४० वर्षानंतर एकत्र आलेल्या एसएससी बॅच सामाजिक कार्याकडे वाटचाल .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

४० वर्षानंतर एकत्र आलेल्या एसएससी बॅच सामाजिक कार्याकडे वाटचाल .


महात्मा गांधी विद्यालय मंचर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथील सन १९८२ च्या दहावीच्या वर्गातील पास झालेले विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांची तब्बल चाळीस वर्षानंतर झालेली भेट आणि या भेटीचे रूपांतर एका दिवेआगार जिल्हा रायगड येथील समुद्रकिनारी असणाऱ्या लोटस रिसॉर्ट मध्ये दिनांक ४ व ५ जून २०२२ रोजी आयोजित करण्यात आली होती,

यामध्ये १९८२ साली कोणीही विद्यार्थी आणि विद्यार्थिनी एकमेकांबरोबर बोलत नव्हते कारण सर्वांना घरची बंधने होती आणि त्यामध्ये एक आपल्या आई वडिलांचे संस्कार आणि आपणावर संस्कृती लादली होती, त्याचा आदर करत आपण सर्व शिक्षक वृंद आणि आई-वडिलांचे शब्दाचा आदर करत होतो, परंतु चाळीस वर्षानंतर झालेल्या भेटीमध्ये कोणताही मैत्र मैत्रिणी यांनी दुरावा न ठेवता प्रत्येक जण आपल्या एकमेकांच्या सुख दुःखा मध्ये सहभागी होऊन दोन दिवस प्रत्येक क्षण आनंदात व्यतीत केला,

आणि दोन दिवसांमध्ये एकही मिनिट कोणी हसले नसेल अशाप्रकारे आनंद साजरा केलेला आहे, यामध्ये जवळ जवळ पंचवीस जण सहभागी झाले असून ते मुंबई , पुणे आणि मंचर या ठिकाणावरून आले होते, प्रत्येक जण ५५ ते ५७ या वयोगटातील असून सर्वजण एक उत्कृष्ट पालक आणि आजी-आजोबा अशा स्वरूपात आहेत सर्वांचे सुखी संसार मुले मुली नातवंडे यांना विसरून सर्वजण दोन दिवस आपल्या स्वतःला वेळ देऊन आनंद साजरा करण्यासाठी हजर राहिले आणि त्यांनी दिवेआगार येथील विविध मंदिरांना भेट देऊन समुद्रामध्ये पाण्याचा आनंद घेणे, समुद्रकिनाऱ्यावर फिरणे आणि विविध लहानपणीचे खेळ खेळणे व ते त्यांच्या स्मरणात राहील अशा प्रकारे काम केले आहे.


या ग्रुपमधील सर्व मान्यवर हे शासकीय-निमशासकीय वैद्यकीय आणि उद्योजक क्षेत्रामध्ये तसेच एक उत्कृष्ट ग्रहीणी या नामांकित प्रकारे काम करत असून प्रत्येकाचा प्रयत्न हा आपला सुखी संसार पाहता पाहता आपण समाजाला कोणत्यातरी प्रकारे काही देणे लागतो, आपल्या ग्रुप च्या माध्यमातून आपल्याकडून समाजासाठी काहीतरी उपयोग व्हावा असा प्रत्येकाच्या प्रयत्न असतो, ग्रुपने त्यांचे उर्वरित आयुष्य हे एकमेकांना भेटून यांच्या सुख-दुःखात सहभागी होऊन होऊन कुणालाही एकटे पडण्याची संधी मिळणार नाही आणि अशाच प्रकारे वेळोवेळी भेट घेऊन आनंद साजरा करून व्यतीत करण्यासाठी एकमेकाला आहेत असे सोयीचे ने सांगितले आहे

विशेष म्हणजे प्रत्येकाची मुले मुली यांनी ट्रीप ला जाण्यासाठी प्रोत्साहित केले असून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आनंद साजरा करा असे सांगितल्याने प्रत्येक जण उत्साहाने सहभागी झाला आहे.


रिसॉर्टमध्ये दोन दिवस सर्वांचे चांगल्या प्रकारे राहण्याची आणि जेवणाची सोय करण्यात आली होती लोटस रिसॉर्ट चे मालक श्री प्रभाकर पिंगळे वडगाव काशिंबेग, मंचर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे यांनी केली होती, त्यांनी सर्वांचे चांगल्याप्रकारे स्वागत करून आपल्या भागातील सर्व चाळीस वर्षानंतर भेटलेले मित्र एकत्र आले आहेत आणि त्यांची सेवा करण्याचा मला मोका मिळाला आहे त्यामुळे त्यांनी ही मनापासून आमची व्यवस्था केली आणि आमच्या बरोबर राहून पूर्णवेळ साथ दिली,


ग्रुप ची सामाजिक कार्याकडे वाटचाल – यामध्ये ग्रुपच्या माध्यमातून महात्मा गांधी विद्यालय मंचर या शाळेत एक प्रोजेक्ट भेट दिला असून जिल्हा परिषद शाळा वडगाव काशिंबेग या या शाळेला दहा पंखे भेट दिले आहेत याबाबत ग्रुपचे ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले आहे अशा प्रकारची सामाजिक कार्य ग्रुप कडून भविष्यात होणार आहेत. तसेच या ग्रुपने आपल्या ग्रुप मधील मित्र-मैत्रिणी एकूण १४ जणांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला आहे.


ग्रुप सदस्य –
१. रंजना वाघ गोरडे
२. सुभाष गणपत पिंगळे
३. श्रीपत दत्तात्रय मावकर
४. मिलिंद आवटे
५. संतोष गोरे
६. अंकुश बेंडुरे
७. अनिल अरगडे
८. महादेव शिंदे
९. विमल निघोट/शेवाळे
१०. श्यामल निघोट/देवधर
११. ‌ हनुमंत नाटे
१२. ‌ विलास निघोट
१३. ‌‌ भरत वायकर
१४. ‌‌ सुरेश शेटे
१५. ‌ प्रदीप पडवळ
१६. ‌‌ गजानन कुंजीर
१७. ‌‌ मच्छिंद्र दैने
१८. ‌माधव शिंदे
१९. सुनिता करकेरा/
२०. हिरा बागल/गावडे
२१. मंगल बोराडे/जाधव
२२. ‌‌ अलका मानकर/सैद
२३. पुष्पा थोरात/ढेरंगे.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *