताब्यात देण्यात आले आहे


सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री.रामनाथ पोकळे , मा.पोलीस उप-आयुक्त गुन्हे श्री. श्रीनिवास घाडगे सो, मा.सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री. नारायण शिरगावकर सो, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल पंधरकर, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार दिनकर लोखंडे, शिवाजी जाधव, मनोज खरपुडे, सुदेश सपकाळ, राहुल इंगळे यांनी केली आहे.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *