पिंपरी चिंचवडची कामगिरी दरोडा टाकणाऱ्या टोळीस अटक.१४ पिस्टल ०८जिवंत काडतुसे ०४,९०,५०० / – मुद्देमाल हस्तगत .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

दिनांक १८/०१/२०२२ दरोडा विरोधी पथक गुन्हे शाखा ,

पिंपरी चिंचवडची कामगिरी दरोडा टाकणाऱ्या टोळीस अटक करून , त्यांचेकडून १४ पिस्टल व ०८ जिवंत काडतुसे असा एकूण किं.रू. ०४ ,९०,५०० / – रूचा मुद्देमाल हस्तगत .

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात सांगवी , चाकण या पोलीस ठाणेचे हद्दीत अग्नि शस्त्राचा वापर करून खुन झालेबाबत गुन्हे नोंद झाल्याने विनापरवाना अग्निशस्त्रे बाळगणारे विक्री करणारे यांचेवर कठोर कारवाई करणेबाबत.मा.पोलीस आयुक्त , पिंपरी चिंचवड श्री कृष्ण प्रकाश यांनी गुन्हे शाखेतील पथक व शाखांना सूचना दिल्या होत्या . त्या अनुषंगाने दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री उत्तम तांगडे , पोलीस उप निरीक्षक श्री . मंगेश भांगे व दरोडा विरोधी विरोधी पथकाचे अंमलदार असे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तलयात अग्निशस्त्रे बाळगणे प्रकरणी यापुर्वी अटक केलेले रेकॉर्डवरील आरोपीची माहिती प्राप्त करून त्यांचे मोबाईल क्रमांक प्राप्त करून , पोलीस आयुक्तालयाचे हद्दीतील त्यांचे आस्तित्वाबाबत तांत्रिक विश्लेषन करून , गोपनीय माहितीच्या आधारे शोध घेत असताना पोलीस नाईक सागर शेडगे यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की , वडमुखवाडी , चन्होली , पुणे या परिसरात दोन मोपेडवर पाच इसम हे विनाकारण फिरत असुन , ते सदर परिसरातील राहीवासी नसुन त्यांच्या हालचाली संशयास्पद आहेत अशी माहिती प्राप्त झाली .

मिळालेल्या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री उत्तम तांगडे यांनी पोलीस उप निरीक्षक श्री . मंगेश भांगे यांची एक टिम तयार करून त्यांना कारवाई करणेबाबत सुचना दिल्या . त्याप्रमाणे वरील टिमने वरील ठिकाणी सापळा रचुन मोठ्या शिताफिने इसम नामे

१ ) आकाश अनिल मिसाळ , वय २१ वर्षे , रा . प्रेम विला , रेणुका माता मंदिरा समोर , इंद्रायणीनगर , भोसरी , पुणे

२ ) रूपेश सुरेश पाटील , वय ३० वर्षे , रा . मु.पो. वडगांव बुद्रक , ता . चोपडा , जि . जळगाव

३ ) ऋतिक दिलीप तापकिर , वय २६ वर्षे , रा . पांडुरंग हाईटस् , मुक्ता रेसीडन्सी समोर , सुतारवाडी लास्ट बस स्टॉप , पाषाण ,पुणे

यांना दिनांक ०३/०१/२०२२ रोजी २२:४५ वा वरिल स्टाफचे मदतीने ताब्यात घेतले व दोन इसम हे पोलीस आल्याची चाहुल लागताच एका मोपेड वरून पसार झाले . ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीतांचे अंगझडती मध्ये कि.रू. १,५१,५०० / – चे मोपेड , दोन पिस्टल , दोन जिवंत राऊंड , तीन मोबाईल फोन मिरची पुड व नॉयलॉन दोरी असा माल मिळुन आल्याने , त्यांच्याकडे चौकशी करता ते हत्यारानिशी कृष्णाई पेट्रोल पंप हॉटेल जाळीचा मळा समोर , अलंकापुरम रोड , वडमुखवाडी , चन्होली , पुणे येथे दरोडा टाकण्याचे उद्देशाने आल्याचे निष्पन्न झाल्याने , त्यांचे विरूध्द दिघी पोलीस ठाणे गुरनं ०५/२०२२ भा.दं.वि. कलम ३९९ , ४०२ , आर्म अॅक्ट ३ ( २५ ) , महाराष्ट्र पोलीस अधि . १९५१ चे कलम ३७ ( १ ) ( ३ ) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला .

नमुद आरोपीतांची दिनांक १७/०१/२०२२ रोजी पर्यंतची १४ दिवस पोलीस कोठडीची रिमांड घेवुन त्यांच्याकडे पोलीस कोठडी मुदतीत तपास करता , आरोपी रूपेश पाटील व ऋतिक तपाकीर यांचेकडुन ते राहत असलेल्या फ्लॅट मधुन ०६ गावठी कट्टे ( पिस्टल ) व जिवंत राऊंड , तसेच आरोपी आकाश मिसाळ याचे इंद्रायणीनगर येथील राहते घरातुन ०४ गावठी कट्टे ( पिस्टल ) व जिवंत राऊंड असे किं.रू. २,१ ९ , ००० / – रू चे १० गावठी कट्टे ( पिस्टल ) व ०४ जिवंत काडतुसे असा पोलीस कस्टडी दरम्यान मुद्देमाल जप्त करण्यांत आला आहे . नमुद आरोपीतांनी सदरची अग्निशस्त्रे ही मध्यप्रदेश येथुन आणले असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून , सध्या गुन्हयाचा तपास सुरू आहे .

तसेच तपासादरम्यान आरोपी रुपेश पाटील याने अग्निशस्त्रे विक्री केलेल्या इसम नामे अजित ऊर्फ विकी रामलाल गुप्ता , वय -२८ वर्षे , रा . भोसरी यास अटक करून त्याचे वर दिघी पोलीस स्टेशन गु.र.नं. १५/२०२० आर्म अॅक्ट ३ ( २५ ) , महाराष्ट्र पोलीस अधि . १९५१ चे कलम ३७ ( १ ) ( ३ ) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन त्याचे कडुन ०२ अग्निशस्त्रे व ०१ जिवंत काडतुस जप्त करण्यात आले आहे . आरोपी रूपेश पाटील व आकाश मिसाळ हे रेकॉर्ड वरील गुन्हेगार असुन , रूपेश पाटील व त्याचे साथीदार यांचेकडुन यापूर्वी देखील २४ अग्निशस्त्रे व १६ जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली होती . आरोपी रूपेश पाटील हा अग्निशस्त्रांची तस्करी करणारा रेकॉर्ड वरील गुन्हेगार आहे . त्याबाबत त्याचेवर यापुर्वी गुन्हे दाखल आहेत . तसेच तो नेहमी वेगवेगळ्या साथीदारांसह सदरचे गुन्हे करीत आहे . आरोपी रूपेश पाटील हा

१. भोसरी पोलीस स्टेशन ४२७ / २०२१ भा.द.वि.क. ३९२२. भोसरी एम आय डी सी पोलीस स्टेशन गु.र.नं .६७९ / २०२१ भा.द.वि.क. ४५२ , ५०४ , ५०६ , ३४ आर्म अॅक्ट ४ ( २५ ) , क्रिमिनल लॉ अॅमेडमेंट क . ३,७ म.पो.का.क .३७ ( १ ) सह १३५ या गुन्हयातील पाहिजे आरोपी असुन त्यावर खालील प्रमाणे गुन्हे नोंद आहेत . आरोपी रूपेश पाटील याचेवर दाखल असलेले गुन्हे १ ) चिंचवड पोलीस ठाणे गुरनं २१४/२०११ भादवि ३९९ , ४०२ , आर्म अॅक्ट ४ ( २५ ) महा . पो . अधि . कलम ३७ ( १ ) ( ३ ) सह १३५

२ ) देहुरोड पोलीस ठाणे गुरनं ११९ / २०१४ भादवि ३०२ , ३४ आर्म अॅक्ट ४ ( २५ ) महा . पो . अधि . कलम ३७ ( १ ) ( ३ ) सह १३५

३ ) देहुरोड पोलीस ठाणे गुरनं २२७/२०१६ भादवि ३९५ , ३९७ , ३९४ , १२० ( ब )

४ ) भोसरी पोलीस ठाणे गुरनं २९१ / २०१६ आर्म अॅक्ट ३ ( २५ ) महा . पो . अधि . कलम ३७ ( १ ) ( ३ ) सह १३५

५ ) चिंचवड पोलीस ठाणे गुरनं २६८ / २०१६ महा . पो . अधि . कलम १४२ ३७ ( १ ) ( ३ ) सह १३५

आरोपी आकाश मिसाळ याचेवर दाखल असलेला गुन्हा

१ ) भोसरी पोलीस ठाणे गुरनं ९४ / २०१५ भादवि ३२४ , ५०४ , ५०६ , ३४

सदरची कारवाई पिंपरी – चिंचवडचे मा . पोलीस आयुक्त श्री कृष्ण प्रकाश मा अपर पोलीस आयुक्त डॉ . संजय शिंदे , मा . पोलीस उप आयुक्त ( गुन्हे ) , डॉ . काकासाहेब डोळे , सहा . पोलीस आयुक्त , गुन्हे १ श्री . पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री उत्तम तांगडे , पोलीस उप निरीक्षक श्री . मंगेश भांगे , तसेच पोलीस अंमलदार महेश खांडे , उमेश पुलगम , नितीन लोखंडे , आशिष बनकर , सागर शेडगे , गणेश कोकणे , राजेश कौशल्ये , राहुल खारगे , विक्रांत गायकवाड , राजेंद्र शिंदे , औदुंबर रोंगे , गोविंद सुपे , नागेश माळी , पोहवा / शेटे यांचे पथकाने केली आहे .


(डॉ.काकासाहेब डोळे) पोलीस उप आयुक्त ( गुन्हे ) पिंपरी चिंचवड

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.9822331526

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *