वानवडी पोलीसांकडुन वाहन चोरी करणारा सराईत अटकेत.

ACS POLICE CRIME SQUAD

दिनांक २३/१२/२०२१ वानवडी पोलीस स्टेशन पुणे शहर वानवडी पोलीसांकडुन वाहन चोरी करणारा सराईत अटकेत

पुणे शहरात वारंवार घडत असलेल्या वाहन चोरीच्या गुन्हयांना प्रतिबंध करुन गुन्हेगारांना अटक करणेबाबत मा . वरिष्ठ अधिकारी यांनी वाहन चोरीचे हॉट स्पॉट तयार करुन सदर ठिकाणी पेट्रोलिंग करणेबाबत दिलेल्या सुचना व आदेशान्वये वानवडी पोलीस स्टेशनकडील घोरपडी बाजार मार्शल वरील पो.ना. शिरिष गोसावी व पो.अंमलदार गणेश खरात असे घोरपडी बाजार चौकी हद्दीतील डोबरवाडी भागात वाहनचोरीचे अनुषंघाने पेट्रोलिंग करीत असतांना त्यांना त्यांचे बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की एक संशयित इसम हा पुणे शहर परिसरांतून वाहन चोरी करुन ती वाहने पुण्याच्या बाहेर नेणार आहे . या मिळालेले माहितीवरुन वानवडी पोलीस स्टेशनकडील तपास पथकातील अमंलदार यांचेसह सदर भागांत सापळा रचून त्यास ताब्यांत घेणेत आलेले आहे .

१ ) दादा बाळु शिंदे वय ४२ वर्ष रा . गल्ली नंबर ८ बिराजदारनगर सुरक्षानगर समोर घर नं -१०९ हडपसर पुणे

यांस ताब्यात घेऊन अधिक चौकशी करता त्याने त्याचा साथीदार नामे बिभीशन जगताप रा . हडपसर याचेसह गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यांचा सहभाग गुन्हयात निष्पन्न झाल्याने त्यांस वानवडी पोलीस स्टेशन , गुन्हा रजि.नं .४४९ / २०२१ भा.दं.वि. कलम ३७९ , ३४ अटक करण्यात आलेले आहे .

अटक मुदतीत त्यांचेकडे तपास करता वरील आरोपी व त्याचा निष्पन्न व पाहिजे साथीदार नामे बिभीशन जगताप रा . हडपसर असे दोघांनी चोरी केलेली ३ वाहने व १० ग्रॅम सोने व ८,००० / – रोख रक्कम असा एकुण १,३३,००० / – रु.कि.चा मुद्देमाल जप्त केलेला आहे .

त्याचेकडून पुणे शहरातील वानवडी -०३ , हडपसर ०१ , चंदननगर -०१ असे चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत .

आरोपी १ ) दादा बाळु शिंदे वय ४२ वर्ष रा . गल्ली नंबर ८ बिराजदारनगर सुरक्षानगर समोर घर नं १०९ हडपसर पुणे व निष्पन्न व पाहिजे साथीदार नामे २ ) बिभीशन जगताप रा . हडपसर हे पुणे शहरातील वाहनचोरी , जबरीचोरी , घरफोडी , व इतर चोरी रेकॉर्डवरील आरोपी आहेत .

वरील प्रमाणेची कारवाई ही मा . श्री . नामदेव चव्हाण , अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग , मा . श्रीमती नम्रता पाटील , पोलीस उप – आयुक्त , परिमंडळ -५ , पुणे शहर , मा . श्री . राजेंद्र गलांडे , सहा . पोलीस आयुक्त , वानवडी विभाग , पुणे शहर यांचे सुचनेनुसार दिपक लगड वरिष्ठ पोलीस निरिक्षक , वानवडी पोलीस ठाणे पुणे शहर , सावळाराम साळगावकर पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) वानवडी पोलीस ठाणे पुणे शहर , यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहा.पो.निरी जयवंत जाधव , सहा . पो . फौजदार संतोष तानवडे पो.हवा . राजू रासगे , संजय बागल , विनोद भंडलकर , सर्फराज देशमुख , शिरिष गोसावी , पो . अंमलदार अमित चिव्हे , दीपक भोइर , गणेश खरात , निळकंठ राठोड , सिध्देश्वर कसबे म.पो.अं राणी खांदवे यांनी कामगिरी केलेली आहे .

ACS POLICE CRIME SQUAD

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *