सिटी प्लाझा बार अॅण्ड रेस्ट्रारंट या हॉटेल चालकासह १६ तळीरामांना स्वारगेट पोलीसांचा दणका

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

दिनांक -२२ / ०७ / २०२१ स्वारगेट पोलीस ठाणे पुणे शहर कोव्हीड काळात हॉटेल संबधी लागु असलेले शासन आदेश झुगारुन हॉटेल चालवणा – या हॉटेल चालकासह १६ तळीरामांना स्वारगेट पोलीसांचा दणका

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

दि .२१ / ०७ / २०२१ रोजी रात्रौ २१-३० वा स्वारगेट पोलीस स्टेशन हददीत बीट मार्शल गस्त करीत असताना पाटील प्लाझा परिसरातील हॉटेल चालू असल्याचे निर्दशनास आले सदर ठिकाणी जावून खात्री केली असता “ सिटी प्लाझा बार अॅण्ड रेस्ट्रारंट ” हे हॉटेल शासनाने विहीत केलेल्या नियमाचे उल्लघंन करुन सुरु असल्याचे दिसले व सदर रेस्ट्रांरटमध्ये गि – हाईकाची सामाजीक अंतर न पाळता मोठया प्रमाणावर गर्दी आढळून आली करीता सदर हॉटेल चालकासह इतर १६ जणावर स्वारगेट पोलीस स्टेशन येथे १२७/२१ भा द वि कलम २६९ , २७०,१८८ तसेच साथरोग अधिनियम कलम ०३ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे व संबधीताना लागलीच ताब्यात घेवून योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक लोहोटे हे करीत आहेत .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

सदर कार्यवाही ही श्री.संजय शिंदे साो , अप्पर पोलीस आयुक्त , पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे , श्री सागर पाटील , पोलीस उप – आयुक्त , परिमंडळ -०२ , पुणे , मा.सुषमा चव्हाण , स्वारगेट विभाग , पुणे मा.श्री बाळासाहेब कोपनर , वरीष्ठ पोलीस निरीक्षक स्वारगेट पो स्टे , व मा . श्री सोमनाथ जाधव पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) , पुणे यांचे मार्गदर्शनाखाली स्वारगेट पोलीस स्टेशन येथील अधिकारी व कर्मचारी यांनी केलेली आहे .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

ONLINE PORTAL NEWS ONLY POLICE

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *