पारगे नगर पोकळेमळा डीपी रस्ता खुला करा.नागरिक अधिकार मंचच्या नेतृत्वाखाली न आंदोलन करण्यात आले..

ACS POLICE CRIME SQUAD

कोंढवा :पोकळेमळा डीपी रस्ता खुला करा ठ नागरिक अधिकार मंचचे परिसरातील नागरिकांसह आंदोलन कोंढवा ,

दि . १ ( प्रतिनिधी ) पोकळेमळा येथील २० मीटर डीपी रस्ता खुला करण्यात यावा , अशी मागणी करीत पारगेनगर भागातील नागरिकांसह नागरिक अधिकार मंचच्या नेतृत्वाखाली न आंदोलन करण्यात आले . दिनांक १/११/२०२१ रोजी नागरिक अधिकार मंचच्या नेतूरत्वा खाली पारगे नगर ,पोकळे मळा मधील राहिवाशिंच्या वतीने २० मीटर डीपी रस्ता नागरिकांसाठी खुला करण्यात यावा म्हणून मोर्चा काढत पारगे नगर भागात आंदोलन करण्यात आले.

सदर स. न .३८ व ३७ पारगे नगर या ठिकाणी २० मीटर डीपी रोड असून सदर डीपी रोड बांधकाम व्यवसाईक कडून पत्रे लावून बंद करण्यात आले आहे सदर डीपी रस्ता हा २००४ साली पुणे मनपाच्या ताब्यात आला असून आज पर्यंत पुणे मनपाने नागरिकांसाठी खुला केलेले नाही त्यामुळे परिसरात वाहतूक कोंडी होत असते रस्ता बंद असल्यामुळे परिसरात बेकायदेशीर जमाव असतो त्याच प्रमाणे कौसर बाग बायपास ते कोंढवा बुद्रुक पर्यंतचा वाहतूक कोंडीचा प्रशन या निमित्त सुटेल कोंढवा सासवड मुख्य रस्त्याचा ताण या मुळे कमी होणार पुणे मनपाला वारंवार विनंती करून देखील पुणे मनपा कडून या रस्त्याला दुर्लक्ष केला जात आहे त्यामुळे आज नागरिक अधिकार मंचच्या अध्यक्ष समीर शफी पठाण यांच्या नेतुर्ताव खाली राहिवाशिंच्या वतीने पारगे नगर डीपी रोड समोर मोर्चा काढण्यात आले व येत्या १५ दिवसात जर हा रस्ता खुला करण्यात आलं नाही तर राहिवशींच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आलं.

या वेळेस उपस्थित कुमार कुमार सुरक्षा सोसायटी ,कुमार संसार,यश रिधम,कुमार सबलाईम ,होम वूड ,dsk गार्डन,कुमार पामग्रूव,alcon रॉईस ,साई enclave,व इतर नागरिक मोठ्या संख्याने उपस्थित होते.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *