घरफोडी करणारे आरोपीला पोलिसांनी केली अटक १३ लाख रूपये किंमतीचा सोने-चांदीचा मुद्देमाल जप्त . हडपसर पोलीस स्टेशनची कामगिरी.

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.९८२२३३१५२६

घरफोडी करणारे आरोपीला पोलिसांनी केली अटक
१३ लाख रूपये किंमतीचा सोने-चांदीचा मुद्देमाल जप्त . हडपसर पोलीस स्टेशनची कामगिरी
.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

हडपसर पोलीस स्टेशन ची कामगिरी.

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर

हडपसर मध्ये ७ घरफोड्या उघडकीस १३ लाख रूपये किंमतीचा सोने-चांदीचा मुद्देमाल जप्त “

हडपसर मध्ये , सात घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगारास हडपसर तपास पथकाने जेरबंद केले आहे, त्यांच्याकडून सात घरफोडी, करणारा गुन्हा उघडकीस, आणला आहे,

१) अर्जुन अशोक पाटील वय ३१ वर्ष राहणार सर्वे नंबर १६०, महाकाली मंदिराशेजारी गोसावी वस्ती हडपसर पुणे, व, त्याचा साथीदार आकाश लष्करे,असे अटक आरोपींचे नावे आहेत,

फिर्यादी अनिलकुमार जग्गाराव बेंदालम रा. स्वप्नपुर्ती सोसायटी, हडपसर पुणे हे बालाजी दर्शनासाठी कुटूंबासह दिनांक १०/०२/२०२२ रोजी दुपारी ३.०० वा सुमारास घरास लॉक करून गेले होते. त्यानंतर ते घरी परत आले असताना त्यांचे बंद घरात चोरी होवून सोन्याचे दागीने चोरी झाल्याने हडपसर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या, गुन्ह्याचा समांतर, हडपसर तपास पथका, कडून सुरू होता,

हडपसर पोलीस ठाणेकडील तपास पथकाकडून तांत्रिक विश्लेषणातुन आणि तपास पथकाचे पोलीस अंमलदार शशिकांत नाळे, निखील पवार व सचिन जाधव यांना मिळालेल्या बातमीद्वारे हडपसर पोलीसांनी आरोपी

नामे अर्जुन अशोक पाटील वय ३१ वर्ष रा स नं १०६, महाकाली मंदीराशेजारी गोसावी वस्ती हडपसर पुणे यास ताब्यात घेतले. त्यास पोलीस स्टेशन येथे घेवून येवून त्याचेकडे तपास करता त्याने त्याचा साथीदार आकाश लश्करे यासह हडपसर पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी चोरी केले असल्याचे निष्पन्न झाले आहे.

त्यांच्याकडे अजून सखोल चौकशी केली असता, आरोपी अर्जुन अशोक पाटील, याने हडपसर हद्दीत सात गुन्हे केल्याचे उघडकीस आले असून त्याच्याकडून १६५ ग्रम वजनाचे सोन्याचे दागिने, किं.७,१५,००० चे हस्तगत करण्यात आले आहेत.

दिनांक ०३/०८/२०२१ रोजी हडपसर हद्दीत गल्ली नंबर १४ केतकेश्वर कॉलनी, सर्वे नं ३७, काळेपडळ हडपसर पुणे येथे उघडया दरवाजा वाटे आत प्रवेश करून चोरी झाल्याने हडपसर पोलीस ठाणे गु.र.नं ६०१/२०२१ भा.द.वी.क ३८० प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.

सदर चोरी करणारा आरोपी नामे विजय सुभाष देशमाने रा. मु.पो. राऊतवाडी, बुलढाणा यास गुन्हे शाखा युनिट-५ यांनी ताब्यात घेवून पुढील तपासकामी हडपसर तपासपथकाचे ताब्यात दिले. हडपसर तपास पथकाने अतिधैर्य कौशल्याने आरोपीस विचारपुस करून सदर आरोपी आणि सोनार अक्षय श्रीनीवास दिक्षीत २५ वर्ष रा. विश्वकर्मा पतसंस्था शेजारी सर्वे नंबर १११/१३/ब ओमकार कॉलनी, विजयनगर काळेवाडी पिंपरी पुणे यांच्याकडून १२० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने व ३५ ग्रॅम चांदीचे दागीने असा एकुण किं. रू ६,०३,५००/- चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

तपास पथकाचे नवनियुक्त अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक विजय शिंदे आणि पोलीस उप निरीक्षक अविनाश शिंदे यांनी कष्टपूर्वक आणि कौशल्याने तपास करून ७ घरफोडी चे गुन्हे उघडकीस आणून एकुण १३ लाखापेक्षा अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

सदरची कामगिरी ही मा.श्री.नामदेव चव्हाण, अप्पर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग पुणे व मा.नम्रता पाटील पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५ पुणे शहर यांचे सुचना व मागदर्शनाखाली मा.श्री.बजरंग देसाई, सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग पुणे, श्री. अरविंद गोकुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर

पोनि (गुन्हे) श्री.विश्वास डगळे, पोनि (गुन्हे) श्री. दिगंबर शिंदे यांचे सुचनाप्रमाणे तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे, पोलीस उप निरीक्षक अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार, प्रदीप सोनवणे, अविनाश गोसावी, संदीप राठोड, समीर पांडुळे ,शशिकांत नाळे, सचिन जाधव, शाहीद शेख, प्रशांत दुधाळ निखील पवार, प्रशांत टोणपे, रियाज शेख, सचिन गोरखे ,सुरज कुंभार यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.९८२२३३१५२६

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *