कोंढवा पोलीसांची मोठी करावाई एकुण २१,८४,८१६ / – रू . चा तंबाखुजन्य गुटखा जप्त केला.

ACS POLICE CRIME SQUAD

दिनांक २३/१०/२०२१ कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर ६६ गुटखा विक्रेत्यांवर कोंढवा पोलीसांची मोठी करावाई .

दिनांक २१/१०/२०२१ रोजी कोंढवा तपास पथकाचे पोना / ६९३१ आल्हाट , पोना / ७७३१ जोतीबा पवार व पोअं / ८४४२ चिंचकर यांना मिळालेल्या गोपनिय बातमीवरून “ शिवनेरीनगर , गल्ली नं . ०३. कोंढवा खुर्द पुणे येथे एक इसम पिवळ्या रंगाच्या टेम्पो क्र . एम . एच . १२ एम . व्ही . ५५३० यामधुन तंबाखुजन्य गुटखा पदार्थ विक्री करीता घेवून येत आहे . ” अशी खात्रीलायक खबर मिळाल्याने श्री सरदार पाटील , वरिष्ठ पोलीस निरीक्षक सो , श्री जगन्नाथ जानकर पोलीस निरीक्षक गुन्हे व श्री गोकुळ राऊत पोलीस निरीक्षक गुन्हे कोंढवा पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील , पोहवा / ५४३ गरूड , पोहवा / ३६८८ कुंभार , पोना / ८४८६ चिनके , पोना / ७७३१ पवार पोना / ११६१ चव्हाण , पोना / ६९३१ आल्हाट , पोना / ७९ देसाई , पोअ / ८५९१ होळकर व पोअं / ८४४२ चिंचकर यांनी सदर ठिकाणी कारवाई केली असता इसम नामे विजय देवारामजी गुजर , वय २४ वर्षे , रा . स.नं. ५५. स्वामी विवेकानंद चौक , शिवनेरीनगर , गल्ली नं . ०३. कोंढवा खुर्द पुणे यास टेम्पो क्र . एम . एच . १२ एम . व्ही . ५५३० व तंबाखुजन्य गुटखा असा एकुण ३,०२,८६० / – रू किं च्या मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले . सदर इसमाकडे अधिक तपास केला त्याने सदर माल सदर माल धर्मावत पेट्रोलपंपाचे मागिल बाजूस पिसोळी येथे पार्क केलेल्या टेम्पोमधून घेतल्याचे सांगितल्याने सदर ठिकाणी यांनी सदर ठिकाणी छापा टाकून इसम नामे

१ ) महंमद रिझवान हनीफ अन्सारी , वय २३ वर्षे ,

२ ) गुलफाम अब्दुल अन्सारी , वय २२ वर्षे ,

३ ) मुजम्मील साजीद अन्सारी , वय २२ वर्षे , तीघे रा . गल्ली नं . २३. पवार चाळ , शिवनेरीनगर , कोंढवा खुर्द पुणे

यांना ताब्यात घेवून टेम्पो नं . एम . एच . १२ जे . एफ . १७३६ व टेम्पो नं . एम . एच . १२ के.पी. ४३४६ यांच्यासह एकुण १८.८१.९५६ / – रू किंमतीचा तंबाखुजन्य गुटखा ताब्यात घेण्यात आला आहे . त्याबाबत कोंढवा पोलीस स्टेशन गु.र.नं. ९१८ / २०२१ . भा.दं.वि. कलम ३२८ , १८८ , २७२ , २७३ . राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ ( ब ) व सिगारेट व अन्य तंबाखुजन्य उत्पादने ( जाहिरात प्रतिबंध आणि व्यापार , वाणिज्य उत्पादन पुरवठा व वितरण यांचे विनिमय ) अधिनियम कलम ७ ( २ ) व २० ( २ ) तसेच अन्न सुरक्षा मानके अधिनियम २००६ चे कलम २६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . आरोपीतांना आज रोजी मा.न्यायालयात हजर केले असता , मा . न्यायालयाने त्यांची दि .२६ / १० / २०२१ रोजी पर्यंत पोलीस कोठडी मंजुर केली आहे .

सदर कारवाईमध्ये कोंढावा पोलीसांनी एकुण २१,८४,८१६ / – रू किं चा तंबाखुजन्य गुटखा जप्त केला असून आरोपी नामे

आरीफ अन्सारी , रा शिवनेरीनगर , कोंढवा बु . , पुणे याचा शोध सुरू आहे .

दाखल गुन्हयाचा पुढील तपास स्वप्नील पाटील , पोलीस उपनिरीक्षक , कोंढवा पोलीस ठाणे पुणे हे करीत आहेत . या कामगिरीबाबत कोंढवा पोलीस ठाण्याच्या सर्व पथकाचे मा . पोलीस आयुक्त सो पुणे शहर यांनी अभिनंदन केले आहे .

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *