अडीच महिन्यांपासून गुंगारा देणाऱ्या दोन वाँटेड आरोपींना लोणीकंद पोलिस स्टेशन तपास पथकाने ठोकल्या बेड्या.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTEL
लोणीकंद पो.स्टे ,२६/०६/२०२१ – दत्तवाडी पोलीस स्टेशन येथील खुनाचा प्रयत्न या गंभीर गुन्ह्यात अडीच महिन्यापासुन गुंगारा देणा – या ०२ वॉन्टेड आरोपीतांनालोणीकंद पोलीस स्टेशन तपास पथकाने ठोकल्या बेड्या .
ONLINE ONLINE NEWS (WAJID S KHAN)
दत्तवाडी पोलिस स्टेशन येथील खुनाचा प्रयत्न या गंभीर गुन्ह्यात अडीच महिन्यांपासून गुंगारा देणाऱ्या दोन वाँटेड आरोपींना लोणीकंद पोलिस स्टेशन तपास पथकाने ठोकल्या बेड्या.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTEL
लोणीकंद पोलीस स्टेशन तपास पथकाचा स्टाफ हा वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांचे मार्गदर्शनाखाली लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करीत असताना पोलीस नाईक ७६२१ कैलास साळुके यांना त्यांचे बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की , दत्तवाडी पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या खुनाचे प्रयत्ना मधील दोन आरोपी अदित्य चव्हाण व अक्षय नवले रा . जनता वसाहत , पर्वती पायथा , पुणे हे दोघे मॅपल हॉटेल समोर , उबाळे नगर येथे थांबलेले आहेत . अशी बातमी मिळाली सदर बातमीच्या अनुषंगाने तपास पथक प्रमुख पोलीस उप निरीक्षक सुरज किरण गोरे यांनी खात्री करुन सदर माहिती मा . वरिष्ठ पोलीस निरीक्षक वपोनि प्रताप मानकर यांना कळवुन त्यांचे मार्गदर्शन व सुचनापर आदेशान्वये सदर बातमीच्या ठिकाणी तपास पथक प्रमुख सुरज गोरे व तपास पथक यांना स्टाफसह मॅपल हॉटेल समोर , उबाळे नगर येथे जाऊन शोध घेतला असता सदर ठिकाणी दोन इसम वावरत असताना दिसुन आलेने त्यांना तपास पथक स्टाफच्या मदतीने ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नाव पत्ते विचारता त्यांनी त्यांची नावे १ ) आदित्य राहुल चव्हाण , वय १९ वर्षे , धंदा शिक्षण , रा . गल्ली नं १५ , जनता वसाहत , मार्शल बेकरी समोर पर्वती पायथा , पुणे ३०. २ ) अक्षय रमेश नवले , वय २० वर्षे , धंदा मजुरी , रा . गल्ली नं १४ , जनता वसाहत , मार्शल बेकरी समोर पर्वती पायथा , पुणे ३० असे सांगितले
त्यांना ताब्यात घेऊन लोणीकंद पोलीस स्टेशन येथे आणुन त्यांचेकडे अधिक चौकशी केली असता
त्यांचा दत्तवाडी पोलीस स्टेशन येथील दत्तवाडी पो . स्टे . गु . र . नं .८९ / २०२१ भा.द.वि. क . ३०७ , ४२७ , १४१ , १४३ , १४७ , १४८ , १४९ , ५०४ , ५०६ ( २ ) , आर्म अॅक्ट ४ ( २५ ) , महा.पो.का.क. ३७ ( १ ) ( ३ ) सह १३५ व क्रि.लॉ.अ.अ.क .०७ दाखल असलेल्या गुन्ह्यात वॉन्टेड आरोपी असलेचे निष्पन्न झाले . तसेच आरोपी नामे अक्षय रमेश नवले हा जबरी चोरीचे रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन त्याचेकडे तपास करुन आणखीन गंभीर गुन्हे उघडकीस येणेची शक्यता आहे . पुढील कार्यवाही करीता आरोपीतांना दत्तवाडी पोलीस स्टेशन यांचेकडे सुपुर्त करण्यात आलेले आहे .
यातील आरोपी क्रमांक ०२ हा मार्केट यार्ड पोलीस स्टेशन येथील जबरी चोरी मधील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.
सदरची कामगिरी मा . पोलीस उप आयुक्त परि . ०४ पंकज देशमुख सो , सहा . पोलीस आयुक्त येरवडा विभाग किशोर जाधव सो , व.पो.नि. प्रताप मानकर सो , यांचे मार्गदर्शनात तपास पथक प्रमुख पोलीस उप निरीक्षक सुरज किरण गोरे , सहा . फौजदार मोहन वाळके , पोना कैलास साळुके , पोना अजित फरांदे , पोना विनायक साळवे , पोलीस अंमलदार समीर पिलाणे , सागर कडु , बाळासाहेब तनपुरे यांनी केली
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTEL
ONLINE PORTEL NEWS 9822331526
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTEL