कुख्यात गुंड सचिन पोटे व इतर दोन यांना मोका न्यायालयाकडून जन्मठेपेची शिक्षा
ACS POLICE CRIME SQUAD

दिनांक -२२ / ०७ / २०२१ कुख्यात गुंड सचिन पोटे व इतर दोन यांना मोका न्यायालयाकडून जन्मठेपेची शिक्षा

CRIME REPORTER RAEES KHAN
दिनांक -०४ / १० / २००६ रोजी इसम नाम संदीपभाऊ ऊर्फ संदिप शंकर मोहोळ वय २४ वर्षे रा . मु.पो. मुठागांव ता मुळशी जि.पुणे . हा आपले तीन मित्रांसह आपले गावातून स्कापीओ गाडी नं एमएच – १२ – सीवाय -००८२ मधुन पौडरोडने पुणेकडे येत असताना ११.३० वा सुमारास पौडफाटा उड्डाणपुलाचे खाली रोडवर सिग्नल लागल्याने थांबले असताना आरोपी नामे समीर ऊर्फ सम्या मेहबुब शेख रा.कर्वेनगर , पुणे व आरोपी पांडुरंग विठ्ठल मोहोळ रा.मु.पो मुठागांव ता.मुळशी जि.पुणे . यांचेशी संदीपभाऊ ऊर्फ संदिप शंकर मोहोळ याचे पुर्वी झालेल्या भांडणाचे कारणा वरुन नमुद आरोपी यांनी गैरकायदयाची मंडळी जमवुन संदीपभाऊ ऊर्फ संदिप शंकर मोहोळ याचेवर कोयते , सुरे चॉपर या घातक शस्त्रांनी गाडीच्या काचा फोडून पिस्तुलातून छातीवर , पोटावर कमरेवर ०६ गोळ्या झाडून गंभीर जखमी करुन जिवे ठार मारले . या बाबत फिर्यादी प्रकाश दगडू करपे यांच्या फिर्यादीवरुन कोथरुड पोलीस ठाणेस गुन्हा नोंद क्रमांक -५६२ / २००६ भादवि कलम ३०२.१४१,१४३.१४७.१४८,१४९ भारताचा हत्यार कायदा कलम ३ ( २५ ) . प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला .
सदर खुनाच्या गुन्हयाचा प्राथमिक तपास वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री आर वाय.शिदे कोथरुड पोलीस ठाणे व नंतर गुन्हे शाखेकडील पोलीस निरीक्षक श्री भानुप्रताप बर्गे यांनी केला होता . सदर गुन्हा संघटीत टोळीने केल्याचे तपासात निष्पन्न झालेने गुन्हयास मोका कलम ३ ( १ ) ( I ) ३ ( २ ) .३ ( ४ ) लावण्यात आला मोका कलमे लावल्यानंतर गुन्हयाचा पुढील तपास श्री संजय जाधव सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा पुणे शहर यांनी केला होता . सदर गुन्हयाचा योग्य प्रकारे तपास करुन सदर गुन्हयात एकुण १८ आरोपी यांचा सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न करुन अटक करण्यात आली त्यामध्ये ( १ ) सचिन निवृत्ती पोटे रा जोशीवाडा , सदाशिव पेठ , पुणे ( २ ) पांडुरंग विठ्ठल मोहोळ ( मयत ) रा . निबंज नगर , प्लॉट नं ११ , बिल्डींग – A2 आनंदनगर , सिंहगड रोड , पुणे . ( ३ ) संजय ऊर्फ कान्या महिपती कानगुडे रा . रा प्लॉट नं १५ , चाळ नं १ , खिलारेवाडी , एरंडवणा , पुणे ( ४ ) सम्या ऊर्फ समीर मेहबुब शेख रा गल्ली नं ५ , चक्रधर दवाखान्या जवळ , कर्वेनगर , पुणे ( ५ ) दिनेश खडकसिंग आवाजी ( मयत ) रा बाबासाहेब आंबेडकर वसाहत , सहकारनगर , पुणे . ( ६ ) सचिन सोपान मारणे रा ४७/१ , मोरे अमिक वसाहत , गणपती जवळ , पौड रोड , कोथरुड पुणे ( ७ ) गणेश निवृत्ती मारणे रा प्लॉट नं १५. खिलारेवाडी , करोड , पुणे ( ८ ) राहुल रामचंद्र तारु रा ३५४. भोईराज सोसायटी , शैलजा बंगला , सहकार नगर , पुणे ( ९ ) अनिल वाघु खिलारे रा ५७१. शुक्रवार पेठ , गजानन चौक . पुणे . ( १० ) विजय महिपती कानगुडे रा प्लॉट नं १५. खिलारेवाडी . करोड , पुणे ( ११ ) जमीर मेहबुब शेख रा पारिजात कॉलनी , गल्ली नं ५ , कर्वेनगर , पुणे ( १२ ) इंद्रनिल चंद्रभुषण मिश्रा ( मयत ) रा प्लॉट नं १५. खिलारेवाडी , करोड , पुणे ( १३ ) संतोष रामचंद्र लांडे रा प्लॉट नं १५. खिलारेवाडी , करोड , पुणे ( १४ ) दिपक किसन मोकाशी रा प्लॉट नं १५. खिलारेवाडी , करोड , पुणे ( १५ ) शरद तुकाराम विटकर रा साई मंदीराजवळ . वडारवाडी . कर्वेनगर , पुणे ( १६ ) निलेश किसन नाझीरे रा हिंगणे होम कॉलनी , आण्णा कोंढरे बंगल्याचे शेजारी , कर्वेनगर पुणे ( १७ ) रहिम ऊर्फ शानु मोहम्मद शेख रा . श्रीकृपा अर्पाटमेंट , कोंढवा पुणे ( १८ ) दत्तात्रय काळभोर रा.प्लॉट नं १५ , खिलारेवाडी , करोड , पुणे यांना अटक करण्यात आली .
सदर गुन्हयाचा तपास श्री संजय जाधव , सहाय्यक पोलीस आयुक्त , गुन्हे शाखा पुणे शहर यांनी करुन वरील नमुद आरोपी विरुध्द विशेष मोका न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले . ( सेशन केस नं .०२ / २००७ ) सदर दाखल गुन्हयात वरील नमुद आरोपी यांचे विरुध्द श्री शिरशीकर , विशेष मोका सत्र न्यायाधिश , शिवाजीनगर , पुणे , यांच्या न्यायालयात सुनावणी होवुन आज दिनांक -२२ / ०७ / २०२१ रोजी निकाल दिला यामध्ये आरोपी ( १ ) सचिन निवृत्ती पोटे , ( २ ) संतोष रामचंद्र लांडे ( ३ ) जमीर मेहबुब शेख यांना जन्मठेप हि शिक्षा ठोठावलेली आहे . कुख्यात गुंड सचिन निवृत्ती पोटे याचे विरुध्द मुंढवा पोलीस ठाणेत गुन्हा नोंद क्रमांक -७९ / २०२१ भादवि कलम ३०७.३९२ , ४२७ , ३२३.५०४,१४१.१४३.१४७.१४८.१४९ भा.ह.का ३ ( २५ ) . मु.पो.का .३७ ( १ ) १३५ मोका कलम ३ ( १ ) ( 1 ) ( I ) .३ ( २ ) , ३ ( ४ ) अन्वये दाखल असून सदर गुन्हयाचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे गुन्हे -२ हे करीत आहेत .
सदर खुनाच्या गुन्हयाचा प्राथमिक तपास वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री आर.वाय.शिदे कोथरुड पोलीस ठाणे नंतर गुन्हे शाखेकडील पोलीस निरीक्षक श्री भानुप्रताप बर्गे यांनी केला . मोका कायदयाअंतर्गत सदर गुन्हयाचा तपास श्री संजय जाधव , सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा पुणे शहर यांनी उत्कृष्ठ तपास करुन सन २००७ मध्ये नमुद आरोपी विरुध्द दोषारोप पत्र दाखल केले होते . कोथरुद्ध पोलीस ठाणेकडील कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोलीस उप – निरीक्षक श्री बिराजदार व पौहवा / पानसरे यांनी उत्तमरित्या काम पाहिले आहे . प्रस्तुत केसमध्ये सरकारी वकील म्हणून निलीमा वर्तक उज्वला पवार व विलास पठारे यांनी कामकाज पाहिले .
ACS POLICE CRIME SQUAD
ONLINE PORTAL NEWS
CRIME REPORTER RAEES KHAN
9881888008