Breaking NewsCrime NewsPolice News

खडक पोलिसांनी केले सराईत वाहनचोरास जेरबंद,७ दुचाकी जप्त,apcs.in


ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

खडक पोलीस स्टेशनची कामगिरी सराईत वाहनचोराकडून यामाहा एफझेड, होंन्डा स्प्लेंडर, होंडा पॅशन, टीव्हीएस विक्टर अशा एकूण ०७ मोटार सायकल जप्त करण्यात खडक पोलीसांना यश.

सदर बाबत अधिक माहिती अशी की, खडक पोलीस स्टेशन चे हद्दीत वाढते वाहन चोरीचे गुन्हयांना आळा घालण्याचे दृष्टीकोनातुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र गायकवाड व पोलीस निरीक्षक श्री संपतराव राऊत यांनी खडक पोलीस स्टेशन पुणे यांनी तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना सुचना दिल्या,

पुणे शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत आहेत. त्यापार्श्वभूमीवर वाहन चोरांचा शोध घेण्यासाठी खडक पोलीस ठाण्यातील तपास पथक पेट्रोलींग करत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार हर्षल दुडम, प्रमोद भोसले व अक्षयकुमार वाबळे यांना माहिती मिळाली की, राष्ट्रभुषण चौकातून बजाज पल्सर (MH 12 GH 9178) चोरणारा रविवार पेठेतील भांडे आळी येथे थांबला आहे.पोलिसांच्या पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या पल्सर बाबत चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता राष्ट्रभुषण चौकातील एका केकच्या दुकानासमोरुन दुचाकी चोरल्याची कबुली दिली.

पुणे शहरात महागड्या दुचाकी चोरणाऱ्या परराज्यातील सराईत गुन्हेगाराला खडक पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून 2 लाख 35 हजार रुपये किमतीच्या यामाहा एफझेड, होंडा स्प्लेंडर, पॅशन, अशा महागड्या सात दुचाकी जप्त केल्या आहेत. ही कारवाई भांडे आळी रविवार पेठ येथे करण्यात आली.गोवर्धनप्रसाद ललवा साहु (वय-35 रा.किष्कींदानगर, पौड रोड, कोथरुड मुळ रा. भोडसा, पोस्ट कौडीया ता. चदिया जि. उमरीया मध्य प्रदेश) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.अधिक तपासात त्याच्याकडून सात दुचाकी जप्त करुन खडक पोलीस ठाण्यातील दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत. तर इतर गुन्हे उघड करण्याचे काम सुरु आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त प्रविण पवार, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविण पाटील, पोलीस उपायुक्त संदिप सिंह गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र गायकवाड, पोलीस निरीक्षक गुन्हे संपतराव राऊत, पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद डोंगळे, अजीज बेग, पोलीस अंमलदार हर्षल दुडम, किरण ठवरे, संदीप तळेकर, प्रमोद भोसले, अक्षयकुमार वाबळे, आशिष चव्हाण, इरफान नदाफ, लखन ढावरे, रफिक नदाफ, प्रशांत बडदे, सागर कुडले, नितीन जाधव, तुळशीराम टेंभुर्णे, महेश जाधव यांच्या पथकाने केली.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे व्हाट्सअप ग्रुप वर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..

https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

संपादक :मुख्य संपादक वाजिद एस खान.

(APCS NEWS) बातमी महाराष्ट्राची आपल्या राज्यातील ताज्या घडामोडींसाठी ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. युट्युब चॅनेलला Like, Subscribe आणि Share करा.
https://youtube.com/@acspolicecrimesquadnews7356?si=u-F8fbHvqL3-QPQh

https://www.instagram.com/acs_police_crime_squad?utm_source=qr&igsh=MWZsYXlrcWttbHZ4ag==

संपर्क : 9822331526

वेबसाईट : apcs.in


wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *