लोणीकारभोर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यांतील सराईत आरोपींना अटक करण्यात आली पोलीस अंमलदार अमित साळुंखे, बाजीराव दीर, निखील पवार यांच्यामुळे सराईत गुन्हेगार तुरुंगात आरोपींच्या अटकेमुळे ६ गुन्ह्यांची उकल ६.५० लाखाांचा मुददेमाल जप्त

ACS POLICE CRIME SQUAD WAJID S KHAN

पोलीस अंमलदार अमित साळुंखे, बाजीराव दीर, निखील पवार यांच्यामुळे सराईत गुन्हेगार तुरुंगात
आरोपींच्या अटकेमुळे ६ गुन्ह्यांची उकल ६.५० लाखाांचा मुददेमाल जप्त लोणीकारभोर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यांतील सराईत आरोपींना अटक करण्यात आली

पुणे लोणीकारभोर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यांतील सराईत आरोपींना अटक करण्यात आली. सदर कारवाई पोलीस अंमलदार अमित साळुंखे, बाजीराव दीर, निखील पवार यांना मिळालेल्या माहितीवरून लोणीकारभोर पोलिसांनी केली. या कारवाईमुळे लोणीकारभारे व हडपसर पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या ६ गुन्ह्यांची उकल झाली असून, ६ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपींना न्यायालयाने १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
सतर्क पोलीस टाईम्सला मिळालेल्या माहितीनुसार, पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांनी पुणे शहरातील गुन्हेगार, बेकायदेशीर धंदे करणारे तसेच शरीर व मालाविरुद्ध गुन्हे करणारे व लोकांमध्ये दहशत निर्माण करणाºया सराईत गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार लोणीकाळभोर पोलीस ठाण्याचे पथक दाखल असलेल्या गुन्ह्यांचा तपास करू लागले. तपासादरम्यान पोलीस पथकातील पोलीस नाईक अमित साळुंखे, पोलीस अंमलदार बाजीराव दीर, पोलीस अंमलदार निखील पवार यांना खबºयााने आरोपींची माहिती दिली. त्यानुसार हांडेवाडी परिसरात मोटारसायकलवरून फिरत आहेत.
सदर माहितीच्या लोणीकारभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकातील राणू महानोर, सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस अंमलदारांना कारवाईबाबत सूचना दिल्या. त्यानुसार हांडेवाडी-उरुळीदेव दरम्यान सापळा लावण्यात आला. मोटार सायकलवरून आलेल्यांना पोलिसांनी थांबण्यासाठी इशारा केला. मात्र, पोलिसांना पाहून त्यांनी मोटारसायकल सुसाट पळवली. सापळा लावलेल्या पोलिसांनी शिताफीने पाठलाग करून मोटारसायकलस्वारांच्या मुसक्या आवळल्या. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी स्वत:ची नावे जयसिंग कालुसिंग जुनी (२८, रा. सर्वे नं. ८६. बिराजदार नगर वैदवाडी, हडपसर, पुणे), सोमनाथ नामदेव घारूळे (२४), बल्लुसिंग प्रभुसिंग टाक (२४, रा. सर्वे नं .११० रामटेकडी.पुणे याचेसका वरील गुन्हे केल्याये सांगितले.
या आरोपींनी मंतरवाडी तसेच हांडेवाडी परिसरात बंद परांचे कुलुप, कडी कोपडे तोडुन घरात प्रवेश करून घरफोडी चोरी केल्याची कबुली दिल्यामुळे लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या (गुन्हा रजि.न .२५० / २०२१ तसेच २५१/२०२१ भादवि कलम ४५४,४५७.३८०) तसेच संदीप सूर्यकांत चिचुरे हे त्यांचे साडूसोबत उसळीदेवाची गावातून जाताना लघुशंकेसाठी रोडचे कडेला थांबले असता सँन्ट्रो कारमधून या आरोपींनी चाकूचा धाक दाखवून दोन मोबाईल पळवल्याची कबुली दिली. त्यामुळे गुन्हा रजि.नं. २०३/२०२१ भादंवि कलम ३९२, ३४ नुसार दाखल असलेल्या गुन्ह्यांसह गु.र.नं .२५१ / २०२१ भादंवि कलम ४५४, ४५७, ३८०, गु.र.नं .२७३ / २०२१ भादंवि कलम ३९२, ३४ व हडपसर पोलीस स्टेशन येथील गुर.नं .३३ ९ / २०२१ भादंवि कलम ३७९ व गु. र. क्र. १६७ ९ / २०२० भादंवि कलम ३७९, गुर.नं .३३१ / २०२१ भा.द.वि.क .४५७, ३८० या गुन्ह्यांची उकल झाली आहे. तपासादरम्यान या आरोपींकडून करता एक संन्ट्रो कार, एक मोटरसायकल, सोन्याचे दागिने असा एकूण ६ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सराईत आरोपींवर दाखल आहेत अनेक गुन्हे
आरोपी जयसिंग कालुसिंग हा सराईत जुनी याचेवर एकू ण – ११ , सोमनाथ नामदेव घारुळे ०४ व बल्लुसिंग प्रभुसिंग टाक याचेवर झ्र६३ गुन्हे दाखल असुन त्यांना लोणीकाळभोर पोलीस स्टेशन येथील गुन्हयात अटक करून त्यांची आजपावेतो १० दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड घेवुन पोलीस कस्टडी रिमाड मुदतीत आरोपीत यांचेकडे सखोल तपास करून खालील गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत . १ ) लोणीकाळभोर पोलीस स्टेशन गुरनं २५०/२०२१ भा.द.वि क ४५७,३८० २ ) लोणीकाळभोर पोलीस स्टेशन गु.र.नं .२५१ / २०२१ भा.द.वि.क. ४५४,४५७,३८० , ३ ) लोणीकाळभोर पोलीस स्टेशन गु.र.नं .२७३ / २०२१ भा.द.वि.क .३ ९ २,३४ ४ ) हडपसर पोलीस स्टेशन येथील गुर.नं .३३ ९ / २०२१ भा.द.वि.क .३७ ९ . ५ ) हडपसर पोलीस स्टेशन गुर ने १६७ ९ / २०२० भा.द वि.क .३७ ९ , ६ ) हडपसर पोलीस स्टेशन गुर.नं .३३१ / २०२१ भा.द.वि.क .४५७,३८०

तपासी पोलीस पथकाची कौतुकास्पद कारवाई
सदरची कामगिरी मा.श्री नामदेव चव्हाण , अपर पोलीस आयुक्त , पुर्व प्रादेशीक विभाग , पुणे शहर , मा.नम्रता पाटील , पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५ , मा.श्री कल्याणराव विधाते स.पो.आ. हडपसर विभाग याचे मार्गदशर्नाखाली श्री राजेन्द्र मोकाशी वपोनि , सुभाष काळे पोनि ( गुन्हे ) , लोणीकाळभोर पोलीस स्टेशनचे तपास पथकातील अधिकारी राजु महानोर सपोनि , यांचे सोबत पो हवा / नितीन गायकवाड , गणेश सातपुते , पो.ना / अमित साळुके , श्रीनाथ जाधव , सुनिल नागलोत , पो . कॉ / निखील पवार , शैलेश कुदळे , बाजीराव वीर , रोहीदास पारले , राजेश दराडे , दिगंबर साळुके यांचे पथकाने केली आहे.

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *