१८ महिन्यांपासून फरार असलेला सराईत गुन्हेगार ला समर्थ पोलीस स्टेशन तपास पथक ने केली अटक.

दिनांक- १५/०७/२०२२ समर्थ पोलीस स्टेशन , पुणे शहर

१८ महिन्यांपासून पोलीसांना गुंगारा देणारा खुनाचा प्रयत्न केलेल्या सराईत गुन्हेगाराला केले जेरबंद .

समर्थ पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक ०९/०२/ २०२१ रोजी सदाआनंदनगर मंगळवार पेठ या ठिकाणी रहीम शेख याच्यावर सहा जणांनी धारधार हत्याराने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता . त्याबाबत समर्थ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे .

दाखल गुन्हयाच्या उर्वरित आरोपीचा शोध चालू असताना पोलीस अंमलदार हेमंत पेरणे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फतीने बातमी मिळाली की , सदर गुन्हयातील १८ महिन्यांपासून फरार असलेला सराईत गुन्हेगार उदय जितेंद्र लोखंडे हा केशवनगर शिंदे वस्ती पुणे या त्याच्या घराच्या ठिकाणी आई वडिलांना भेटण्याकरिता येणार आहे अशी माहिती मिळाली .

पोलीस अंमलदार हेमंत पेरणे यांनी तात्काळ सदरची बातमी त्यांनी पोलीस उप -निरीक्षक सुनिल रणदिवे यांना कळविली .सदर बातमीच्या अनूशंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश साठे व पोलीस निरिक्षक ( गुन्हे ) उल्हास कदम समर्थ पोलीस स्टेशन यांना माहिती देवून त्यांचे सुचना व मार्गदर्शना प्रमाणे सदर ठिकाणी जावुन योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याबाबत त्यांनी मुफजल आदेश दिले .

लागलीच सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे व तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी कायदेशीर कारवाईकामी खाजगी वाहनाने बातमीचे ठिकाणी केशवनगर शिंदे वस्ती पुणे येथे जावून बातमीतील

आरोपी – उदय जितेंद्र लोखंडे वय २२ रा . केशवनगर मुंढवा पुणे याचा शोध घेवून त्यास ताब्यात घेतले .

सदर आरोपीला समर्थ पोलीस स्टेशन या ठिकाणी आणून त्याला कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून अटक केली . सदरचा आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापुर्वी गंभीर स्वरूपाचे तीन गुन्हे दाखल आहेत . तसेच त्याला यापूर्वी १ वर्षाकरिता पुणे जिल्हातून तडीपार देखील केलेले होते .

सदरची कामगिरी ही मा . राजेंद्र डहाळे , अपर पोलीस आयुक्त , पश्चिम प्रादेशीक विभाग , पुणे शहर , मा . श्रीमती प्रियंका नारनवरे ,पोलीस उप आयुक्त , परिमंडळ -१ पुणे शहर ,मा.श्री.सतिश गोवेकर ,सहाय्यक पोलीस आयुक्त,फरासखाना विभाग,पुणे श्री . रमेश साठे , वरिष्ठ पोलीस निरीक्षक , समर्थ पो.स्टे , उल्हास कदम , पोलीस निरीक्षक , ( गुन्हे ) यांचे मार्गदर्शनानुसार सहाय्यक पोलीस निरिक्षक हेमचंद्र खोपडे , प्रविण जाधव , पोलीस उप निरीक्षक सुनिल रणदिवे,पोलीस अंमलदार हेमंत पेरणे , सुभाष पिंगळे , श्याम सुर्यवंशी , रहिम शेख ,प्रमोद जगताप , जितेंद्र पवार , गणेश वायकर , दत्तात्रय भोसले , लखन शेटे यांनी केली आहे .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.९८२२३३१५२६

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *