रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून समर्थ पोलिसांनी पिस्टल केले जप्त.apcs.in
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL NEWS

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराकडून समर्थ पोलिसांच्या पथकाने एक पिस्तूल, जिवंत काडतुस जप्त केले. सोमवार पेठ परिसरात ही कारवाई करण्यात आली. सिध्दीक रफिक खान (वय 24, रा. शिवनेरीनगर, कोंढवा खुर्द) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
दि.०८/१२/२०२३, (APCS NEWS) मुख्य संपादक वाजिद एस खान,
समर्थ पोलीस ठाणेकडील तपास पथकातील अधिकारी व पोलीस अंमलदार हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना पोलीस उप-निरीक्षक थोरवे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारा मार्फत इसम नामे सिद्दीक खान याचेकडे पिस्टल असुन तो रात्री समर्थ पोलीस स्टेशन हद्दीत असणा-या सोमवार पेठ पोलीस चौकी शेजारील समर्थ व्यायाम मंदिरासमोर सोमवारपेठ येथे त्याचे मित्रास भेटण्यासाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.

सदरची माहिती तात्काळ त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री.सुरज बंडगर समर्थ पोलीस ठाणे यांना दिली. त्यावरुन त्यांनी पोलीस उप-निरीक्षक, थोरवे यांना स्टाफसह सदर ठिकाणी जावुन कारवाई करण्याचे आदेशित केले. सदर ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक, थोरवे, अक्षयकुमार गोरड, सहा. पोलीस फौजदार, दत्तात्रय भोसले, पोलीस अंमलदार, प्रमोद जगताप, गणेश वायकर, हेमंत पेरणे यांनी सिध्दीक खान हा समर्थ व्यायाम शाळेसमोर त्याचे मित्रास भेटण्यासाठी आला असताना, त्यास स्टाफच्या मदतीने ताब्यात घेवुन, त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव सिध्दीक रफिक खान, वय-२४ वर्षे, रा. गल्ली नं.२३, शिवनेरीनगर, कोंढवा खुर्द, पुणे असे सांगितले.त्याची अंग झडती घेतली असता, त्याच्या उजव्या बाजुच्या कमरेस पॅन्टच्या आतमध्ये खोचलेला १ स्टिलचे पिस्टल मॅग्झीनसह मिळुन आले. तसेच पॅन्टच्या उजव्या खिशात गावठी पिस्टलचे १ काडतुस मिळुन आले.
त्याचेकडून एकुण १०,२००/-रु.कि.चे पिस्टल व काडतुस जप्त करून समर्थ पोलीस ठाणे येथे गु.र.नं.२६३/२०२३ शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३ (२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३)१३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर इसमावर यापूर्वी एक शरिरा विरुद्धचा गुन्हा दाखल आहे.

सदरची कामगिरी ही मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे, श्री. प्रविणकुमार पाटील, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-१, पुणे, श्री. संदिपसिंह गिल, मा. सहा. पोलीस आयुक्त फरासखाना विभाग, पुणे, श्री. अशोक धुमाळ, समर्थ पो स्टे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. सुरज बंडगर, पोलीस निरीक्षक, (गुन्हे), श्री. प्रमोद वाघमारे यांचे मार्गदर्शनानुसार तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक, सुनिल रणदिवे, पोलीस उप निरीक्षक, सौरभ थोरवे, अक्षयकुमार गोरड, दिपक यादव व सहायक पोलीस उप निरीक्षक, दत्तात्रय भोसले, पोलीस अंमलदार, प्रमोद जगताप, गणेश वायकर, संतोष डमाले, रोहीदास वाघेरे, रहीम शेख, हेमंत पेरणे, अमोल शिंदे, म. पोलीस अंमलदार वैशाली परदेशी व रागिनी शिंदे यांनी केली आहे.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL NEWS
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६
फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/
आमचे व्हाट्सअप ग्रुप वर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..
https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX
आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad
संपादक :मुख्य संपादक वाजिद एस खान.
(APCS NEWS) बातमी महाराष्ट्राची आपल्या राज्यातील ताज्या घडामोडींसाठी ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. युट्युब चॅनेलला Like, Subscribe आणि Share करा.
https://youtube.com/@acspolicecrimesquadnews7356?si=u-F8fbHvqL3-QPQh
https://instagram.com/khanwajid.khan.79?igshid=NGVhN2U2NjQ0Yg==
संपर्क : 9822331526
वेबसाईट : apcs.in
