दहशत माजवणा – या चुहा गैंगचा विरुध्द मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई

ACS POLICE CRIME SQUAD

ONLINE PORTAL NEWS

दिनांक -२३/०७/२०२१ भारती विद्यापीठ पोलीस ठाणे , पुणे शहर खुनाचा प्रयत्न करुन दहशत माजवणा – या चुहा गैंगचा म्होरक्या लतिफ बागवान टोळी विरुध्द मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई

CRIME REPORTER RAEES KHAN

आपल्या टोळीच्या गुन्हेगारी हालचालींची माहिती पोलीसांना देतो या संशयावरुन भारती विद्यापीठ पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील चुहा गैंगचा म्होरक्या साकिब मेहबुब चौधरी ऊर्फ लतिफ बागवान वय -२२ वर्षे , रा लुनिया बिल्डिंग , चौथा मजला , कदमचाळ , कुमावत गल्ली नं . ०५ , संतोषनगर , कात्रज , पुणे याने कट रचुन त्याचे टोळी सदस्य गुंड १ ) चंद्रशेखर उर्फ शेखर ठोंबरे वय -२४ वर्षे रा . कदम चाळ येथे मोहसिन मुल्ला यांचे भाड्याचे रुममध्ये , संतोषनगर , कात्रज , पुणे २ ) अझरुद्दीन दिलावर शेख वय -२० वर्षे रा . मालक संतोष नरवडे यांच्याकडे भाड्याने , समर्थ निवास , फ्लॅट नं .१२ . अंजलीनगर , कात्रज , पुणे ३ ) तनवीर जमीर सय्यद वय -२७ वर्षे रा . जामा मस्जिद जवळ , संतोषनगर , कात्रज , पुणे ४ ) ऋतिक चंद्रकांत काची वय -१ ९ वर्षे रा . फ्लॅट नं . २०३ , हर्षवर्धन अपार्टमेंट , प्रभात टायर्सजवळ , संतोषनगर , कात्रज , पुणे यांनी दिनांक ०३/०७/२०२१ रोजी रात्री ०८/३० वा . च्या सुमारास एक इसम वय -४४ वर्षे रा . नविन वसाहत गल्ली क्र . ११ , कात्रज , पुणे याच्यावर संतोषनगर कात्रज परिसरात कोयत्याने सशस्त्र हल्ला करून त्यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला म्हणुन यातील जखमी यांचे फिर्यादी वरुन भारती विद्यापीठ पोलीस ठाणे गु.र.नं. ५०५ / २०२१ , भा.द.वि . कलम ३०७,३२३.५०४,३४,१२० ( ब ) सह भारतीय हत्यार कायदा कलम ४ ( २५ ) , महा . पो . अधि . कलम ३७ ( १ ) ( ३ ) १३५ अन्वये दिनांक ०४/०७/२०२१ रोजी दाखल आहे . दाखल गुन्हयात वर नमुद केले प्रमाणे टोळी प्रमुख नामे साकिब मेहबुब चौधरी ऊर्फ लतिफ बागवान वय -२२ वर्षे , रा- लुनिया बिल्डिंग , चौथा मजला , कदमचाल , कुमावत गल्ली नं . ०५ , संतोषनगर , कात्रज , पुणे याचे सह त्याचे ०४ साथिदार यांना भारती विद्यापीठ पोलीस ठाणे कडील पोलीसांकडून अटक करण्यात आली आहे . सदर चुहा गैंग मधील अटक आरोपींवर संघटीतपणे यापुर्वी सन २०१७ पासुन गंभीर स्वरुपाचे शरिराविरुध्दचे व मालमत्तेविरुध्दचे गुन्हे दाखल असुन टोळी प्रमुख साकिब मेहबुब चौधरी ऊर्फ लतिफ बागवान याने प्रत्येक गुन्हयाचे वेळी सोबत वेगवेगळे साथीदार घेवुन आपल्या टोळीची दहशत व वर्चस्व राखण्याकरीता तसेच स्वतःचे व टोळीचे अवैध आर्थिक फायद्याकरीता जबरी चोरी , खंडणी , मारामारी , खुनाचा प्रयत्न , बेकायदेशिर हत्यार जवळ बाळगणे , सरकारी कामात अडथळा आणणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे चढत्या क्रमाने केलेले आहेत . सदर टोळीप्रमुख व त्याचे टोळीचे सदस्य यांना गुन्हेगारी कृत्यांपासुन परावृत्त करण्याच्या उद्देशाने त्याचेवर यापुर्वी प्रतिबंधक कारवाई तसेच हद्दपारी सारखी ठोस कारवाई करून देखील त्यांचे गुन्हेगारी वर्तनात काही एक चांगला परिणाम झालेला नसल्याने त्यांचेवर ठोस व कडक कारवाई करणे आवश्यक होते . सदरच्या संघटीत गुन्हेगारी टोळी विरूदध मोक्का अंतर्गत कारवाई होणेकरिता श्री.जगन्नाथ कळसकर , वरिष्ठ पोलीस निरीक्षक , भारती विदयापीठ पोलीस ठाणे यांनी श्री.सागर पाटील पोलीस उप – आयुक्त परिमंडळ -२ यांचे मार्फत डॉ.संजय शिंदे , अपर पोलीस आयुक्त , पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर यांना प्रस्ताव सादर केला सदर प्रस्तावाचे अवलोकन करून डॉ . संजय शिंदे , अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर यांनी आरोपी नामे- साकिब मेहबुब चौधरी ऊर्फ लतिफ बागवान याच्या टोळी विरुदध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा , सन १ ९९९ चे कलम ३ ( १ ) ( 11 ) .३ ( २ ) .३ ( ४ ) या कलमा प्रमाणे कारवाई करणे करिता मंजुरी दिली आहे .

सदर गुन्हयाचा पुढील तपास श्रीमती सुषमा चव्हाण सहा पो आयुक्त , स्वारगेट विभाग पुणे शहर हे करीत आहे . सदर कामगिरी मा . पोलीस आयुक्त पुणे शहर श्री अमिताभ गुप्ता , मा.पोलीस सह – आयुक्त डॉ.रविंद्र शिसवे मा अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग डॉ.संजय शिंदे मा पोलीस उप – आयुक्त श्री सागर पाटील , यांचे मार्गदर्शनाखाली श्री . जगन्नाथ कळसकर , भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर श्रीमती संगिता यादव पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) व श्री . प्रकाश पासलकर , पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) . सर्व्हलन्स पथकातील श्री . वैभव गायकवाड सहा . पोलीस निरीक्षक , पोलीस अंमलदार कृष्णा बढे , महेश बारावकर , निलेश ढमढेरे व अमित शेडगे यांनी केली आहे . श्री अमिताभ गुप्ता पोलीस आयुक्त , पुणे शहर , यांनी पोलीस आयुक्तालयाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष ठेवून गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर अधिक भर दिला आहे त्याबाबत मार्गदर्शन सर्व पोलीस अधिकारी व अमलदार यांना केले आहे , त्यांचे मार्गदर्शनाखाली मोक्का अंतर्गत झालेली ही ४० वी कारवाई करण्यात आलेली आहे .

ACS POLICE CRIME SQUAD

ONLINE PORTAL NEWS

CRIME REPORTER RAEES KHAN

9881888008

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *