घातक शस्त्र घेऊन सोशल मीडियावर दहशत निर्माण करणारा जेरबंद.

ACS POLICE CRIME SQUAD

घातक शस्त्र घेऊन सोशल मीडियावर दहशत निर्माण करणारा जेरबंद.

रेकॉर्ड वरील वाहनचोर व तडीपार ,फरारी पाहिजे आरोपीला दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक २ गुन्हे शाखा ने केली कारवाई.

आज दि १०/१२/२०२१ रोजी दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक २,गुन्हे शाखा,पुणे शहर यांचेकडील सपोनि विवेक पाडवी , सपोफौ उदय काळभोर, पो हवा राजेश अभंगे, दिनकर लोखंडे ,राजेश लोखंडे,पो ना सुदेश सकपाळ , मनोज खरपुडे, गणेश लोखंडे, पोशि अमोल सरतापे, हे पूर्व विभागाच्या हद्दीत रेकॉर्ड वरील वाहनचोर व तडीपार ,फरारी पाहिजे आरोपी चेक करीत असताना सोशल .पो ना मनोज खरपूडे.याना मिळालेल्या गोपनीय बातमीनुसार ग्लायडिंग सेंटर ग्राऊंड चे भिंतीजवळ ,हडपसर, पुणे, येथे एक २० ते २५ वयाचा रंगाने काळासावळा इसम हा अंगावरील कपड्यात एक घातक हत्यार घेऊन थांबलेला आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदर आरोपीस ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे

नाव आकाश दत्तात्रय कोठावळे,वय २५ वर्ष रा स.न. २३१, डी. विंग,फ्लॅट न.७ निलेश प्रिस्टेज सोसा. काळेपडळ हडपसर,पुणे असल्याचे सांगितले त्याची अंगझडती घेता त्याच्या .कब्जात कि.रु.३००/- चा एक लोखंडी कोयता मिळुन आल्याने.त्याचे विरुद्ध फिर्याद देवून .हडपसर पोलिस स्टेशन येथे गु.रजि.नं. १०८४/२०२१ भारतीय हत्यार कायदा ४(२५), महा.पो.का.क ३७(१) (३) सह १३५ अन्वये.गुन्हा दाखल करुन पुढिल कारवाई कामी आरोपी व मुद्देमाल हडपसर पोलिस स्टेशन कडे ताब्यात देण्यात आला आहे.

सदरची कामगिरी सपोनि विवेक पाडवी , सपोफौ उदय काळभोर, पो हवा राजेश अभंगे, दिनकर लोखंडे राजेश लोखंडे,पो .ना सुदेश सकपाळ, मनोज खरपुडे, गणेश लोखंडे,पोशि अमोल सरतापे, यांनी केली आहे.


(सुनील पंधरकर ) वरिष्ठ पोलिस निरीक्षक

दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक २ गुन्हे शाखा, पुणे शहर.

ACS POLICE CRIME SQUAD

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

          

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामण तालीम( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *