दरोडा विरोधी पथकाची कामगिरी २४ तासात दरोडा टाकणाऱ्या आरोपीला अटक.

मौजमजा करण्याकरीता कट रचुन दरोडा टाकणाऱ्या आरोपीतांना २४ तासात पिस्टलसह अटक करून , रोख रक्कम , पिस्टल , मोबाईल व दोन दुचाकी वाहनासह ४,४५,००० / – रू चा मुद्देमाल हस्तगत . दरोडा विरोधी पथकाची कामगिरी .

दिनांक ०१/०९/२०२१ रोजी रात्री ० ९ : ०० वाचे सुमारांस चिंचवड पोलीस ठाणे हद्दीतील स्पाईन रोड , वाल्हेकरवाडी , चिंचवड येथे साई स्टील ट्रेडर्स प्रा . लि . कंपनीचे मालक फिर्यादी नामे भिमसेन वर्दीसिंग राजपुत यांनी फिर्याद दिली की , साई स्टील ट्रेडर्स प्रा . लि . कंपनीतील कामगारांचे पेमेन्ट घेवुन कंपनीत काम करणारा ड्रायव्हर अभिषेक शिरसाठ हे सहकार्यासह जात असताना दोन मोटार सायकल वरील ०५ इसमांनी अभिषेक शिरसाठ यास आडवुन , मारहान करून , पिस्टलचा धाक दाखवुन , फिर्यादी यांचेकडील ७.०३.६५० / – रोख रक्कम असलेली काळे रंगाची सॅक बॅग ही दरोडा टाकुन नेली . त्याबाबत चिंचवड पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नंबर २८४/२०२१ भादवि कलम ३९५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता . त्याबाबत दरोडयाचे गांभिर्य लक्षात घेवुन , मा . वरिष्ठांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणणेबाबत गुन्हे शाखेकडील सर्व पथकांना आदेशीत केले होते . त्याअनुषंगाने वेगवेगळी पथके तयार करून , गुन्हयाचा तपास सुरू केला . त्याप्रमाणे दरोडा विरोधी पथकाने गुन्हयाचे घटनास्थळी भेट देवुन , गुन्हयाबाबत सविस्तर माहिती घेवुन , एक पथक तयार केले . त्यांना गुन्हा घडलेल्या परिसरातील सीसीटिव्ही फुटेज चेक करून , आरोपींचे वर्णनाची माहिती घेवुन , बातमीदारांशी संपर्क साधुन , मोटार सायकल वरील अनोळखी इसमाचा माहिती काढुन कळविणेबाबत सुचना दिल्या होत्या . त्याप्रमाणे सपोनि सिध्देश्वर कैलासे , पोउपनिरी मंगेश भांगे , पोलीस अंमलदार खारगे , पुलगम , बनकर , लोखंडे , शेडगे , कोकणे , माने , व कौशल्ये असे मोटार सायकल वरील अनोळखी इसमांचा चिखली पोस्टे हद्दीत शोध घेत असताना पोलीस उप निरीक्षक मंगेश भांगे , पोलीस नाईक आशिष बनकर यांना एका बातमीदाराकडुन बातमी मिळाली की , तीन संशयीत आरोपी हे हुमा बेकरीच्या मागे , पार्किंगमध्ये , चिखली , पुणे येथे थांबलेले आहेत . सदरचा गुन्हा त्यांनी केलेला असावा अशी बातमी मिळाले वरून , वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांनी पथकास मार्गदर्शन करून सापळयाची कारवाई सुरू करून , मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जावुन , चारही बाजुने घेराव घातला . सापळा रचुन सदर परिसरातील स्थानिक रहिवासी असल्याचे भासवुन २०:४० वाचे सुमारांस इसम नामे

१ ) यश गणेश आगवणे , वय १९ वर्षे , रा . त्रिमुर्ती हौसिंग सोसायटी , रूपीनगर , तळवडे , पुणे २ ) कासीम मौला मुर्शीद , वय २१ वर्षे , रा . पुण्य हौसिंग सोसायटी , घर नंबर २०४. ओटा स्किम निगडी , पुणे ३ ) सागर आदिनाथ पवार , वय १८ वर्षे , रा . सिध्दार्थनगर झोपडपट्टी , आझाद चौक , ओटास्किम निगडी , पुणे

यांना ताब्यात घेवुन , पंचासमक्ष त्यांची अंगझडती घेता यश आगवणे याचेकडुन ५०,००० / – रू रोख रक्कम व मोबाईल फोन , कासीम मुर्शीद याचेकडुन १,५०,००० / – रू रोख रक्कम , एक लोखंडी गावठी बनावटीचा देशी कट्टा ( पिस्टल ) व मोबाईल फोन , तसेच सागर पवार याचेकडुन ६५,००० / – रू रोख रक्कम व मोबाईल फोन तसेच त्यांनी गुन्हा करतेवेळी वापरलेल्या नविन होंडा शाईन मोटार सायकल व अॅक्टीव्हा मोपेड अशी एकुण मिळुन ४,४५,००० / रू रोख रक्कम , एक लोखंडी गावठी बनावटीचा देशी कट्टा ( पिस्टल ) , तीन मोबाईल फोन व दोन मोटार सायकली मिळुन आल्या .

त्यांच्याकडे सदर रक्कमेबाबत कौशल्य पुर्वक तपास विचारपुस करता त्यांनी सदरचा गुन्हा त्यांचे इतर तीन साथीदारांचे मदतीने केला असल्याची कबुली दिली .

कंपनीचा ड्रायव्हर अभिषेक शिरसाठ व गुन्हयातील आरोपी हे ऐकमेकांचे परिचयाचे असुन , दाखल गुन्हयातील अटक व पाहिजे आरोपी यांचेवर उसनवारी घेतलेले पैसेचे कर्ज होते तसेच त्यांना मौजमजा करण्याकरीता पैश्याची गरज असल्याचे त्यांनी कंपनीचा ड्रायव्हर अभिषेक शिरसाठ याचेसह कंपनीचे पैसे लुटण्याचा कट रचण्यात आला होता . पैसे घेवुन जाणारा कंपनीचा ड्रायव्हर शिरसाठ हा त्या कटात सामिल असल्याचे तपासात निष्पन्न झाले . शिरसाठ याने आरोपींना पुर्ण माहिती दिली होती . पैसे घेऊन निघाल्याचे त्याने आरोपींना सांगुन लुटलेल्या पैश्यातील जास्त हिस्सा हा शिरसाठ यास देण्याचे ठरले होते . तसेच त्याने मला जास्त मारू नका असे सांगुन मी नंतर तक्रार देण्यास जाईल याबाबत आरोपींना सांगितले होते . त्याप्रमाणे अभिषेक शिरसाठ हा गुन्हा घडल्यानंतर तो स्वतः च तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशन येथे आला होता . परंतु त्याच्यावर आमचा संशय असल्याने , सदर गोष्टीची कोठेही वाच्छता न करता त्याच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवुन दरोडा विरोधी पथकाने समांतर तपास सुरू केला . गुन्हयाबाबतची व आरोपीबाबतची सर्व माहिती निष्पन्न करण्यात आली आहे . उर्वरित तीन आरोपीतांचा शोध घेत आहोत . दाखल गुन्हयातील अटक आरोपी हे पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन , त्यांचेवर खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत .

आरोपी १ ) कासीम मौला मुर्शीद याचेवर दाखल गुन्हे . १ ) भोसरी पोलीस ठाणे गुरनं ५८५ / २०१९ भादवि कलम ३९५ , महा . पो . अधि . ३७ ( १ ) ( ३ ) सह १३५ २ ) भोसरी पोलीस ठाणे गुरनं ५१७ / २०१९ भादवि कलम ३७९ ३ ) भोसरी पोलीस ठाणे गुरनं ५८४ / २०१९ भारतीय हत्यार कायदा कलम ४ ( २५ )

आरोपी २ ) यश गणेश आगवणे याचेवर दाखल गुन्हे . १ ) निगडी पोलीस ठाणे गुरनं ५८८ / २०१९ मो.वा.का. ६६ ( १ ) १९२ अ , ३ ( १ ) १८१ , ५/१८०

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

सदरची कारवाई पिंपरी – चिंचवड आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त श्री . कृष्ण प्रकाश , अपर पोलीस आयुक्त डॉ . संजय शिंदे , पोलीस उप आयुक्त श्री . सुधीर हिरेमठ , सहा.पोलीस आयुक्त डॉ . प्रशांत अमृतकर यांचे मार्गदर्शनाखाली दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री उत्तम तांगडे , सहा . पोलीस निरीक्षक सिध्देश्वर कैलासे , पोलीस उप निरीक्षक मंगेश भांगे , तसेच पोलीस अंमलदार आशिष बनकर , नितीन लोखंडे , महेश खांडे , राहुल खारगे , उमेश पुलगम , राजेंद्र शिंदे , विक्रांत गायकवाड , गणेश कोकणे , प्रविण कांबळे , प्रविण माने , सागर शेडगे , राजेश कोशल्ये व औदुंबर रोंगे तसेच तांत्रिक विश्लेषन विभागाचे नागेश माळी यांचे पथकाने केली आहे .

( सुधीर हिरेमठ ) पोलीस उप आयुक्त , गुन्हे , पिंपरी – चिंचवड

ACS POLICE CRIME SQUAD

ONLINE PORTAL NEWS

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *