सोशल मिडीयाद्वारे मैत्री करुन हनी ट्रॅपद्वारे व्यवसायीकाला लुटणारी टोळी केली गजाआड कोंढवा पोलीस ठाणे

ACS POLICE CRIME SQUAD

दिनांक . १७/०८/२०२१ कोंढवा पोलीस स्टेशन , पुणे शहर सोशल मिडीयाद्वारे मैत्री करुन हनी ट्रॅपद्वारे व्यवसायीकाला लुटणारी टोळी केली गजाआड

ONLINE PORTAL NEWS ONLY POLICE

कोंढवा पोलीस ठाणे पुणे गुरन ६७८४२०२१ भादवी कलम ३४१,३९४,३८८.५०६.३२३ प्रमाणे गुन्हा दाखल आहे . दाखल गुन्हयातील फिर्यादी यांना न्यु पनवेल ता.पनवेल जिल्हा रायगड येथील महिला हिने इंस्टाग्रामवर ओळख करुन इंटग्रामनरून जवळीक वाढवुन , फिर्यादी यांना सदर महिला व इतर मोबाईल धारक इसम तसेच त्यांच्या साथीदारांनी अडवुन मारहाण करुन बलात्काराचा गुन्हा दाखल करतो असे म्हणुन पैश्याची मागणी करुन , त्यांना जबदरस्तीने लुबाडुन . धमकी दिली असले बाबत गुन्हा दाखल आहे . पोलीस सदर मोबाईल धारकाच्या मोबाईल नंबरची माहिती प्राप्त करुन मोबाईल धारकाचा शोध घेत असताना सदर मोबाईल धारक हा गारवा हॉटेल बोपदेव घाट येथे असल्याची बातमी पोना / गणेश चिंचकर यांना माहिती प्राप्त झाली . त्यानुसार कोंढवा पोलीस स्टेशन तपास पथकाचे पोलीस उप – निरीक्षक प्रभाकर कापुरे , पोहवा / योगेश कुंभार , पोना / गणेश चिंचकर , पोशि / महेश राठोड , पोशि / अभिजीत रत्नपारखी यांनी सापळा रचुन सदर मोबाईल धारकास गारवा हॉटेल येथुन ताब्यात घेवुन त्याचे नांच पत्ता विचारता त्याने त्याचे नांव पत्ता रविंद्र भगवान बदर , वय २६ वर्ष , धंदा मंजुरी , रा . भिगवण एस टी जवळील , नितीन जाधव यांच्या स्विट होमच्या मागे , ता इंदापुर , जि पुणे असे सांगुन हा तोच वापर असल्याचे सांगितले . त्यावेळी त्याच्या सोबत असणा या इसम नागे सचिन बासुदेव भातुलकर , दय २२ वर्षे , रा . संदिप कामठे यांच्या मालकीच्या फलॅट नं .३०२ , द लेक स्ट्रीक सोसायटी ३ मजला , येवलेवाडी , पुणे मुळ रा . मु.पो. अकोला , मोठी उंबरी , ता . अकोला , जि . अकोला यास ताब्यात घेवुन त्यांच्याकडे गुन्हयाच्या अनुषंगाने विचारपुस केली असता त्याच्याकडुन माहिती प्राप्त झाली की , इसम नामे

१ ) रविंद्र भगवान बदर , वय २६ वर्षे , धंदा मंजुरी रा . भिगवण एस टी जवळील , नितीन जाधव यांच्या स्विट होमच्या मागे . ता इंदापुर , जि पुणे

२ ) सचिन वासुदेव भातुलकर रा , संदिप कामठे यांच्या मालकीच्या फलॅट नं .३०२ . द लेक स्ट्रीक सोसायटी ३ मजला , गेवलेवाडी , पुणे मुळ रा . मु.पो. अकोला , मोती जंबरी , ता . अकोला , जि . अकोला

३ ) आणणा राजेंद्र सांळुके , वय ४० वर्षे , धंदा शेती , रा . भाट निमगाव , ता इंदापुर , जि . पुणे सध्या रा , गोकुळनगर प्रेरा माऊंन्ट ईरोस फलेंट नं.सी .२०४ , कोंढवा पुणे

४ ) अमोल साहेबराव ढवळे , वय ३२ वर्षे , धंदा शेती . रा . सापटणे टे ता . मादा जि . सोलापुर मुळ सध्या रा . बाणेर बेला कासा सोसायटी जवळ , फ्रिशा सोसायटी , फलॅट नं .५०७ , बाणेर पुणे

५ ) मंथन शिवाजी पवार , वय २४ वर्षे , धंदा ड्रायव्हर , रा श्रीराम सोसायटी , शिव लिला बंगला , इंदापुर , ता इंदापुर जि पुणे )

एक महिला वय -१९ वर्षे , रा.येवलेवाडी , पुणे यांनी मिळुन आप आपसात संगणमत करुन सदर महिला हिने फिर्यादी यांच्या इंट्राग्राम व व्हॉटसअपवर एका महिलेचे नावाने ओपन केलेल्या अंकाऊन्ट वरुन ओळख करुन मैत्री केली होती . त्या मैत्रीतुन ओळख वाढवुन महिला आरोपी हिने फिर्यादी यांना येवलेवाडी येथील फ्लॅटवर बोलावून घेतले . त्यांनतर फिर्यादी हे सदर फलेंटवरुन निघुन जात सचिन वासुदेव भातुलकर , रविंद्र गवान बदर , आण्णा राजेंद्र सांळुके , अमोल साहेबराव ढवळे , मंथन शिवाजी पवार , आरोपी महिला यांनी कोंढवा पुणे येथे अडवुन , हाताने मारहाण करुन आरोपी महिलेवर हिच्यावर शारिरीक संबंध प्रस्थापीत केले म्हणुन तक्रार देतो असे सांगुण त्याच्याकडुन ५० लाखाची खंडणीची मागणी करुन ५ लाख रुपये खंडणीची रक्कम घेण्याचे ठरविले . त्याप्रमाणे फिर्यादी यांच्याकडुन रोख ५०,००० / रुपये व ३०,००० / – रु . एटीएम मधुन काढुन अशी एकुण ८०,००० / – रुपये घेवुन त्याच्याकडुन आरोपी महिला हिच्या सोबत लग्न करणार असे जबरदस्तीने लिहुन घेतले . त्यावरुन बाकी आरोपी यांच्याबाबत माहिती घेतली असता आरोपी कं , ०३,०४,०५ हे बाणेर येथे व क्र .६ महिला येवलेवाडी असल्याची माहिती प्राप्त झाल्याने त्यांना तेथुन ताब्यात घेवुन दि .१५ / ०८ / २०२१ रोजी १७.०० वा अटक करण्यात आली आहे .

गुन्हयाचा अधिक तपास वपोनि.श्री सरदार पाटील कोंढवा पो स्टे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप – निरीक्षक प्रभाकर कापुरे हे करत आहेत . सदरबाबत मा.पोलीस आयुक्त पुणे शहर श्री.अमिताभ गुप्ता यांनी कोंढवा तपास पथकाचे कौतुक केले आहे . अशाप्रकारे हनीट्रॅपद्वारे आणखी इसमांना लुबाडले असल्याची शक्यता आहे , तरी कोणाला अश्याप्रकारे लुबाडले असल्यास कोंढवा पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असे नागारीकांना आवाहन करण्यात येत आहे .

ACS POLICE CRIME SQUAD

ONLINE PORTAL NEWS

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *