लोनी काळभोर पुणे शहर पोलिसांची कामगिरी

ACS POLICE CRIME SQUAD

ONLINE PORTAL NEWS

दिनांक -२२/०७/२०२१ पी.सी.बी. गुन्हे शाखे अंतर्गत कारवाई

CRIME REPORTER RAEES KHAN

पुणे शहर पोलीस आयुक्त यांची एम.पी.डी.ए. कायद्यान्वये , नव्याने पुणे पोलीस आयुक्तालयात समाविष्ट झालेल्या लोणी काळभोर भागातील पहिला अट्टल गुन्हेगार स्थानबध्द ऋषिकेश सुरेश पवार , वय २३ वर्षे , रा.मराठी शाळेच्या पाठीमागे , कदमवस्ती , लोणी काळभोर , ता . हवेली.जि . पुणे . ह्या अभिलेखावरील सराईत गुन्हे करणारा गुन्हेगार त्यांने त्याचे साथीदारांसह लोणी काळभोर पोलीस ठाणे , पुणे . हद्दीमध्ये गावठी पिस्तुल , कोयता , सुरा , लोखंडी पाईप , बेसबॉलची बॅट , या सारख्या जीवघेणी हत्यारे बाळगुन खुनाचा प्रयत्न , दरोड्यांचा प्रयत्न , दंगा , दुखापत , बेकायदेशीर हत्यार बाळगणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत . त्याने सन -२०१७ पासुन त्याचे विरुध्द ०६ गुन्हे दाखल आहेत . त्याचा गुन्हेगारी कृत्यामुळे सदर परीसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झालेली होती . तसेच त्याच्यापासून जिवीताचे व मालमत्तेचे नुकसान होईल या भितीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करणेस धजावत नव्हते . वरिष्ठ पोलीस निरीक्षक , श्री.राजेंद्र मोकाशी व पोलीस उप – निरीक्षक श्री . अमित गोर , लोणी काळभोर पोलीस स्टेशन पुणे शहर . यांनी एमपीडीए कायदयान्वये नमुद इसमास स्थानबध्द करण्याकामी प्रस्ताव तयार करुन मा.पोलीस आयुक्त , पुणे शहर . यांचेकडे सादर केला होता . श्री.अमिताभ गुप्ता , पोलीस आयुक्त , पुणे शहर . यांनी प्रस्तावाची पडताळणी करुन नमुद इसमाचे विरुध्द दि .१९ / ०७ / २०२१ रोजी एमपीडीए कायदयान्वये एक वर्षाकरीता ०१ गुन्हेगारास स्थानबध्दचे आदेश पारीत केले आहे . श्री.अमिताभ गुप्ता , पोलीस आयुक्त , पुणे शहर यांनी सक्रिय व दहशत निर्माण करणा – या अट्टल गुन्हेगारांवर कडक प्रतिबंधक कारवाई करण्याचे धोरण अवलंबिले आहे.त्यानुसार मागील ०९ महिन्याच्या कालावधी मध्ये ३१ गुन्हेगारांना एमपीडीए कायदयान्वये स्थानबध्द केले आहे . यापुढेही सराईत व अट्टल गुन्हेगारांचे कृत्यांना आळा घालण्यासाठी या प्रमाणे कारवाई करण्याचे ठरविले आहे .

ACS POLICE CRIME SQUAD

ONLINE PORTAL NEWS

CRIME REPORTER RAEES KHAN

9881888008

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामण तालीम( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *