कोयता संकट आरोपीला अटक गुन्हा शाखाची कामगिरी.
ACS POLICE CRIME SQUAD
कोयता संकट आरोपीला अटक गुन्हा शाखाची कामगिरी.
आज रोजी दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक -२ , गुन्हे शाखा पुणे शहर कडील अधिकारी व अंमलदार पुर्व विभागामध्ये हडपसर पो स्टे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना सहा पो फौज उदय काळभोर व पो हवा 1988 रामाणे यांना त्याचे गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की , या पूर्वी आर्म अक्ट 4 (25) प्रमाणे कारवाई केलेले आरोपी ओंकार कोरडे व ज्योतिबा यांचा साथीदार
नामें प्रथमेश नंदलाल सूर्यवंशी वय 20 वर्षें रा रामोशी आळी हडपसर गावठाण पुणे
हा आज रोजी हिगणेमळा कडे जाणारे रोडवरील सिटकव्हर दुकानामागे घातक हत्यारासह संशयितरीत्त्या थांबलेला आहे अशी खात्रीशीर बातमी मिळालेने सदर बातमीप्रमाणे आमचे आदेश व सूचनां प्रमाणे सपोनि श्री पाडवी यांनी स्टाफ सह बातमीप्रणाने जाऊन त्यास स्टाफचे मदतीने 19/ 50 वा ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कब्जात किंमत रुपये 500/- चा एक लोखंडी कोयता मिळून आलेने तो पंचनाम्याने जप्त करणेत आला आहे त्याबाबत सदर इसमा विरुध्द पो हवा 1988 रामाणे यांनी आर्म अक्ट 4(25) प्रमाणे सरकार तर्फे फिर्याद दिलेने हडपसर पोलीस स्टेशन येथे आर्म अक्ट 4(25) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येवुन त्यास दाखल गुन्ह्यात अटक करून तपासकामी हडपसर पो स्टे चे ताब्यात रिपोटाने देणेत आले आहे.
सदरची कारवाई ही मा . पोलीस उप आयुक्त , गुन्हे , श्री . श्रीनिवास घाडगे , मा . सहा पोलीस आयुक्त गुन्हे २ श्री . लक्ष्मण बोराटे यांचे मार्गदर्शना खाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री . सुनिल पंधरकर , सहा पोलीस निरीक्षक विवेक पाडवी ,, व पोलीस अमलदार उदय काळभोर , दिनकर लोखंडे , विनायक रामाणे , गणेश लोखंडे , यांनी केली आहे .
ACS POLICE CRIME SQUAD
पोलीस निरीक्षक ,दरोडा वाहनचोरी विरोधी पथक – २. गुन्हे शाखा पुणे शहर .
ACS POLICE CRIME SQUAD
ONLINE PORTAL NEWS ONLY POLICE
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526