मंचर परिसरात अवैध क्लबवर संशयाची सावली,
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
मंचर परिसरात अवैध क्लबवर संशयाची सावली,
मंचर अवैध क्लब सुरु असल्याची माहिती स्थानिकांकडून पुढे येत आहे. या क्लबमध्ये बेकायदेशीर धंदे सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

विशेष म्हणजे, हे ठिकाण थेट मंचर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येते. तरीदेखील अशा अवैध व्यवसायाला संरक्षण मिळत असल्याची चर्चा सुरू आहे. नागरिकांमध्ये यामुळे प्रचंड नाराजी व्यक्त होत असून, योग्य ती कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

याप्रकरणी ACS Police Crime Squad चे संपादक वाजिद खान यांनी पुढाकार घेतला असून, संबंधित अवैध क्लब बंद करण्यासाठी ते पुरावे सादर करणार असल्याची माहिती मिळाली आहे.

स्थानिक प्रशासन आणि पोलीस विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन या अवैध क्लबवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
