अंमली पदार्थाचे गुन्हयातील ( वॉन्टेड ) आरोपी कैलास पवार यांस जेरबंद.१२८ किलो ७६५ ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ , जप्त .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

दिनांक ०५/०२/२०२२ अंमली पदार्थ विरोधी पथक १,गुन्हे शाखा , पुणे शहर .

दहशतवाद विरोधी पथका कडील अंमली पदार्थाचे गुन्हयातील ( वॉन्टेड ) आरोपी कैलास पवार यांस जेरबंद करुन त्यांचेकडुन ३३,४१ ,९००/ – किंमतीचे मुद्देमालासह १२८ किलो ७६५ ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ , जप्त .

दिनांक ०५/०२/२०२२ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक -१ चे अंमलदार कार्यालयात हजर असताना त्यांना बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की , लोणीकंद पोलीस ठाणे चे कार्यक्षेत्रात गट नंबर ३६६ गडदेवस्ती डोंगरगाव , पेरणे , वाडेबोल्हाई रोड पुणे या ठिकाणी राहत असलेला व दहशतवाद विरोधी पथका कडील अंमली पदार्थाचे गुन्हयातील ( वॉन्टेड ) आरोपी कैलास साहेबराव पवार , वय ३५ वर्षे , रा.गट नंबर ३६६ गडदेवस्ती डोंगरगाव , पेरणे , वाडेबोल्हाई रोड पुणे हा त्याचे रहाते घरात गांजा हा अंमली पदार्थ बाळगुन त्याची विक्री करीत आहे . त्या प्रमाणे पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड सदर बातमी बाबत वरिष्ठांना कळवुन यांनी स्टाफ सह गट नंबर ३६६ गडदेवस्ती डोंगरगाव , पेरणे , वाडेबोल्हाई रोड पुणे या ठिकाणी छापा टाकला असता , सदर ठिकाणी इसम नामे कैलास साहेबराव पवार , वय ३५ वर्षे , रा.गट नंबर ३६६ गडदेवस्ती डोंगर गाव , पेरणे , वाडेबोल्हाई रोड पुणे याने त्याचे रहाते घरात व घरासमोर पार्क केलेल्या करोला टॉयाटो या चार चाकी गाडीत

एकुण १२८ किलो ७६५ ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ किं .

रु २५,७५,३००/ रोख रुपये ५०,६०० / एक मोबाईल फोन किरु १५००० / – चा एक करोला कंपनीची चारचाकी गाडी नंबर एम एच १२ एफ के ५७०४ किरु ७०००००/- ची असा एकुण ३३,४१,९००/ – किंमतीचा अंमली पदार्थ व ऐवज अनाधिकाराने बेकायदेशिररित्या विक्री करता जवळ बाळगताना मिळुन आला . सदरचा सर्व मुद्देमाल अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा पुणे शहर यांनी जप्त केला तसेच नमुद इसम नामे कैलास साहेबराव पवार याचे विरुध्द पोलीस अमं मनोजकुमार शिवाजी साळुंके अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा पुणे शहर यांनी लोणीकंद पोलीस ठाणे येथे त्याचे विरुध्द एन.डी.पी.एस.अॅक्ट कलम ८ ( क ) ,२० ( ब ) , ii ( क ) अन्वये कायदेशीर फिर्याद दिली आहे .

सदरची कारवाई श्री अमिताभ गुप्ता , पोलीस आयुक्त , पुणे शहर , डॉ . रविंद्र शिसवे , सह पोलीस आयुक्त , पुणे शहर , श्री . रामनाथ पोकळे , अपर पोलीस आयुक्त , गुन्हे , श्री . श्रीनिवास घाडगे , पोलीस उप आयुक्त , गुन्हे , पुणे , श्री गजानन टोम्पे , सहाय्यक पोलीस आयुक्त , गुन्हे १ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड , पोलीस अंमलदार सुजित वाडेकर , मनोज साळुंके , पांडुरंग पवार , विशाल दळवी , मारुती पारधी , राहुल जोशी , विशाल शिंदे , संदेश काकडे , रेहना शेख , योगेश मोहिते यांनी केली आहे .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. 9822331526

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *