खडक पोलीस स्टेशनची कामगिरी मंगळसुत्र चोरुन पळुन जाणा – या अट्टल चोरास अटक

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

०७/०७/२०२१ खडक पोलीस स्टेशन पुणे शहर मॉर्निंग वॉक साठी जाणा – या वृध्द महिलेच्या गळयातील सोन्याचे मंगळसुत्र चोरुन पळुन जाणा – या अट्टल चोरास अटक

ONLINE PORTAL NEWS

सदर बाबत अधिक माहिती अशी की , दिनांक ७/७/२०२१ रोजी सकाळी ६/३० वा सुमा . सिलाई वर्ल्ड दुकानाचे समोर , बाजीराव रोड पुणे येथुन मार्निंग वॉक जाणा – या वृध्द महिला नामे श्रीमती मंगला रघुनाथ तिखे वय ७९ वर्षे रा.शुक्रवार पेठ , पुणे हया एकटया जात असतांना तिचे गळयातील ६५,००० / – रु किं चे एक सोन्याचे मंगळसुत्र १७ ग्रॅम वजनाचे असे हिसका मारुन जात असतांना अज्ञात आरोपी इसम जात असतांना , त्या महिलेने प्रसंगवधान दाखुवन चोर चोर असे मोठ मोठयाने आरडा ओरड करुन , रस्त्याचे पलीकडील बाजुस तिचा मुलगा प्रसाद तिखे व सुन प्राची तिखे असे वॉकींग करत असतांना त्यांना आवाज ऐकु आल्याने त्यांनी व आजुबाजुस वॉकींगसाठी जाणा – या इसम त्यास पकडण्यासाठी गेले असतांना , त्यांना पाठीमागे कंबरेस खोचुन ठेवलेले लोखंडी खुरपे काढुन त्यांचे अंगावर उगारत असतांना खडक पोलीस कडील सी.आर.मोबाईल वरील गस्तीवरील पोलीसांनी पब्लीकच्या मदतीने मंगळसुत्र हिसका मारुन पळुन जाणा – या इसमांस पकडुन खडक पोलीस स्टेशन पुणे येथे आणले त्यास नाव पत्ता विचारता कुणाल राजु खरात , वय २५ वर्षे रा दत्तवाडी पोलीस ठाणेसमोर , गजानन महाराज चौक , लक्ष्मीनगर , पुणे असे सांगुन त्याचेकडुन चोरलेले वरील वर्णनाचे सोन्याचे मंगळसुत्र व लोखंडी खुरपे ताब्यात घेण्यात आले आहे . त्याचेकडे वरील गुन्हयाचे संदर्भात तपास करता , त्याचा आणखी एक साथीदार मुकेश कांबळे रा.दत्तवाडी पुणे हा असुन तो अॅक्टीव्हा गाडीवरुन पळुन गेला असल्याचे सांगितले . झाले प्रकारा बाबत इसम नामे प्रसाद रघुनाथ तिखे वय ५५ वर्षे रा . शुक्रवार पेठ पुणे यांनी खडक पोलीस स्टेशन पुणे येथे गुन्हा रजि नं २५०/२०२१ भा.दं.वि क ३९७ , ३४ प्रमाणे गुन्हा केला आहे .

ONLINE PORTAL NEWS

आरोपी कुणाल राजु खरात याचा पुर्व इतिहास पाहता त्याचे विरुध्द सहकानगर , दत्तवाडी , मार्केटयार्ड , भारती विदयापीठ यांचे विरुध्द गंभीर दुखापत पोचविणे करणे , वाहनचोरी , लहान मुलांचे लैगींक अत्याचार इत्यादी स्वरुपाचे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत .

गुन्हयाचा अधिक तपास श्री.राहुल खंडाळे पोलीस उप निरीक्षक खडक पोलीस स्टेशन पुणे हे करीत आहेत .

नमुद सर्व कारवाई ही श्री . अभिताभ गुप्ता , पोलीस आयुक्त पुणे शहर , डॉ . श्री संजय शिंदे , अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे , श्री सागर पाटील पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ ( अतिरीक्त कार्यभार परिमंडळ १ ) व श्री . सतिश गोवेकर , सहा पोलीस आयुक्त , फरासखाना विभाग यांचे मार्गदर्शनाखाली खडक पोलीस स्टेशन चे श्री . श्रीहरी बहिरट , वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री . हर्षवर्धन गाडे पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) , तपास पथकाचे प्रभारी पोलीस उप – निरीक्षक राहुल खंडाळे , पोलीस उप निरीक्षक श्री . विक्रम मिसाळ व पोलीस अंमलदार यांनी केली आहे .

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *