मोबाईल किंग ऑफ कोंढवा 1लाख 40 हजाराच्या सॅमसंगच्या एस 24 अल्ट्रा मोबाईलवर तब्बल 22 हजाराचा डिस्काऊंट,apcs.in

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

मोबाईल किंग ऑफ कोंढवा 1 लाख 40 हजाराच्या सॅमसंगच्या एस 24 अल्ट्रा मोबाईलवर तब्बल 22 हजाराचा डिस्काऊंट, पाहा कुठं अन् जाणून घ्या याबद्दल सविस्तर,मेहनतीला भविष्याचा वेध घेऊन मिळविली साथ झेरॉक्सवाला झाला मोबाईल किंग,

आयुष्यात प्रत्येक जण आपल्या परीने मेहनत करत असतो. कोंढवा परिसरात हिंदु मुस्लिम सामाजिक ऐक्यासाठी ते नेहमीच पुढाकार घेत असतात. त्यातूनच त्यांच्या व्यवसायाला अनेक पारितोषिके मिळाली आहेत.

आयुष्यात यशस्वी होण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत असतो.मात्र प्रत्येकांमध्ये जिद्द, चिकाटी असली तरी त्यांच्या मेहनतीला पुरेसे यश येत नाही. त्यामागे अनेकदा ते काळाची पावले ओळखण्यात कमी पडतात. त्यातूनच मग स्पर्धेच्या या जगात मागे पडतात. काही जण मात्र वेळीच भविष्याचा वेध घेऊन नव्या व्यवसायाची सुरुवात करतात, अशांच्या संघर्षाला यश मिळते. असेच एक उदाहरण आपल्यासमोर आले आहे. ते म्हणजे जुबेर शेख.शिक्षण घेत असताना झेरॉक्सच्या दुकानात काम करणारे जुबेर शेख यांनी आयुष्यात मोठा संघर्ष केला. त्याचवेळी काळाची पावले ओळखून मोबाईलच्या दुनियेत पाऊल ठेवले. विशाल रणनवरे यांच्या साथीने आज ते मोबाईल किंग ऑफ कोंढवा म्हणून ओळखले जाऊ लागले आहेत. अशा या जोडीची ही कहानी.


जुबेर शेख हे २००१ मध्ये शिक्षण घेत असतानाच घराला हातभार लावण्यासाठी झेरॉक्सच्या दुकानात पार्टटाईम काम करायला सुरुवात केली. त्यावेळी त्यांना मोबदला मिळायचा तो अवघा पाचशे रुपये. या पाचशे रुपयांनी त्यांना पैशाची किंमत समजावून दिली. पुढे २००६ मध्ये त्यांनी फ्लाय कंपनीमध्ये सेल्समन म्हणून काम करण्यास सुरुवात केली. तेथे त्यांनी तीन वर्ष काम करताना मग ती वस्तू कोणतीही असो, त्याची विक्री कशी करायची ही कला शिकून घेतली.


त्याचदरम्यान, मोबाईलमध्ये वेगाने क्रांती होत होती. मोबाईल हे पुढील पिढीचे भविष्य आहे, हे त्यांनी ओळखले. २०१० मध्ये त्यांनी आपल्या वडिलांकडून एक लाख रुपये घेतले. त्या भांडवलावर अतिशय खडतर परिस्थितीमध्ये मोबाईल शॉप सुरु केला. कठोर मेहनत आणि ग्राहकाला निरंतर सेवा याच्या जोरावर त्यांचा व्यवसाय बहरत गेला. एका दुकानाचे दोन आणि दोनाचे चार अशी अल्पवधीतच कोंढवा परिसरात चार दुकाने झाली.त्यांच्या या मेहनतीला विशाल रणनवरे यांची साथ लाभली. त्यांनी २०१५ मध्ये रणनवरे यांच्याबरोबर भागीदारीमध्ये न्यू सेल फॉर यु -मोबाईल किंग ऑफ कोंढवा हा नवीन सॅमसंग स्मार्ट कॅफे सुरु केला.


विशाल रणनवरे यांनाही आयुष्यात खून संघर्ष करावा लागला. मुळात अतिशय मनमिळावू असलेले विशाल यांना सुरवातीपासूनच व्यवसायाची आवड होती. परंतु, परिस्थिती आणि अनुभव यासाठी त्यांनी २००८ मध्ये सॅमसंग मध्ये सेल्समन म्हणून सुरुवात केली. २०१० मध्ये त्यांचे प्रमोशन झाले. जिद्द व चिकाटीच्या जोरावर त्यांनी तीन वर्षे मॅनेजर म्हणून काम केले. व्यवसायातील सर्व खाचखळगे जाणून घेतले. अतिशय कमी वेळात पिकमी, विवो आणि जिओमध्ये त्यांनी महत्वाच्या पदावर पुणे जिल्ह्यात काम केले. या कामातूनच त्यांची जुबेर शेख यांच्याशी ओळख झाली. शेख यांच्याबरोबर व्यवसायिक गप्पा होत असतानाच विशाल रणनवरे यांच्या मनात व्यवसाय सुरु करण्याची मनिषा जागृत झाली. दोघांचे विचार जुळले आणि त्यातूनच त्यांनी २०१५ मध्ये भागीदारीत न्यू सेल फॉर यु कॅफेची सुरुवात केली. अत्यंत कमी वेळात कोढवा परिसरामध्ये मोबाईल व्यवसायात त्यांनी आपला ठसा उमटविला. दोघांच्या मेहनतीने त्यांनी या क्षेत्रात स्वत:चा वेगळा ब्रँड तयार केला. सुरुवातीला पाच कोटी उलाढाल असलेला त्यांचा व्यवसाय अल्पवधीत प्रगती करु लागला. अवघ्या १० वर्षाच्या आत २०२४ मध्ये त्यांच्या व्यवसायाची उलाढाल ३० कोटी रुपयांवर गेली. यातूनच त्यांच्या व्यवसायाची प्रगती दिसून येते.


सामाजिक बांधिलकी ज्या समाजात आपण व्यवसाय करतो, त्या समाजाचे आपण देणे लागतो, या भावनेने ते दरवर्षी शैक्षणिक, आर्थिक व दुर्बल घटकांना नेहमी मदतीचा हात देत असतात. कोंढवा परिसरात हिंदु मुस्लिम सामाजिक ऐक्यासाठी ते नेहमीच पुढाकार घेत असतात. त्यातूनच त्यांच्या व्यवसायाला अनेक पारितोषिके मिळाली आहेत. भविष्यकाळात ही सामाजिक बांधिलकी आपल्या परीने जपण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.कर्मचारी हेच कुटुंब कोणताही व्यवसाय म्हटले की तेथे काम करणारे कर्मचारी अतिशय महत्वाचे असतात. जुबेर आणि विशाल यांच्या न्यू सेल फॉर यु – मोबाईल किंग ऑफ कोंढवा च्या सर्व शाखांमध्ये ३० हून अधिक कर्मचारी काम करतात. त्यांना स्वत:च्या कुटुंबाचे सदस्य असल्यासारखी वागणूक दिली जाते. त्यामुळे कर्मचारीही आपला स्वत:चा व्यवसाय असल्यासारखे अगदी मन लावून ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देण्याचा प्रयत्न करतात. त्यातूनच त्यांच्या व्यवसायाची उत्तरोत्तर प्रगती होत आहे.

भविष्यकाळातील वाटचाल न्यू सेल फॉर यू – मोबाइल किंग ऑफ कोंढवा शाखा लवकरच व्यवसायाचे जागतिक शहर दुबईमध्ये सुरू करण्याचा मानस आहे.माणसाने स्वप्न पाहिली तरच ती पूर्ण करण्यासाठी तो धडपड करतो. जुबेर यांचे हे स्वप्न आपल्याला लवकरच पूर्ण झाल्याचे दिसून येईल. त्यासाठी त्यांना शुभेच्छा !

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(APCS NEWS) ९८२२३३१५२६

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे व्हाट्सअप ग्रुप वर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..

https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

संपादक :मुख्य संपादक वाजिद एस खान.

(APCS NEWS) बातमी महाराष्ट्राची आपल्या राज्यातील ताज्या घडामोडींसाठी ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. युट्युब चॅनेलला Like, Subscribe आणि Share करा.
https://youtube.com/@acspolicecrimesquadnews7356?si=u-F8fbHvqL3-QPQh

https://instagram.com/khanwajid.khan.79?igshid=NGVhN2U2NjQ0Yg==

संपर्क : 9822331526

वेबसाईट : apcs.in

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *