पुणे: वीजबिलाबाबतचे बनावट एसएमएस फसवणुकीला कारणीभूत आहेत, महावितरणचा ग्राहकांना इशारा.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

वीजबिल भरण्याबाबत बनावट संदेशाद्वारे आर्थिक फसवणूकीचे प्रकार वाढले; महावितरणने केले ‘हे’ आवाहन.(MSEDCL)

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

“गेल्या महिन्याचे वीज बिल न भरल्यामुळे, मध्यरात्री तुमचा वीजपुरवठा खंडित केला जाईल” यासारखे बनावट एसएमएस. त्यामुळे सोबतच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा”, असे आवाहन नागरिकांकडून करण्यात आले.

पुणे :महावितरणने सांगितले की, वैयक्तिक स्त्रोतांद्वारे वीजबिल भरण्याबाबत बनावट ‘एसएमएस’‘व्हॉटस्ॲप’ संदेश पाठवून तसेच मोबाईल कॉलद्वारे नागरिकांची आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार सुरु आहेत. ग्राहकांना कोणत्याही परिस्थितीत वैयक्तिक क्रमांकावरून आलेल्या बनावट संदेश किंवा कॉलवर विश्वास ठेऊ नये. तसेच पाठवलेली लिंक ओपन किंवा कोणतेही सॉफ्टवेअर डाऊनलोड करू नये असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. त्यामुळे ग्राहकांनी अशा बनावट मेसेज आणि लिंक्सकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले पाहिजे.

वीजबिलांचा सुरक्षित भरणा करण्यासाठी ग्राहकांसाठी महावितरणचे मोबाईल ॲप व www.mahadiscom.in ही वेबसाईट उपलब्ध आहे.

मागील महिन्याचे वीजबिल अपडेट नसल्याच्या कारणावरून आज रात्री 9.30 वाजता वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. करिता ताबडतोब सोबत दिलेल्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा’, असे बनावट ‘एसएमएस’ किंवा ‘व्हॉटस् ॲप’ संदेश पाठविण्यात येत आहेत. मोबाईल कॉल देखील करण्यात येत आहेत. यामध्ये ज्यांचा वीजबिलांशी काहीही संबंध नाही अशा नागरिकांना किंवा वीजबिल पूर्वीच भरलेले आहे अशा वीजग्राहकांना देखील बनावट संदेश पाठविण्यात येत आहे. सावधगिरी न बाळगता नागरिकांनी या बनावट संदेशांना किंवा कॉलला प्रतिसाद दिल्यानंतर फक्त ऑनलाईनद्वारेच वीजबिल भरण्यास सांगणे, त्यासाठी वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून ऑनलाईन पेमेंटची लिंक पाठवणे किंवा सॉफ्टवेअर (जे मोबाईल किंवा संगणक हॅक करतात) डाऊनलोड करण्यास सांगितले जात आहे. नागरिकांनी या बनावट संदेशांना प्रतिसाद दिल्यास मोबाईल किंवा संगणक हॅक करून संबंधित बॅक खात्यातील शिल्लक रक्कम लंपास करण्यात येत आहे.

महावितरण संदेशाचे सेंडर आयडी.


महावितरणकडून कोणत्याही वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून अशा प्रकारचे ‘एसएमएस’ व ‘व्हॉटस् ॲप’ मेसेज पाठविण्यात येत नाही. तर ज्या ग्राहकांनी ग्राहक क्रमांकासोबत त्यांच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी केली आहे केवळ त्याच वीजग्राहकांना संगणकीय प्रणालीद्वारे ‘एसएमएस’ पाठविण्यात येतात. या संदेशाचे सेंडर आयडी हे . असे आहेत. तसेच या अधिकृत संदेशाद्वारे वीजग्राहकांना कोणत्याही वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याबाबत कळविले जात नाही. बँकेचा ओटीपी शेअर करण्याबाबत किंवा कोणत्याही प्रकारचे सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यास सांगितले जात नाही. सोबतच वैयक्तिक क्रमांकावरून ‘व्हॉटस् ॲप’ संदेश पाठविले जात नाही असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

महावितरणकडून हे संदेश पाठवले जातात.
कडून अधिकृत सेंडर आयडीद्वारे फक्त ‘एसएमएस’ पाठविले जातात. यामध्ये पूर्वनियोजित देखभाल व दुरुस्ती,
तांत्रिक किंवा अन्य कारणांमुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास तो पूर्ववत होण्यास लागणारा संभाव्य कालावधी तसेच
दरमहा वीजबिलांची रक्कम, स्वत:हून मीटर रिडींग पाठविण्याचे ग्राहकांना आवाहन, मीटर रिडींग घेतल्याची तारीख
व वापर केलेली एकूण युनिट संख्या, वीजबिलाची रक्कम, देय दिनांक,
वीजपुरवठा खंडित करण्याची रीतसर नोटीस आदींची माहिती पाठविण्यात येते.

परंतु, सध्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून नागरिकांना पाठविण्यात येणारे ‘एसएमएस’, ‘व्हॉटस् ॲप’ संदेश तसेच मोबाईल कॉल बनावट आहेत.
त्यास कोणताही प्रतिसाद देऊ नये. बिलाच्या पेमेंटसाठी लिंक ओपन किंवा कोणतेही सॉफ्टवेअर डाऊनलोड करू नये.
बनावट संदेशामध्ये नमूद केलेल्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर संपर्क साधू नये.
काही शंका व तक्रारी असल्यास वीजग्राहकांनी चोवीस तास सुरु असलेल्या १९१२, १८००२१२३४३५ किंवा १८००२३३३४३५
या टोल फ्री क्रमांक किंवा नजीकच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आe3वाहन महावितरणकडून करण्यात आले आहे
.

Web Title :- Pune: Fake SMS about electricity bills are leading to fraud, warns consumers of Mahavitran.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *