समर्थ पोलीस स्टेशन ची कामगिरी बारा तासात चोरांना केला अटक.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

दिनांक १२/०१/२०२२..समर्थ पोलीस स्टेशन ची कामगिरी बारा तासात चोरांना केला अटक.

समर्थ पोलीस स्टेशन ची तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी ची कामगिरी .प्रट्रोलींग करीत असतांना बारा तासात चोरांना केला अटक.

दि . ११/०१/२०२२ रोजी फिर्यादीने त्यांची होंडा कंपनीची अॅक्टीव्हा मोपेड दुचाकी गाडी चोरी झालेबाबत तक्रार दाखल केली होती . समर्थ पोलीस ठाणेकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक , यांचे आदेशाने तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी वाहन चोरीला प्रतिबंध होणेकामी व वाहन चोर पकडणेकामी प्रट्रोलींग करीत असतांना एक इसम वॉचमेकर चाळ भवानी पेठ येथे समोरुन एक अॅक्टीव्हा बिना नंबर प्लेटची दुचाकी गाडी वरून संशयीत रीत्या येताना दिसला . सदरच्या गाडीचा संशय आल्याने त्यास थांबवुन त्याचेकडे गाडीचे कागदपत्राबाबत विचारणा केली असता , तो उडवाउडवीची उत्तरे देवु लागला म्हणुन त्यास त्याचा नाव व पत्ता विचारला असता त्याने आपले

नाव सोहेल समीर शेख वय २४ रा . १०५३ न्यु नाना पेठ पुणे

असे असल्याचे सांगितले . त्यास अधिक चौकशी कामी समर्थ पोलीस स्टेशन येथे आणले व गाडीच्या चॅसीस व इंजिन नंबर वरुन खात्री केली असता सदर गाडीचा ओरीजनल आर . टी.ओ. नंबर एम . एच . १२ एम्.एच् . ०६२९ असे असल्याचे निष्पन झाल्याने सदर गाडीबाबत अभिलेख पडताळुन खात्री केली असता समर्थ पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ०३/२०२२ भा.द.वि.कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल असलेचे समजले . त्याबाबत त्याचेकडे चौकशी केली असता त्याने सदरची गाडी त्याने नाना पेठ येथील विठोबा आनंद सोसायटी असलेल्या बिल्डींगच्या पार्किंग मधुन चोरी केल्याची कबुली दिल्याने सदर आरोपीस दाखल गुन्हयात अटक केली आहे .

सदरची कामगिरी ही मा .राजेंद्र डहाळे , अपर पोलीस आयुक्त , पश्चिम प्रादेशीक विभाग , पुणे शहर ,मा .श्रीमती प्रियंका नारनवरे , पोलीस उप आयुक्त , परिमंडळ – १ पुणे शहर , मा.श्री.सतिश गोवेकर , सहाय्यक पोलीस आयुक्त , फरासखाना विभाग , पुणे श्री विष्णु ताम्हाणे , वरिष्ठ पोलीस निरीक्षक , समर्थ पो.स्टे , उल्हास कदम , पोलीस निरीक्षक , ( गुन्हे ) यांचे मार्गदर्शनानुसार सहा .पोलीस निरीक्षक संदीप जोरे , पोलीस अंमलदार सुशील लोणकर संतोष काळे , सुभाष पिंगळे , हेमंत पेरणे , सुभाष मोरे , निलेश साबळे , श्याम सुर्यवंशी , शुभम देसाई , विठ्ठल चोरमले , महेश जाधव यांनी केली आहे .

(विष्णु ताम्हाणे) वरिष्ठ पोलीस निरीक्षक समर्थ पोलीस स्टेशन पुणे शहर.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *