NIA ची पुण्यात मोठी कारवाई; २ जणांना अटक,apcs.in

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL NEWS

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

एनआयए’कडून पुण्यासह ठाणे, छापे, पुण्यातील तिघे ताब्यात,

आतापर्यंत जवळपास दहा ते बारा संशयितांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यात कोंढव्यातील तालाब मश्जीद परिसरात पहाटे करण्यात आलेल्या कारवाईमध्ये तीन जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

पुणे, 9 डिसेंबर,  (APCS NEWS) मुख्य संपादक वाजिद एस खान,

महाराष्ट्रात इसिस मॉड्युलशी संबंधित प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयएने पुन्हा एकदा पुण्यात मोठी कारवाई केली आहे. एनआयएकडून पुण्यामध्ये दोन ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. एनआयएकडून कोंढवा आणि मोमीनपुरा भागात छापेमारी करण्यात आली आहे.कोंढवा तालाब फॅक्टरी परिसरात असलेल्या इसेन्शिया सोसयटीमध्ये शोएब अली शेख याच्या घरी एनआयएने छापा टाकला आहे. या छाप्यामध्ये त्याच्या घरातून लॅपटॉप आणि मोबाईल जप्त करण्यात आला आहे.

तर दुसऱ्या घटनेत येथे असलेल्या गुलमोहर सोसायटीमध्ये अन्वर अली याच्या घरी देखील छापा टाकण्यात आला आहे. या छाप्यामध्ये मोबाईल लॅपटॅाप आणि एक सत्तूर जप्त करण्यात आला आहे. एटीएसच्या मदतीने ही छापेमारी करण्यात आली आहे.तर दुसरीकडे राष्ट्रीय तपास संस्थेने एकाचवेळी देशभरामध्ये ४१ ठिकाणी छापे टाकले आहेत. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, ठाणे ग्रामिण, ठाणे शहर, मीरा-भायंदर आणि कर्नाटकातील काही ठिकाणी एनआयएकडून छापे टाकण्यात आले होते. यामध्ये ISIS या दहशतवादी संघटेशी संबंधित १३ जणांना अटक करण्यात आली आहे.एनआयनएने पुण्यात दोन ठिकाणी, ठाणे ग्रामिणमध्ये ३१ ठिकाणी, ठाणे शहरात ९ ठिकाणी, मिरा भायंदरमध्ये एका ठिकाणी आणि कर्नाटकातील एका ठिकाणी छापे टाकले आहेत.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL NEWS

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे व्हाट्सअप ग्रुप वर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..

https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

संपादक :मुख्य संपादक वाजिद एस खान.

(APCS NEWS) बातमी महाराष्ट्राची आपल्या राज्यातील ताज्या घडामोडींसाठी ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. युट्युब चॅनेलला Like, Subscribe आणि Share करा.
https://youtube.com/@acspolicecrimesquadnews7356?si=u-F8fbHvqL3-QPQh

https://instagram.com/khanwajid.khan.79?igshid=NGVhN2U2NjQ0Yg==

संपर्क : 9822331526

वेबसाईट : apcs.in

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *