समर्थ पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी.घरफोडी करणा-या परराज्यातील टोळीचा समर्थ पोलीस स्टेशनने केला पर्दाफाश,सुरेश शिंदे वरिष्ठ पोलीस निरीक्षक.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL NEWS

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

समर्थ पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी.घरफोडी करणा-या परराज्यातील टोळीचा समर्थ पोलीस स्टेशनने केला पर्दाफाश,सुरेश शिंदे वरिष्ठ पोलीस निरीक्षक.

दिनांक १०/०८/२०२३, (APCS NEWS) मुख्य संपादक वाजिद एस खान.

समर्थ पोलीस स्टेशन, पुणे शहर घरफोडी करणा-या परराज्यातील टोळीचा केला पर्दाफाश समर्थ पोलीस स्टेशनच्या हददीत दिनांक ०१/०८/२०२३ रोजी ते दिनांक ०२/०८/२०२३ रोजी दरम्यान मुकेश ट्रेडर्स, नानापेठ, पुणे हया बंद दुकानाचे आतील व बाहेरील दोन्ही शटरचे लॉक तोडून रोख रक्कम ४,००,०००/- रु. व १०,०००/- रु. कि.चा सी.सी.टी.व्ही. डी. व्ही. आर मशीन सह एकूण रू ४,१००००/- इतक्या किं.चा मुद्देमाल घरफोडी करून चोरून नेला. म्हणुन समर्थ पोलीस स्टेशन येथे भा.दं.वि.सं कलम ४५४,४५७,३८० प्रमाणे अज्ञात इसमाविरद्ध गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्यानुसार सहा. पोलीस आयुक्त अशोक धुमाळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे, पोनि (गुन्हे) प्रमोद वाघमारे यांचे मार्गदर्शनाखाली समर्थ पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने तात्काळ तपास सुरू केला..

सदर गुन्हयाचे अनुषंगाने तपास करीत असताना अज्ञात चोरटयांनी दुकानातील सी.सी.टी.व्ही.चा डी.व्ही. आर मशीन सोबत घेवून गेल्याने चोरटयांचे चेहरे स्पष्ट होत नव्हते. त्यामुळे घरफोडी झालेल्या दुकानाच्या आजुबाजुचे सीसीटीव्ही तपासण्यास तपास पथकातील स्टाफने सुरवात केली. घरफोडी करुन आरोपी पळुन गेलेच्या दिशेचे जवळ जवळ १०० च्या वर सी.सी.टी.व्ही फुटेज चेक केले असता, एका आरोपीचा चेहरा एक सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसुन आला असता त्या एका फुटेजचा आधार घेवुन पोउनि सुनिल रणदिवे, पो. प्रमोद जगताप, रोहिदास वाघेरे, रहिम शेख, हेमंत पेरणे, कल्याण बोराडे, शरद घोरपडे यांनी सदर इसमाधी पुणे रेल्वे स्टेशन  यांनी सदर इसमाची पुणे रेल्वे स्टेशन परिसरात शोध घेवू लागले परंतु काही एक उपयुक्त माहिती मिळाली नाही. सदरबाबत गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सदर फुटेजमधील दिसत असणारा इसम हा पुणे रेल्वे स्टेशन याठिकाणी पार्सल यार्ड परिसरात थांबलेला आहे. सदर इसमास आरपीएफचे मदतीने ताब्यात घेवुन चौकशी केली असता त्याने उडवा उडवीची व असमाधानकारक उत्तरे दिल्याने संशय अधिक बळावल्याने सदर इसमास समर्थ पोलीस स्टेशन येथे आणुन कसून चौकशी केली असता त्याने त्याचे इतर दोन साथीदाराचे मदतीने नाना पेठ येथील मुकेश ट्रेडर्स याठिकाणी बंद दुकानाचे आतील व बाहेरील दोन्ही शटरचे लॉक तोडून रोख रक्कम ४,००,०००/- रु. व १०,०००/- रु. कि.चा सीसीटीव्हीची डीव्हीआर मशीन ही घरफोडी केली असल्याचे कबुल करुन त्याने स्वतःचे नाव सुरजीत भुवाल सरोज वय २३ वर्ष. रा. कुंडा, प्रतापगड, उत्तरप्रदेश असे सांगितले. तसेच त्याचे दोन साथीदार नामे- १) अजय उदरकुमार सरोज वय- १९ वर्ष. रा. कुंडा, प्रतापगड, उत्तरप्रदेश व २) गंगा सरोज रा. उत्तरप्रदेश पुर्ण नाव पत्ता माहिती नसल्याचे सांगितले. अजय कुमार सरोज हा मार्केटयार्ड येथिल आंबेडकरनगर पुणे या ठिकाणी असलेबाबत सुरजितने सांगितले. सदर अजय कुमार सरोज याला तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे सदर वस्तीमधुन ताब्यात घेतले. सदर ताब्यात असलेले दोन्ही आरोपींची कसून चौकशी करून त्यांच्या कडुन घरफोडी करून चोरून घेवुन गेलेला रु. २,३०,०००/- मुद्देमाल जप्त केला.

सदरची कामगिरी ही मा. अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे शहर श्री. प्रविणकुमार पाटील, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ १ पुणे शहर, श्री. संदीपसिंह गिल्ल, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, फरासखाना विभाग, पुणे श्री. अशोक धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, समर्थ पो.स्टे, श्री. सुरेश शिंदे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री प्रमोद वाघमारे, यांचे सुचनेनुसार समर्थ पोलीस स्टेशन तपास पथकाचे पोउनि सुनिल रणदिवे, पोलीस अंमलदार दत्तात्रय भोसले, प्रमोद जगताप, गणेश वायकर, रोहिदास वाघेरे, रहिम शेख, हेमंत पेरणे, अमोल शिंदे, शरद घोरपडे, कल्याण बोराडे, ज्ञानेश्वर सुर्यवंशी, संदिप पवार, अर्जुन कुडाळकर, आरपीएफचे वपो.नि. रघुवंशी पुणे आरपीएफ, पोउपनिरी. उबाळे, पोलीस अंमलदार दराडे, प्रशांत बोरसे यांनी केली आहे.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL NEWS

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे व्हाट्सअप ग्रुप वर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..

https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *