पेट्रोलिंग करीत असताना गावठी रिव्हॉल्व्हर सकट आरोपी अटक पोलीसांची कामगिरी .

ACS POLICE CRIME SQUAD

गावठी रिव्हॉल्व्हर व काडतूसे अशी प्राणघातक हत्यारे जवळ बाळगणा – या आरोपीस अटक भारती विदयापीठ पोलीसांची कामगिरी ..

दिनांक ०६/०९/२०२१ रोजी तपास पथकांचे अधिकारी अंकुश कर्चे व तपास पथकांचे अंमलदार असे हददीमध्ये सतर्कपणे रात्रगस्त पेट्रोलिंग करीत असताना पहाटे ०२/०० वा.सुमारास नारायणी धाम मंदीर जवळ कात्रज पुणे या ठिकाणी एका नंबरप्लेट नसलेल्या दुचाकी गाडीवर तीन इसम संशयीत रित्या बसलेले दिसुन आले त्यांना पोलीस स्टाफने हटकताच ते पळुन जावु लागल्याने त्यांना पकडून त्याची नाव व पत्ते विचारले असता त्यानी त्याची नावे १ ) सौरभ रामचंद्र सोळसकर वय २२ वर्षे रा.स.नं .२३ / १० , रजनी कॉर्नर शेजारी , घर नं.९ ८३ , एकता मित्रमंडळ समोर , बालाजीनगर , पुणे

२ ) शुभम आवा कसबे , वय- २१ वर्षे , रा . खोपडेनगर , गुजर – निंबाळकरवाडी रोड , कात्रज . पुणे

३ ) दत्तात्रय राजाराम पाटोळे , वय -१ ९ वर्षे , रा . खोपडेनगर , गुजर निंबाळकरवाडी रोड , कात्रज , पुणे

असे असल्याचे सागितले . त्यांची अंगझडती घेतली असता आरोपी सौरभ सोळसकर याचेकडे एक देशी बनावटीचे पिस्टल ( अग्निशस्त्र ) व पितळी धातुची २ काडतुसे , आरोपी शुभम कसबै याचेकडे एक देशी बनावटीचा गावठी कट्टा ( अग्निशस्त्र ) व पितळी धातुची २ काडतुसे व आरोपी दत्तात्रय पाटोळे याचेकडे एक काळ्या रंगाची एअर गन अशी प्राणघातक हत्यारे व एक मोटार सायकल असा एकुन ८९ .८०० / – रुपयांचा मुददेमाल त्यांचेकडे मिळुन आला . सदरची हत्यारे व मोटार सायकल पोलीस उप निरीक्षक अंकुश कर्चे यांनी जप्त करुन सदर आरोपींना पुढील तपासकामी ताब्यात घेवुन त्यांचेवर पोलीस अंमलदार विक्रम सावंत यांनी सरकारतर्फे फिर्याद दिल्याने भारती विदयापीठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर ६२१/२०२१ आर्म अॅक्ट कलम ३ ( २५ ) . महाराष्ट्र पो.कायदा कलम ३७ ( १ ) ( ३ ) सह ३५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून गुन्हयाचा तपास पोलीस उप निरीक्षक नितीन शिंदे हे करीत आहेत .

सदरची कामगिरी श्री सागर पाटील , पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०२ , पुणे शहर , श्रीमती सुषमा चव्हाण , सहाय्यक पोलीस आयुक्त , श्री जगन्नाथ कळसकर , वरिष्ठ पोलीस निरीक्षक , संगिता यादव , पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) , पोलीस निरीक्षक विजय पुराणिक यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक नितीन शिंदे , अंकुश कर्चे व तपास पथकांचे अंमलदार रविन्द्र भोसले , रविंद्र चिप्पा , गणेश सुतार , सचिन पवार , निलेश खोमणे , योगेश सुळ , हर्षल शिंदे , अभिजीत जाधव , गणेश शेंडे , राहूल तांबे , धनाजी धोत्रे , नवनाथ खताळ , सचिन गाडे , आशिष गायकवाड , विक्रम सावंत , जगदीश खेडकर , शिवदत्त गायकवाड , राजु वेगरे , तुळशीराम टेंभुर्णे यांनी केली आहे .

ACS POLICE CRIME SQUAD

वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारती विदयापीठ पोलीस ठाणे , पुणे .

ACS POLICE CRIME SQUAD

ONLINE PORTAL NEWS ONLY POLICE

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *