पु.ना.गाडगीळ ज्वेलर्स व चंदुकाका सराफ अँन्ड सन्स प्रा. लिमीटेड यांचे दुकानातून चोरी करणारे महिलेकडून १२ सोने चोरीच्या घटना उघड.

ACS POLICE CRIME SQUAD

पु.ना.गाडगीळ ज्वेलर्स व चंदुकाका सराफ अँन्ड सन्स प्रा. लिमीटेड यांचे दुकानातून चोरी करणारे महिलेकडून १२ सोने चोरीच्या घटना उघड. सव्वा सहा लाख रूपयाचे सोन जप्त हडपसर पोलीसांची कामगिरी.

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

दिनांक २३.११.२०२१ रोजी हडपसर पोलीस ठाणे हद्दीतील चंदुकाका सराफ अँन्ड सन्स प्रा. लिमीटेड मगरपट्टा हडपसर पुणे व पु.ना.गाडगीळ ज्वेलर्स मगरपट्टा हडपसर पुणे यांचे दुकानात एक महिला वय अंदाजे ४२ वर्ष ही दुकानात येवून काऊंन्टरवर असलेल्या इसमास सोन्याचे अंगठ¬ा दाखवीण्यास सांगून, त्या पाहत असताना समोरील व्यक्तीचे लक्ष विचलीत करून सोन्याची अंगठी ही हातचलाखी करून काढून घेवून त्या ठिकाणी दुसरी बनावट अंगठी ठेवून निघून गेल्याने हडपसर पोलीस ठाणे गु.र.नं 1048/2021 व 1049/2021 भा.दं.वि.क 380 प्रमाणे अनुक्रमे पु.ना.गाडगीळ ज्वेलर्स मगरपट्टा हडपसर पुणे व चंदुकाका सराफ अँन्ड सन्स प्रा. लिमीटेड मगरपट्टा हडपसर पुणे यांनी दिले तक्रारीवरून दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते.
दाखल गुन्ह्राचा तपास मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अरविंद गोकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक प्रमुख सहा.पोलीस निरीक्षक, हनुमंत गायवकवाड, पोलीस उप निरीक्षक सौरभ माने, पोलीस अंमलदार प्रदीप सोनवणे, प्रशांत दुधाळ, शशिकंात नाळे, असे करीत असताना, सहा.पोलीस निरीक्षक, हनुमंत गायवकवाड यांनी अशा प्रकाराच्या गुन्ह्राच्या पध्दतीची माहीती घेतली असता, रविवार पेठ, कोथरूड, चिंचवड, चाकण, भोसरी, सहकारनगर इत्यादी ठिकाणी असलेल्या चंदुकाका सराफ, पु.ना.गाडगीळ, रांका ज्वेलर्स, मलबार, ब्ल्यु स्टोन अशा नामांकित सराफी दुकानांच्या शाखेत गुन्हे घडले असल्याची माहीती मिळाली. या महिलेने पुणे शहरातील इतर चो­यांचे गुन्हे केलेबाबतचे फुटेज प्राप्त करून, त्याची पडताळणी केली असता, “ नमुद महिला ही सोन्याचे अंगठी पाहण्यास मागून, ती दाखवीत असताना हातचलाखी करून मुळ अंगठी काढून घेवून त्या ठिकाणी दुसरी बनावट अंगठी ठेवून निघून जात असल्याचे ” अनेक ठिकाणच्या फुटेजमध्ये दिसून आले. त्यामुळे अशा प्रकारच्या गुन्ह्राची व्याप्ती वाढल्याने तपासपथकातील अधिकारी पोलीस उप निरीक्षक, सौरभ माने, पोलीस अंमलदार प्रदीप सोनवणे, प्रशांत दुधाळ, शशिकांत नाळे यांनी हडपसर भागातील चंदुकाका सराफ अँन्ड सन्स प्रा. लिमीटेड मगरपट्टा हडपसर पुणे व पु.ना.गाडगीळ ज्वेलर्स मगरपट्टा हडपसर पुणे यांचे दुकानातील सी.सी.टी.व्ही कॅमेरे तपासून सदर संशयीत महिलेची चेहरेपट्टी, हावभाव, चालण्याची पध्दत याची सखोल माहीती घेवून त्याआधारे मगरपट्टा हडपसर ते बिबवेवाडी पर्यंतचे अनेक ठिकाणचे फुटेज पाहत नमुद संशयीत महिला ही बिबवेवाडी पर्यंत गेली असल्याचे दिसून आले.


दिनांक ३०.११.२०२१ रोजी दुपारी १५.३० वा.चे सुमारास तपासपथक महिला पोलीस अंमलदार यांच्यासह सराफी दुकानांच्या परिसरात पेट्रोलींग करीत असताना, पोलीस अंमलदार प्रदीप सोनवणे आणि प्रशांत दुधाळ यांना मिळालेल्या बातमीवरून, फुटेज मधिल संशयीत महिलेशी मिळत्या जुळत्या वर्णनाची महिला सराफी दुकानांसमोरून मॉलकडे जात असल्याबाबत माहीती मिळाल्याने. सदर ठिकाणी जावून मिळून आलेल्या महिलेकडे, तिचे प्राप्त फुटेज दाखवून खात्री करीत असताना, ती कावरी बावरी होवून घाबरली. तिला तिचे नाव पत्ता विचारता तिने तिचे

नाव पुनम परमेश्वर देवकर वय ४२ वर्ष रा. बिबवेवाडी पुणे असे असल्याचे सांगीतले. तिला पोलीस ठाणे येथे आणून अधिक तपास केला असता तिने चंदुकाका सराफ अँन्ड सन्स प्रा. लिमीटेड मगरपट्टा हडपसर पुणे व पु.ना.गाडगीळ ज्वेलर्स मगरपट्टा हडपसर येथील गुन्हे केले असल्याची कबुली दिली. त्यानंतर तिचेकडे विश्वासात घेवून अधिक तपास करता तिने रविवार पेठ, कोथरूड, चिंचवड, चाकण, भोसरी, सहकारनगर इत्यादी ठिकाणी अशा प्रकारचे गुन्हे केली असल्याची कबुली दिली.

सदर महिलेकडून एकुण वेगवेगळ्या ठिकाणचे चोरीच्या १२ घटना उघडकीस आले असून तिचेकडून किं.रू ६,२३,२३८/- च्या १२ सोन्याच्या अंगठ¬ा जप्त करून करण्यात आलेल्या आहेत.
आरोपी पुनम परमेश्वर देवकर वय ४२ वर्ष रा. बिबवेवाडी पुणे ही सन २००५-०६ या कालावधीत अष्टेकर ज्वेलर्स, लक्ष्मीरोड या ठिकाणी सेल्समन म्हणून दुकानात कामास होती. सदर ठिकाणी कामास असताना, चोरी केल्यामुळे विश्रामबाग पोलीस ठाणेस गुन्हा दाखल झालेला होता. आरोपी महिलेस सराफी दुकानातील कामाचा अनुभव असल्याने सोन्याचे दागिन्यावर स्टिकर कसे लावायचे याबाबत तिला ज्ञान होते. आरोपी महिला ही दुकानात दागीने पाहण्यास गेल्यानंतर सोन्याचे अंगठ¬ा पाहण्याचा बहाणा करीत असत, व त्या दरम्यान कधी पाणी व चहाची मागणी करून / सेल्समनचे लक्ष विचलीत करून / आणखी सोन्याच्या अंगठ¬ा दाखवण्यास सांगून मुळ सोन्याची अंगठी तिचे डाव्या हातातील मोबाईलचे खाली लपवून तिच्याकडील बनावट सोन्याची अंगठी त्यावर यापुर्वीचे ठिकाणाहून चोरून आणलेले सोन्याचे अंगठीचे लेबल लावून ती, सोन्याचे अंगठीचे ट्रे मध्ये ठेवून देत असत, त्यामुळे केलेली हातचलाखी ही सेल्समनला लवकर समजुन येत नव्हती. परंतु काही दिवस गेल्यानंतर दागिन्यांची पाहणी करीत असताना घडलेला प्रकार हा फुटेजच्या आधारे उघडकीस आलेनंतर सराफी व्यावसायीकांच्या लक्षात येत होते. अशा पध्दतीने वरिल महिला ही गुन्हे करीत असत.
दाखल गुन्ह्राचा पुढील तपास प्रदीप सोनवणे, पोलीस हवालदार, हडपसर पोलीस ठाणे पुणे शहर हे कारीत आहेत..

सदरची कामगिरी ही मा.श्री.नामदेव चव्हाण, अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे व मा. नम्रता पाटील,पोलीस उप आयुक्त,परिमंडळ ५ पुणे शहर, यांचे सुचना व मागदर्शनाखाली मा.श्री. कल्याणराव विधाते, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, श्री. अरविंद गोकुळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन,पुणे शहर, पोनि.(गुन्हे) श्री. राजु अडागळे, पोनि.(गुन्हे) श्री. दिगबंर शिंदे यांचे सुचनाप्रमाणे तपास पथकाचे सहा.पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड, पोलीस उप निरीक्षक सौरभ माने, पोलीस अंमलदार, प्रदीप सोनवणे, गणेश क्षिरसागर, अविनाश गोसावी, संदीप राठोड, समीर पांडुळे, शशिकांत नाळे, सचिन जाधव, शाहीद शेख, प्रशांत दुधाळ, निखील पवार, प्रशांत टोणपे, रियाज शेख, सचिन गोरखे, सुरज कुंभार, महिला पोलीस नाईक पिसे यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526


ACS POLICE CRIME SQUAD

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *