बेकायदेशिर व्याजाने पैसे उकळणा – या सावकारावर युनिट ५ गुन्हे शाखेकडुन कारवाई.

ACS POLICE CRIME SQUAD

दिनांक २५/१२/२०२१ युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर बेकायदेशिर १२ टक्के व्याजाने पैसे उकळणा – या सावकारावर युनिट ५ गुन्हे शाखेकडुन कारवाई

दिनांक २३/१२/२१ रोजी फिर्यादी जुबेर मेमन वय ३२ वर्षे , रा . कोंढवा बु . पुणे यांनी अवैध्य रितीने सावकारी करणा – या आशिष संजय पाटणे , रा . येवलेवाडी , कोंढवा , पुणे याचे विरुध्द १२ टक्के दराने दमदाटी करुन व्याज घेतो याबाबतचा तक्रारी अर्ज गुन्हे शाखा येथे प्राप्त झाला होता . सदर अर्जाची सखोल चौकशी करुन येवलेवाडी येथिल आशिष पाटणे यास आज रोजी युनिट कडील अधिकारी व अंमलदार यांनी ताब्यात घेवुन त्याचेविरुध्द गुन्हा नोंद केला आहे . सदर फिर्यादीकडे चौकशी केली असता फिर्यादी याने आरोपीकडुन आठ लाख रुपये व्याजाने घेतले होते परंतु लॉकडाउनमुळे फिर्यादी हे वेळेवर व्याज देवु शकले नाही म्हणुन आरोपी हा फिर्यादीस शिवीगाळ व दमदाटी करु लागला सुमारे आठ लाख मुद्दलवर आरोपी याने हिशोब काढुन फिर्यादी यांना २२ लाख रुपये दयावे लागणार म्हणुन धमकी दिली होती . सदर अर्जा वरुन फिर्यादी नामे जुबेर मेमन याने सावकार नामे आशिष संजय पाटणे , रा . येवलेवाडी , कोंढवा , पुणे याचे विरुध्द फिर्याद दिल्याने भा.दं.वि. कलम ४५२,५०६ व महाराष्ट्र सावकारी अधिनियम कलम ३९ , ४५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे . .

सदरची कामगिरी मा.पोलीस आयुक्त श्री अमिताभ गुप्ता , मा . सह पोलीस आयुक्त डॉ . रविंद्र शिसवे , मा . अपर पोलीस आयुक्त , गुन्हे श्री रामनाथ पोकळे , मा . पोलीस उप आयुक्त श्री श्रीनिवास घाडगे , मा . सहायक पोलीस आयुक्त श्री लक्ष्मण बोराटे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री हेमंत पाटील , सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे , पोलीस अमंलदार दया शेगर , महेश वाघमारे , विशाल मिलारे , आश्रुबा मोराळे , पृथ्वीराज पांडोळे , दाऊद सय्यद , विनोद शिवले , विलास खंदारे , अजय गायकवाड , संजयकुमार दळवी , स्नेहल जाधव , स्वाती गावडे यांनी केलेली आहे .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामण तालीम( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *