सोन्याचे मंगळसुत्र चोरी करणा आरोपीला १ तासात शोध घेवुन ,पोलिसांनी केली अटक.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
सोन्याचे मंगळसुत्र चोरी करणा आरोपीला १ तासात शोध घेवुन पोलिसांनी केली अटक
दिनांक – १७/०८/२०२१ फरासखाना पोलीस स्टेशन , पुणे शहर लक्ष्मी रोड येथील गजबजलेल्या ठिकाणाहुन दुचाकी गाडीची डीक्की उघडुन , त्यामधील सोन्याचे मंगळसुत्र चोरी करणा – या सराईत भामटया चोरटयाचा पोलीसांकडुन अवघ्या १ तासात शोध घेवुन , त्यास गुन्हया मध्ये अटक करुन , त्याचेकडुन चोरलेले मंगळसुत्र जप्त करुन तात्काळ गुन्हा उघडकीस आणलेबाबत .
सोन्याचे मंगळसुत्र चोरी करणा आरोपीला १ तासात शोध घेवुन पोलिसांनी केली अटक.
दिनांक १५/०८/२०२१ रोजी १८/०० वाते १९ / ३० वा.चे दरम्यान विजयराज लॉज समोर , बुधवार पेठ , पुणे येथे फिर्यादी यांनी त्यांच्या पत्नीचे ११ ग्रॅम वजनाचे मंगळसुत्र दुरुस्त करुन त्यांचे ज्युपीटर गाडीच्या डिक्कीमध्ये ठेवले व गाडी विजयराज लॉज , बुधवार पेठ , पुणे समोर पार्क केली असता ते त्यांच्या मुलीला कपडे घेण्यासाठी तुळशीबागेत गेले असता कोणीतरी अज्ञात इसमाने त्यांच्या गाडीच्या डिक्की मधुन मंगळसुत्र चोरुन नेले म्हणुन अज्ञात इसमा विरुध्द गुन्हा दाखल केल्याने फरासखाना पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर १३८/२०२१ भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे . दाखल गुन्हयातील अज्ञात आरोपीचा फरासखाना पोलीस स्टेशन कडील तपास पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक , मनोज अभंग हे शोध घेत असताना पोलीस अंमलदार संदीप कांबळे , समीर माळवदकर , अभिनय चौधरी यांना नमुद गुन्हा हा पुणे शहर आयुक्तालय हद्दीतील रेकॉर्डवरील आरोपी बाबा लक्ष्मण बनपट्टे , रा . ८८३ वडारवाडी , मारुती मंदीर जवळ , मॉडेल कॉलनी , पुणे शहर याने केला असल्याची माहीती तांत्रिक विश्लेषणाचे आधारा वरुन मिळाली . त्या नुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज अभंग हे तपास पथकातील पोलीस स्टाफ सह आरोपी बाबा लक्ष्मण बनपट्टे याचा शोध घेत असताना आरोपी बाबा लक्ष्मण बनपट्टे , हा बाटागल्ली , बुधवार पेठ , पुणे येथे दिनांक १६/०८/२०२१ रोजी मिळुन आल्याने त्यास नमुद गुन्हया मध्ये अटक करुन त्याचे कडुन फिर्यादी यांचे चोरी केलेले सोन्याचे मंगळसुत्र जप्त करुन सदरचा गुन्हा एकतासा मध्ये उघडकीस आणुन आरोपीकडुन चोरी केलेले मंगळसुत्र हस्तगत करण्यात आले आहे . सदरचा आरोपी हा पुणे शहर आयुक्तालय हद्दीतील सराईत भामटयाचोर असुन त्याचेवर या पुर्वीदेखील गुन्हे दाखल आहेत.पुढील तपास पोलीस उप निरीक्षक अजितकुमार पाटील हे करीत आहेत .
ACS POLICE CRIME SQUAD
ONLINE PORTAL NEWS
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526