हडपसर तपासपथकाने १७ तोळे सोने ८०० ग्रॅम चांदी१२ लाखांचा मुद्देमाल केला जप्त .
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
दिनांक – ०८/०८/२०२२ हडपसर पोलीस स्टेशन , पुणे शहर
४ घरफोड्या / चोरीचे गुन्हे उघडकीस . १७ तोळे सोने ८०० ग्रॅम चांदी आणि आरोपींनी वापरलेली सँन्ट्रो कार जप्त हडपसर पोलीस ठाणे गु.र.नं ७९१/२०२२ भा.दं.वि.क ४५४,४५७,३८० या दाखल गुन्ह्यात आरोपी नामे
१ ) अक्षयसिंग बिरूसिंग जुनी वय १९ वर्ष रा . बिराजदारनगर वैदुवाडी हडपसर पुणे यास गुन्हे शाखा युनिट -५ यांनी दिनांक २३/०७/२०२२ रोजी ताब्यात घेवून पुढील तपासकामी हडपसर तपासपथकाचे ताब्यात दिले . त्यानंतर गुन्ह्यातील इतर आरोपी
२ ) जितसिंग ऊर्फ जितुसिंग राजपालसिंग टाक वय २६ वष रा . ११२ बिराजदारनगर , वैदुवाडी हडपसर पुणे
३ ) लकिसींग गब्बरसिंग टाक वय १९ वर्ष रा . रामटेकडी डोंगरावर पाण्याचे टाकीजवळ हडपसर पुणे यांना तुळजापुर पोलीस ठाणे गु.र.नं २७०/२०२२ भा.दं.वि.क ४०१ , मुंबई पोलीस अधिनियम कलम १२४ , शस्त्र अधिनियम ४ ,२५ या गुन्ह्यातुन मा.न्यायालयाचे परवानगिने वर्ग करून घेवून उस्मानाबाद कारागृहातुन ताब्यात घेतले . आरोपी क्रमांक १ याची दिनांक २४/०७/२०२२ ते दिनांक ०३/०८/२०२२ पर्यंत पोलीस कोठडी घेण्यात आली तसेच आरोपी क्रमांक २ ३ यांची दिनांक २८/०७/२०२२ ते दिनांक ०३/०८/२०२२ रोजी पर्यंत पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आली होती .
हडपसर तपासपथकाने कौशल्याने आरोपीकडे पोलीस कोठडी मुदतीत तपास करून १ ) हडपसर पोलीस ठाणे गुरनं .७६६ / २०२२ भा.दं.वि. कलम ४५४,४५७,३८० २ ) हडपसर पोलीस ठाणे गुरनं . ७८८ / २०२२ भा.दं.वि. कलम ४५४,४५७,३८० ३ ) हडपसर पोलीस ठाणे गुरनं . ७९१ / २०२२ भा.दं.वि. कलम ४५४,४५७ , ३८० या गुन्ह्यातील चोरीस गेले सोन्या – चांदीचे दागिन्यांमधिल १७३.२४० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने ,७२८ ग्रॅम वजनाची चांदी असा किं .रू ८ , ९६,००० / – चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे .
तसेच आरोपींकडून हडपसर पोलीस ठाणे गुरनं .९४०/२०२२ भा.दं.वि. कलम ३७९,३४ मधिल चोरीस गेलेली सँन्ट्रो कार किं . रू ३,००,००० / – ची जप्त करून गुन्हा उघडकीस आणला आहे .
तपासपथकाने आज रोजी पर्यंत एकुण ११.९६ लाख रूपयाचे सोन्याचे दागिने आणि सँन्ट्रो कार असा मुद्देमाल हस्तगत केला आहे .
सदरची कामगिरी ही मा . अप्पर पोलीस आयुक्त , पुर्व प्रादेशिक विभाग पुणे श्री नामदेव चव्हाण व मा . पोलीस उप आयुक्त , परिमंडळ ५ पुणे शहर , श्रीमती नम्रता पाटील यांचे मागदर्शनाखाली मा . सहाय्यक पोलीस आयुक्त , हडपसर विभाग पुणे श्री बजरंग देसाई , वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन , पुणे शहर श्री अरविंद गोकुळे , पो.नि. ( गुन्हे ) श्री . दिगंगर शिंदे पो . नि . ( गुन्हे ) श्री . विश्वास डगळे यांचे सुचनाप्रमाणे तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे , पोलीस उप निरीक्षक अविनाश शिंदे , पोलीस अंमलदार , सुशील लोणकर , अविनाश गोसावी , संदीप राठोड , अंकुश बनसुडे , सचिन जाधव , शाहीद शेख , प्रशांत दुधाळ , निखील पवार , प्रशांत टोणपे , सचिन गोरखे , सुरज कुंभार , भगवान हंबर्डे , अनिरूध्द सोनवणे , अतुल पंधरकर यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे .
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/
आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad