अवैद्य रेशनिंग दुकानातील तांदूळाची वाहतूक करणाऱ्या तीन ट्रक व तांदूळ गुन्हे शाखा युनिट २ कडून केले जप्त.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
रेशनिंग दुकानातील अवैधरित्या ८०० क्विंटल तांदूळाची वाहतूक करणाऱ्या ३ ट्रक गुन्हे शाखा युनिट २ कडून जप्त,
रेशनिंग माफीयांमध्ये उडाली खळबळ.
ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.( ACS ) प्रतिनिधी पुणे,
नागरिकांच्या हक्काचे घास चोरून अवैध मार्गाने दुसऱ्या ठिकाणी पोहोचविणा-यांचे मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. तर ९७ लाख ४४ हजारांचा माल जप्त करण्यात आल्याने रेशनिंग खात्यातील अधिकाऱ्यांचे भुया उंचावले आहे.
आज रोजी युनिट २ कडील सपोनि वैशाली भोसले व स्टाफ युनिट २ कार्यक्षेत्रातील स्वारगेट हद्दीत पेट्रोलिंग फिरत असताना पोलिस अंमलदार गजानन सोनूने व कादीर शेख यांना बातमी मिळाली कीं 15 नंबर हडपसर येते
१) MH18 BA 7725 ,
२)MH18 BG 0053 ,
३ )MH18 BG 5859
अशा तीन ट्रक मध्ये रेशनिंगचा असलेला अन्नधान्य माल छुप्या पद्धतीने खुल्या बाजारात बेकायदेशीर रित्या विक्री करिता घेऊन खोपोली जि.रायगड येते जात आहेत.
११ फेब्रुवारी रोजी १५ नंबर हडपसर पुणे या ठिकाणी )
श्री कानकलक्ष्मी अग्रो ट्रेडर्स गुंज गांगवती जी कोपल राज्य कर्नाटक
2)जय आनंद फूड इंडस्ट्रीज खोपोली जीं रायगड
3)मुबारक ट्रास पोर्ट चे मालक यांनी संगनमत करून तांदूळ हे शासकीय धान्य कोठून तरी अव्येद्या रित्या प्राप्त करून घेऊन बेकायदेशीर रित्या पांढरा, पिवळ्या व लाल अशा वेगवेगळ्या रंगाचे पोलित्थिन पोत्यात भरून तशा जीएसटी नंबर च्या बनावट पावत्या तयार करून ती पोती वरील नमूद तीन ट्रक मध्ये भरून एकून ८०० क्विटल (८० टन) तांदूळ .
गुन्हे शाखा युनिट २ ने जप्त केलेल्या ट्रक
त्या ट्रक मध्ये एकून ८०० क्विटल तांदूळ असा ऐकून ९७ लाख ४४ हजार रूपयांचा मालाचा काळाबाजार करून तो विक्री करण्यासाठी पाठून शासनाची फसवणूक केली आहे.
सदरील प्रकरणा बाबतीत हडपसर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम ४२०,४०९,३४ व जिवना अत्यावशक वस्तू अधिनियम १९४४ चे कलम ३,७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास गुन्हे शाखा युनिट २ करीत आहेत. याबाबत अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता ते म्हणाले की सदरील धान्य हे आमचा शासकीय धान्य नसून पोलीस पुढील तपास करीत आहेत.
सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त श्री रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त गुन्हे श्री. श्रीनिवास घाडगे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री.गजानन टोम्पे वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि ,वैशाली भोसले,सपोफौ आंब्रे, पोलीस अंमलदार किशोर वग्गू, संजय जाधव ,मोहसीन शेख, साधना ताम्हाणे, उत्तम तारू , चंद्रकांत महाजन, गजानन सोनुने, समीर पटेल, कादिर शेख, निखिल जाधव, मितेश चोरमोले, नागनाथ राख यांनी केलेली आहे.
साधना ताम्हाणे, उत्तम तारू ,चंद्रकांत महाजन, गजानन सोनुने, समीर पटेल, कादिर शेख, निखिल जाधव, मितेश चोरमोले, नागनाथ राख यांनी केलेली आहे.
क्रांतीकुमार पाटील
वरिष्ठ पोलीस निरीक्षक,गुन्हे शाखा, युनिट २ पुणे शहर
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/
आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad
ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.९८२२३३१५२६.