फुटपाथवरील व्यावसायीकांना खंडणी मागणारे सराईत गुन्हेगारांना तात्काळ अटक.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

युनिट १ गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार अजय थोरात व राहुल मखरे ची कामगिरी .

दिनांक १०/१२/२०२१ युनिट १ , गुन्हे शाखा पुणे शहर दरोडा टाकुन फुटपाथवरील व्यावसायीकांना खंडणी मागणारे सराईत गुन्हेगारांना तात्काळ केले गजाआड .

दिनांक ०९ /१२ / २०२१ रोजी साय ०६.३० वा सुमारास एम जी रोड सारेगामा दुकानासमोर कॅम्प पुणे येथे फुट पाथवर कपडे विक्री करणारे फिर्यादी नामे सदाम हुसेन हे व्यवसाय करीत असताना त्याठिकाणी दुकान लावायाचे नाही असे म्हणुन शानु शेख व त्याचे ४ साथीदार हे वाद घालत होते शानु शेख याने मे ईधर का भाई हे कल से ईधर धंदा लगना नहीं लगना है तो मुझे हप्ता देणे का असे म्हणुन विक्री करता ठेवलेले कपड़े फेकून देवुन गाडीत ठेवलेली पालघन काढून हातात घेवुन फिर्यादी वर वार केला असता तो फिर्यादी यांनी हुकवुन पळुन जाण्याचा प्रयत्न केला असता ईतर साथीदार यांनी हाताने पायाने मारहाण करुन शिवीगाळ करुन फिर्यादीचे कडील धंदयाचे ३५०० / – रु काढून घेतले . शानु शेख याने हातातील पालघन हवेत फिरवत आजुबाजुचा पथारी वाल्यांना धमकावत होता त्यामुळे पथारीवाले घाबरुन पळुन गेले म्हणुन इसम नामे सदाम हुसेन यांनी इसम नामे शानु शेख व त्याचे ४ साथीदाराविरुध्द लष्कर पोलीस ठाणे गुन्हा नोंद क्रमांक- १६४/२०२१ भादंवि कलम ३९५,३८६,३२३,५०४,३४ आर्म अॅक्ट ४ ( २५ ) व मपोका कलम ३७ ( १ ) सह १३५ क्रीमीनल अमेंडमेंट कलम ७ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे .

वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री शैलेश संखे यांच्या मार्गदर्शन व सुचनेनुसार युनिट १ कडील अधिकारी व अंमलदार असे युनिट १ चे कार्यक्षेत्रात पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार अजय थोरात व राहुल मखरे यांना त्यांच्या खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की कॅम्पमध्ये फुटपाथवर कपडे दुकानास लुटणारे दोन आरोपी हे सिकंदर शेख व आवेज सय्यद हे केईएम हॉस्पीटल रास्ता पेठ पुणे येथे आहे अशी माहीती मिळाली . सदरची माहीती त्यांनी आम्हास दिली आम्ही सदर बातमीची वरीष्ठांना माहीती देवुन त्यांच्या परवानगीने मिळालेल्या बातमीची खात्री करुन पुढील योग्य ती कारवाई करण्यासाठी आदेशित दिले . त्याप्रमाणे आम्ही दिलेल्या आदेशान्वये युनिट १ कडील अधिकारी व अंमलदार असे खाजगी वाहनाने मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जाऊन खात्री करुन सुमारे रात्रौ २३.४५ वा . सुमारास सोबतच्या स्टाफचे मदतीने दोघांना ताब्यात घेतले व युनिट -१ कार्यालयात आणले .

नावे पत्ते विचारता त्यांनी आपले नावे १ ) सिंकदर पाशमिया शेख वय २२ वर्षे रा . गल्ली नं १७ / ए आयशा मस्जिद शेजारी सय्यदनगर हडपसर पुणे ,

२ ) आवेज अय्याज सय्यद वय २० वर्षे रा . पंच हौद चौक ७५१ गुरुवार पेठ पुणे

अशी असल्याची सांगितली . त्यांच्याकडे चरील दाखल गुन्हया बाबत एकत्रित व स्वतंत्रपणे सखोल चौकशी करता त्यांनी सदरचा गुन्हा शानु शेख व इतर साथीदारासह केल्याचे कबुल केले . नमुद आरोपी यांना पुढील कार्यवाहीकरीता त्यांची वैद्यकीय व कोवीड -१ ९ ची वैद्यकीय तपासणी करुन लष्कर पोलीस ठाणेस वर्ग करण्यात आलेले आहेत .

सदर आरोपी हे सराईत गुन्हेगार असुन त्याचेवर वानवडी येथे बलात्कार , शस्त्र बाळगणे , मारामारी असे गुन्हे दाखल आहेत .

सदरची कामगिरी मा.पोलीस आयुक्त पुणे शहर श्री अमिताभ गुप्ता , मा . पोलीस सह आयुक्त पुणे शहर डॉ . रविंद्र शिसवे , मा . श्री रामनाथ पोकळे , अपर पोलीस आयुक्त , गुन्हे पुणे मा . श्री श्रीनिवास घाडगे पोलीस उप – आयुक्त , गुन्हे व मा . श्री गजानन टोम्पे सहाय्यक पोलीस आयुक्त , गुन्हे -१ यांच्या मार्गदर्शनाखाली श्री शैलेश संखे वरीष्ठ पोलीस निरीक्षक युनिट १ गुन्हे शाखा पुणे शहर यांच्या सुचनेनुसार पोउपनि संजय गायकवाड , पोउपनि सुनिल कुलकर्णी , पोलीस अंमलदार अजय थोरात , राहुल मखरे , सतीश भालेकर , इम्रान शेख , अमोल पवार , महेश बामगुडे , तुषार माळवदकर , शशीकांत दरेकर यांनी केलेली आहे .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *