समर्थ पोलीस स्टेशन कडील बदली झालेल्या अंमलदारांना प्रेमाचा निरोप .
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
समर्थ पोलीस स्टेशन कडील बदली झालेल्या अंमलदारांना प्रेमाचा निरोप .
समर्थ पोलीस स्टेशन मध्ये असणाऱ्या पोलीस अंमलदार यांचे सर्वसाधारण बदल्या झाली असून त्यांची वेगवेगळ्या पोलीस स्टेशन व शाखांमध्ये बदली झाली आहे त्यांच्या पोलीस स्टेशनच्या
कार्यक्रमांमध्ये त्यांचे तपास पथकामधील उत्कृष्ट कामगिरी आणि त्यांच्या या कामगिरीमुळे पुणे शहर पोलीस आयुक्तालय यामध्ये समर्थ पोलिस स्टेशनचे डिटेक्शन मध्ये एक नंबर वरती नाव असणे म्हणजे याच बदली झालेल्या आमदारांनी मनापासून मेहनतीने काम केल्यामुळे शक्य झाले आहे
त्यांचे निरोप समारंभा मध्ये समर्थ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री ताम्हाणे साहेब पोलीस निरीक्षक गुन्हे श्री कदम साहेब तपास पथकाचे प्रभारी श्री संदीप जोरे साहेब सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक कुटे मॅडम तसेच इतर पोलीस अंमलदार व स्टाफ हजर होता या कार्यक्रमांमध्ये बदली झालेल्या आमदारांचा त्यांच्या कामाबाबत मनःपूर्वक कौतुक करून त्यांना पुष्पगुच्छ श्रीफळ ट्रॉफी आणि भेट वस्तू देऊन त्यांचा आदर सन्मान करण्यात आला,
तसेच त्यांचे पुणेरी फेटा बांधून स्वागत करण्यात आले यामध्ये बदली झालेल्या आमदारांनी समर्थ पोलीस स्टेशन विषयी आपले मनोगत व्यक्त करताना अशा प्रकारचे पोलीस स्टेशन आणि त्या ठिकाणचे प्रशासन इतर ठिकाणी मिळणे मुश्कील आहे असे त्यांच्या शब्दात सांगितले.
यामध्ये बदली झालेले पोलीस अमलदार सुशील लोणकर, संतोष काळे, निलेश साबळे, महेश जाधव, शुभम देसाई, विठ्ठल चोरमले ,सुभाष मोरे , यांची नावे आहेत.
या निरोप समारंभाचे संकल्पना तपास पथकातील प्रभारी श्री संदीप जोरे साहेब सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी केली असून सर्व मान्यवरांचे त्यांनी तोंड भरुन कौतुक केले आहे.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/
आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad