Crime NewsLatest NewsPolice NewsTraffice Police

बेकायदेशीर हुक्का पार्लरवर छापा; कोंढवा पोलिसांची ‘एनआयबीएम रस्त्यावर असलेल्या ‘द व्हीलेज हॉटेलवर धडक कारवाई,apcs.in


ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

पुणे: बेकायदेशीर हुक्का पार्लरवर छापा; कोंढवा पोलिसांची ‘एनआयबीएम रस्त्यावर असलेल्या ‘द व्हीलेज हॉटेलवर धडक कारवाई,

कोंढवा पोलीस ठाणे हद्दीत बेकायदेशीर चालु असणा-या अवैध धंदयाचा शोध घेवुन कारवाई करण्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर व पोलीस निरीक्षक गुन्हे मानसिंग पाटील यांनी आदेशित केले होते. सदर आदेशाप्रमाणे दि.२९/०८/२०२४ रोजी रात्रगस्त अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक अमित शेटे व पोलीस अंमलदार असे पेट्रोलिंग करुन बेकायदेशीर व चोरुन चालु असणाऱ्या अवैध धंदयाचा शोध घेत होते.एनआयबीएम रोड येथील द व्हिलेज हॉटेल, मध्ये चोरुन ग्राहकांना बेकायदेशीरपणे हुक्का पिण्यासाठी उपलब्ध करुन दिला जात आहे,

पुणे : माजी गृहराज्यमंत्र्यांच्या मुलाकडून चालवल्या जात असलेल्या हॉटेलमध्ये बेकायदेशीर पद्धतीने पुरवल्या जाणाऱ्या हुक्क्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. कोंढवा पोलिसांनी या हॉटेलमध्ये छापा टाकत २३ हजार ५०० रुपयांचे तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले आहेत. तसेच याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाकिर रमेश बागवे (वय ३६, रा. भवानी पेठ), हरुन नबी शेख (वय २५, रा. नोदीया, पश्चिम बंगाल), बिक्रम साधन शेख (वय २०,पश्चिम बंगाल), अमानत अन्वर मंडळ (वय २२, पश्चिम बंगाल) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

गुन्हा दाखल करण्यात आलेले बाकिर रमेश बागवे हे माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांचे पुत्र आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा पोलीस ठाण्याचे पथक हद्दीतील बेकायदा व अवैध धंद्यांची माहिती घेत त्यावर कारवाई करीत होते. या मोहिमेदरम्यान गुरुवार, २९ ऑगस्ट रोजी सहायक पोलीस निरीक्षक अमित शेटे, पोलीस अंमलदार अक्षय शेंडगे, राहुल थोरात, सुहास मोरे, प्रदिप बेड़िस्कर हे रात्रगस्तीवर होते. त्यावेळी, खबऱ्यामार्फत पोलिसांना एनआयबीएम रस्त्यावर असलेल्या ‘द व्हीलेज हॉटेल’मध्ये चोरुन ग्राहकांना बेकायदेशीरपणे हुक्का पिण्यासाठी उपलब्ध करुन दिला जात असल्याची माहिती मिळाली.

पोलिसांनी वरिष्ठ निरीक्षक विनय पाटणकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली छापा टाकण्यात आला. त्यावेली ‘द व्हिलेज हॉटेल’चे चालक ग्राहकांना बेकायदेशीरपणे हुक्का पुरवित असल्याचे निदर्शनास आले. या ठिकाणी टाकण्यात आलेल्या छाप्यात २३ हजार ५०० रुपयांचे  तंबाखुजन्य हुक्क्याचे फ्लेवर, ९ काचेचे हुक्क्याचे पॉट, व अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे. तसेच, या सर्वांवर कोंढवा पोलीस ठाण्यात सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने अधिनियम २०१८ चे कलम ४ (अ), २१(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरील कामगिरी मा. पोलीस उप आयुक्त परि.०५, श्री.आर राजा, मा. सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग (अतिरिक्त कार्यभार) श्रीमती अश्विनी राख, कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विनय पाटणकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. मानसिंग पाटील, यांच्या मार्गदर्शन व सुचना प्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक अमित शेटे, पोलीस अंमलदार अक्षय शेंडगे, राहुल थोरात, सुहास मोरे, प्रदिप बेडिस्कर यांनी केली आहे.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे व्हाट्सअप ग्रुप वर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..

https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

संपादक :मुख्य संपादक वाजिद एस खान.

(APCS NEWS) बातमी महाराष्ट्राची आपल्या राज्यातील ताज्या घडामोडींसाठी ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. युट्युब चॅनेलला Like, Subscribe आणि Share करा.
https://youtube.com/@acspolicecrimesquadnews7356?si=u-F8fbHvqL3-QPQh

https://www.instagram.com/acs_police_crime_squad?utm_source=qr&igsh=MWZsYXlrcWttbHZ4ag==

संपर्क : 9822331526

वेबसाईट : apcs.in


wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *