दगडूशेठ गणपतीच्या दर्शनच्या रांगेत चोरी.

ACS POLICE CRIME SQUAD

दगडूशेठ गणपतीच्या दर्शनच्या रांगेत चोरीचा प्रयत्न करणाऱ्या दोन महिलांना अटक.

पुणे, दि. १९ नोव्हेंबर : पुण्यातील दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी रांगेत थांबलेल्या मुलीच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरी करणाऱ्या दोन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ही घटना दि. १८/११/२०२१ दु. १२.३० वा.च्या सुमारास घडली आहे.

याबाबत देवेंद्र रेड्डी (वय-३४, रा. पिंपळे गुरव, पुणे) यांनी फिर्याद दिली असून, उषा शिंदे (वय-३४) व खुशीवर्ता भोसले (वय-२६ वर्षे, दोघीही रा. पारधीवस्ती, नेवासा, अहमदनगर) यांच्याविरुद्ध विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्याद रेड्डी हे त्यांची पत्नी व मुलीसह दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसरात दर्शनासाठी रांगेत थांबले होते. त्यावेळी वरील दोन महिलांनी त्यांच्या मुलीच्या गळ्यातील सोन्याची चैन जबरदस्तीने ओढून चोरी करण्याचा प्रयत्न केला.

पुढील तपास विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस उप निरीक्षक पाटील करीत आहेत.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *