सराईत गुन्हेगारांकडुन ४ पिस्टल व १४ जिवंत काडतुसे जप्त पिंपरी चिंचवड दरोडा विरोधी पथक पोलिसांची कामगिरी.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL NEWS

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
सराईत गुन्हेगारांकडुन ४ पिस्टल व १४ जिवंत काडतुसे जप्त पिंपरी चिंचवड दरोडा विरोधी पथक पोलिसांची कामगिरी.
पिंपरी चिंचवड,दि.२७ (APCS NEWS) मुख्य संपादक वाजिद एस खान.
मा. पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चोबे साो. यांनी पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये अवैध शस्त्र बाळगणा-या इसमांची बातमी प्राप्त करुन त्यांचेविरुध्द कडक कार्यवाही करणेबाबत आदेश दिलेले होते.
पिंपरी-चिंचवड दरोडा विरोधी पथकाने पोलीसांनी केलेल्या कारवाईत दोघांना चार पिस्टल व १४ जिवंत काडतुसासह रविवारी दि.२५ रोजी अटक केली आहे. अटक आरोपी चे नाव, प्रमोद सोपान सांडभोर (वय ३३, रा. तळेगाव दाभाडे) व शरद मुरलीधर साळवे (वय ३०, रा. काळेवाडी), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६
त्याअनुषंगाने पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांचे अधिपत्याखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अंबरिष देशमुख, पोलीस नाईक १४५८ आशिष बनकर, पोलीस नाईक १२३४ प्रविण कांबळे, पोलीस नाईक १७२२ गणेश कोकणे, पोलीस नाईक १०६२ गणेश हिंगे, पोलीस शिपाई २६४३ गणेश सावंत, पोलीस शिपाई २९४७ विनोद वीर व पोलीस शिपाई २६७३ सुमित देवकर या पथकाने दि. २५/०६/२०२३ रोजी २०/१५ वा दरम्यान तळेगाव दाभाडे एस टी बस स्टॅण्ड परिसरामध्ये सापळा लावला असताना सराईत आरोपी नामे
१. प्रमोद सोपान सांडभोर वय ३३ वर्षे, रा तळेगाव स्टेशन जवळ, हरणेश्वर वाडी, बौध्द विहार जवळ, तळेगाव – दाभाडे, पुणे
२. शरद मुरलीधर साळवी, वय ३० वर्षे, रा धनगर बाबा मंदीर मागे ज्ञानेश्वर कॉलनी, काळेवाडी, पुणे.मुळ रा महारवाडा, अवहातरबाला, बदनापुर, जालना
हे त्याठिकाणी एका निळया रंगाच्या मारुती सुझुकी ऑल्टो कार मध्ये येवुन खाली उतरले. पोलीसांनी त्यांना पकडणेकरीता सापळा लावले असल्याचे त्यांचे लक्षात आल्यावर नमुद आरोपी हे वेगवेगळया दिशेने पळुन जाण्याच्या प्रयत्नात असताना नमुद पथकाने अतिशय शिताफीने त्यांचा पाठलाग करुन ताब्यात घेतले. सदर दोन्ही आरोपी यांची झडती घेतली असता त्या दोघांनीही त्यांचे कमरेस लोखंडी गावठी पिस्टल खोचलेले असल्याचे व त्यामध्ये प्रत्येकी ०२ जिवंत काडतुसे (राऊंड) असल्याचे दिसुन आले. तसेच नमुद आरोपी ज्या मारुती सुझुकी ऑल्टो कार मधुन आलेले होते, त्या कारची पाहणी केली असता सदर कार मध्ये ०२ लोखंडी गावठी पिस्टल व १० जिवंत काडतुसे (राऊंड) मिळुन आले. त्यांचेकडुन १,६०,००० /- रुपये किंमतीचे ०४ गावठी पिस्टल, ७,००० /- रुपये किंमतीचे १४ जिवंत काडतुसे (राऊंड) व १,००,००० /- रुपये किंमतीची मारुती सुझुकी ऑल्टो कार ही जप्त करण्यात आलेली आहे.

दोन्ही अटक आरोपी हे सराईत गुन्हे गार असून त्यांनी मध्यप्रदेशमधून इतर दोघांकडून पिस्टल व काडतुसे आणली होती. सांडभोर याच्या विरोधात खून, खूनाचा प्रयत्न असे ८ गुन्हे दाखल आहेत, तर साळवी याच्या विरोधात खून मारामारी, बलात्कार असे तीन गुन्हे दाखल आहेत.पोलिसांच्या माहितीनुसार ते मोठा कट रचत होते. जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत किशोर आवारे यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी तयारी करत असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या कटामध्ये आणखी तीन जण सहभागी असल्याचे समोर आले आहे. आरोपींवर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.इतर साथीदार कोण आहेत त्याबाबत पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम हे अधिक तपास करीत आहेत.

सदर उल्लेखनीय कामगिरी ही विनयकुमार चौबे. पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त, पिं. चिं. स्वप्ना गोरे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे शाखा, पिं चि., सतिश माने. सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, पिं चिं. बाळासाहेब कोपनर सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, पिं चिं. यांच्या मार्गदर्शनाखाली जितेंद्र कदम, पोलीस निरीक्षक, दरोडा विरोधी पथक, गुन्हे शाखा, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंबरिष देशमुख, पोलीस अंमलदार आशिष बनकर, प्रविण कांबळे, गणेश कोकणे, गणेश हिंगे, गणेश सावंत, विनोद वीर सुमित देवकर, महेश खांडे, उमेश पुलगम, प्रविण माने, राजेश कौशल्य, राहुल खारगे, समिर रासकर, नितीन लोखंडे, चिंतामण सुपे व अमर कदम सर्व नेमणुक दरोडा विरोधी पथक गुन्हे शाखा यांनी केली आहे. सदर उल्लेखनीय कामगिरीबद्दल मा. पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांनी दरोडा विरोधी पथकास उत्तेजनार्थ ५० हजार रुपये चे बक्षीस घोषित केले आहे.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL NEWS
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६
फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/
आमचे व्हाट्सअप ग्रुप वर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..
https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX
आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad