वाईन शॉप फोडुन घरफोडी करणारे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांना मुंढवा पोलीसांनी ठोकल्या बेडया,apcs.in
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
पुणे :२२/०१/२०२४,(APCS NEWS) मुख्य संपादक वाजिद एस खान,
केशवनगर येथील ‘विरांश वाईन’ शॉप फोडून रोकड यांनी विदेशी मद्याच्या बाटल्या असा एकूण ४ लाख ६० हजारांचा मुद्देमाल लंपास करणाऱ्या चौघा आरोपींना मुंढवा पोलिसांकडून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या आरोपींकडून ३३ हजार ६०० रुपयांची विदेशी दारु हस्तगत करण्यात आली असून गुन्हयातील चोरलेल्या रकमेबाबत अधिक तपास सुरू आहे.
ओंकार ऊर्फ पल्या सुधाकर परमवार (वय २४, रा. जुनाबाजार, नवी तालीम समोर, खडकी), अरबाज मुनीर शेख (वय १९, रा. खडकी बाजार, गोपी चाळ, खडकी) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींनी विरांश वाईन्स दुकान फोडून रोकड व विदेशी दारुच्या बाटल्याचे बॉक्स लंपास केल्याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात भादवि कलम ४५४, ४५७, ३८०, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. मुंढवा पोलीस ठाण्याच्या.तपास पथकाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुरू केला. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातुन आरोपींचा शोध घेण्यात येत होता. या तपासात सलग १५ दिवस एकूण २५० च्यावर सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले.
तपास पथकातील पोलीस शिपाई सचिन पाटील, स्वप्नील रासकर यांना त्यांच्या खबऱ्यामार्फत हे आरोपी खडकी परीसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती.सदरची माहीती ही तात्काळ त्यांनी तपास पथकातील प्रभारी श्री सपोनी संदीप जोरे यांना कळविली,त्यांनी सदरबाबतची गोपनीय बातमी वपोनी त्यानुसार, वरिष्ठ निरीक्षक महेश बोळकोटगी यांनी तात्काळ सापळा लावून आरोपींना पकडण्याचे आदेश दिले. त्यानुसार, सापळा लावून आरोपींना ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्यांनी व त्यांच्या दोन साथिदारांनी ही चोरी केल्याची कबुली दिली. पकडण्यात आलेले दोन्ही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर पुणे शहरात विविध पोलीस ठाण्यांमध्ये चोरीचे-घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. आरोपींना न्यायालयाने २३ जानेवारीपर्यन्त पोलीस कोठडी सुनावली. त्यांच्या अन्य साथिदारांचा शोध सुरू आहे.

सदरची कामगीरी मा.श्री रीतेशकुमार सो, पोलीस आयुक्त पुणे शहर, मा.श्री रामनाथ पोकळे साो अति कार्यभार सह पोलीस आयुक्त पुणे शहर, मा.श्री. रंजनकुमार शर्मा साो अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग पुणे शहर, मा.श्री ए. राजा साो पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५ पुणे शहर, मा. श्रीमती अश्विनी राख मॅडम, सहा. पोलीस आयुक्त हडपसर विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली श्री महेश बोळकोटगी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मुंढवा पोलीस ठाणे पुणे, श्रीमती सुनिता रोकडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), मुंढवा पोलीस ठाणे पुणे, तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक संदिप जोरे, संतोष काळे, संतोष जगताप, दिनेश भांदुर्गे, दिनेश राणे, महेश पाठक, राहुल मोरे, पोशि स्वप्नील रासकर, हेमंत पेरणे, सचिन पाटील यांनी केली आहे,
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६
फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/
आमचे व्हाट्सअप ग्रुप वर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..
https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX
आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad
संपादक :मुख्य संपादक वाजिद एस खान.
(APCS NEWS) बातमी महाराष्ट्राची आपल्या राज्यातील ताज्या घडामोडींसाठी ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. युट्युब चॅनेलला Like, Subscribe आणि Share करा.
https://youtube.com/@acspolicecrimesquadnews7356?si=u-F8fbHvqL3-QPQh
https://instagram.com/khanwajid.khan.79?igshid=NGVhN2U2NjQ0Yg==
संपर्क : 9822331526
वेबसाईट : apcs.in
