पुणे महापालिकेच्या उपायुक्तांकडे सापडले एक कोटी , पुणे एसीबीकडून FIR.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

पुणे महापालिकेच्या उपायुक्तांकडे सापडले एक कोटी ,

पुणे : पुणे महापालिकेच्या ( PMC ) एका उपायुक्तांसह त्यांच्या पत्नीवर अवैधरित्या सुमारे एक कोटी रुपयांची संपत्ती जमवल्याप्रकरणी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल ( FIR ) केला आहे .

याप्रकरणी, उप आयुक्तांसह त्यांच्या पत्नीवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे,

पुणे महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाचे उपायुक्त व त्यांच्या पत्नीवर कोथरुड पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि ५) गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

आकाशचिन्ह विभागाचे उपायुक्त विजय भास्कर लांडगे आकाशचिन्ह विभाग उपायुक्त विजय भास्कर लांडगे वय ४९ ) आणि त्यांच्या पत्नी शुभेच्छा विजय लांडगे ( वय ४३ ) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

महापालिकेत अभियंता म्हणून रुजू झालेले विजय लांडगे २००८ च्या काळात क्षेत्रिय कार्यालय उपायुक्त म्हणून कार्यरत झाले. घोले रोड, येरवडा क्षेत्रिय कार्यालय आदि ठिकाणी क्षेत्रिय अधिकारी (उपायुक्त) म्हणून काम केले. त्यानंतर गेल्या दोन वर्षांपासून त्यांच्याकडे आकाशचिन्ह व परवाना विभाग प्रमुखाची जबाबदारी देण्यात आली होती. सध्या ते पालिकेच्या तांत्रिक विभागाचे उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत.

याप्रकरणी सरकारतर्फे पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक भारत साळुंखे यांनी फिर्याद दिली आहे . उपायुक्त विजय लांडगे यांच्या घराची सकाळपासून झाडाझडती सुरु होती . लांडगे आणि त्यांच्या पत्नीची पुणे एसीबीच्या ( Pune ACB ) अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात आली . चौकशी दरम्यान विजय लांडगे व त्यांच्या पत्नी शुभेच्छा लांगडे यांच्याकडे १ कोटी २ लाख ६० हजार ९९३ रुपयांची अधिकची संपत्ती आढळून आली .

लांडगे यांनी २४ फेब्रुवारी २००० ते १९ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत एवढी अधिकची संपत्ती जमवल्याचे चौकशीत निष्पन्न झाले .

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे पथकाने केली . पुढील तपास पोलीस उप अधीक्षक शीतल घोगरे करीत आहेत .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.९८२२३३१५२६

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *