तेरा दुचाकी सकट पोलिसांनी केली आरोपीला अटक हडपसर पोलीस स्टेशन ची कामगिरी.

ACS POLICE CRIME SQUAD

दिनांक ०१/११/२०२१ मौजमजेसाठी दुचाकी चोरणा – या अल्पवयीन मुलगा व त्याचा भाऊ यांचेसह दोघेजण अटक करून त्यांचेकडून १३ दुचाकी किं.रू ०५,००,००० / – च्या हस्तगत हडपसर तपास पथकाची उत्कृष्ठ कामगिरी ..

ACS POLICE CRIME SQUAD

हडपसर पोलीस स्टेशन हद्दीत भाजीपाला मार्केट , बाजारपेठ , मॉल असे असून दिवाळी सणाच्या अनुषंगाने पोलीस ठाणे हद्दीत खरेदी साठी येणा – यांची संख्या जास्त प्रमाणात असते व त्यातच दुचाकी गाडी चोरीस जाण्याचे प्रमाण हे वाढलेले आहे . वाहनचोरीचे गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी मा . वरिष्ठ पोलीस निरीक्षक , हडपसर पोलीस स्टेशन पुणे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकातील अधिकारी सहा.पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड व सौरभ माने पोलीस उपनिरीक्षक , व तपास पथकातील अंमलदार हे काम करीत असताना पोलीस अंमलदार शाहीद शेख व प्रदिप सोनवणे यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की , हडपसर पोलीस स्टेशन हद्दीतुन एक अल्पवयीन मुलगा व त्याचे साथीदार हे दुचाकी गाडी चोरी करून सोलापूर हायवे ने गाडी घेवून निघून जात असतात अशी बातमी त्यांचे वर्णनासह मिळाली परंतु ते आरोपी नक्की कोठे राहतात याबाबत माहीती नसल्याचे सांगीतले . मिळालेल्या बातमीच्या आधारे तपास पथक प्रमुख सहा पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड , पोलीस उप निरीक्षक , सौरभ माने , पोलीस अंमलदार प्रदीप सोनवणे , शाहीद शेख , समीर पांडुळे , शशिकांत नाळे , निखील पवार , प्रशांत दुधाळ , प्रशांत टोणपे असे मिळून काम करीत असताना , तांत्रिक विश्लेषणा आधारे एक अल्पवयीन मुलगा व त्याचे सोबत इतर साथीदार हे दुचाकी वाहनांची टेहाळणी करीत असताना मिळून आले . त्याआधारे नमुद संशयीत हे ज्या मार्गे येतात ते ठिकाण निश्चित करून फुरसुंगी सार्वजनिक शौचालयाजवळ सापळा रचून संशयीत इसम हे रोड लगत असणा – या जागेत पार्क केलेल्या गाड्यांची टेहाळणी करीत असताना मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेवून त्यांचे नाव पत्ते विचारले असता त्यांनी त्यांची नावे

१ युनुस निजाम मुल्ला वय २५ वर्ष रा . सध्या गल्ली नं १६ . सय्यदनगर हडपसर पुणे मुळगाव / मु.पो.चिंचोली ता.उमरगा जिल्हा उस्मानाबाद

२. हनुमंत शंकर वाकडे वय २२ वर्ष रा . मु.पो. आलुर ता . उमरगा जिल्हा उस्मानाबाद

३ दिपक ऊर्फ खंडु तातेसाहेब कटकधोंड वय २४ वर्ष रा . केसर जवळा ता . उमरगा जिल्हा उस्मानाबाद

तसेच १ विधीसंघर्षित बालक यांना त्यांचे ताब्यात मिळून आलेले मोटारसायकल सह ताब्यात घेवून पोलीस स्टेशन येथे घेवून येवून त्यांचे कडे अधिक चौकशी केली असता , नमुद संशयीत आरोपी इसमांनी सांगीतले की , आम्ही वेळोवेळी आपसात ग्रुप बनवून हडपसर , वानवडी , स्वारगेट , फरासखाना या भागातील गर्दीच्या ठिकाणी जावून गाड्यांची टेहाळणी करण्याकरीता विधीसंघर्षित बालक यास पुढे पाठवून गाडी पार्क केलेला इसम कोठे जात आहेत हे पाहून तो गेल्यानंतर ती दुचाकी बनावट चावी आधारे चोरी करीत होतो . व दुचाकी चोरी करून निघून जात होतो . अशा पध्दतीने आम्ही सर्वांनी मिळून आज रोजी पर्यंत गुन्हे केले आहेत . नमुद आरोपी मजकूर यांचेकडून आज रोजी पर्यंत १३ दुचाकी वाहने किं . रू ५,००,००० / – च्या या जप्त करण्यात आल्या आहेत . त्यांचेकडून खालील पोलीस स्टेशन कडील गुन्हे उघडकीस आले असून उर्वरित ३ वाहनांचे मालकांचा शोध घेवून अधिक तपास चालु आहे . दाखल गुन्हयाचे तपासादरम्यान खालील गुन्हे उघडकीस आलेले आहेत . साधारण आरोपीचे नाव वर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल आहे.

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

सदरची कामगिरी ही मा . श्री . नामदेव चव्हाण , अप्पर पोलीस आयुक्त , पूर्व प्रादेशिक विभाग पुणे व मा .. नम्रता पाटील , पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५ पुणे शहर , यांचे सुचना व मागदर्शनाखाली मा . श्री . कल्याणराव विधाते , सहाय्यक पोलीस आयुक्त , हडपसर विभाग पुणे श्री . अरविंद गोकुळे , वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर पोनि . ( गुन्हे ) श्री . राजु अडागळे , पोनि ( गुन्हे ) श्री . दिगंबर शिंदे यांचे सुचनाप्रमाणे तपास पथकाचे सहा पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड , पोलीस उप निरीक्षक सौरभ माने , पोलीस अंमलदार , प्रदीप सोनवणे , गणेश क्षिरसागर , अविनाश गोसावी , संदीप राठोड , समीर पांडुळे , शशिकांत नाळे , सचिन जाधव , शाहीद शेख , प्रशांत दुधाळ , निखील पवार , प्रशांत टोणपे रियाज शेख , सचिन गोरखे यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे .

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामण तालीम( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *