गुन्हे शाखा अंतर्गत कारवाई विशेष मोहिम : हडपसर, कोंढवा, विमाननगर येथील अवैध दारू धंदे व हुक्का पार्लरवर कारवाई : ११ गुन्हे दाखल.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
विमाननगर कोंढवा व हडपसर भागात एकाचवेळी छापेमारी
दिनांक -२८/०८/२०२१ गुन्हे शाखा अंतर्गत कारवाई विशेष मोहिमे दरम्यान पुणे शहरातील अवैद्यरित्या दारु विक्रेत्यांवर गुन्हे शाखा , पुणे शहर पोलीसांनी केली कारवाई “
पुणे शहरामध्ये अवैध रित्या दारु व अंमली पदार्थांची विक्री होत आहे ” अशी माहिती मिळाली होती . मिळालेल्या बातमीनुसार दारु विक्री करणा – या इसमांवर कायदेशीर कारवाई करणेबाबत मा . पोलीस आयुक्त सो , पुणे शहर यांचेकडुन आदेश प्राप्त झाले होते.त्यानुसार
दि . २७.०८.२०२१ रोजी पोलीस उप आयुक्त , श्रीनिवास घाडगे गुन्हे शाखा पुणे शहर यांनी २ पोलीस निरीक्षक , २४ पोलीस उप निरीक्षक , पोलीस मुख्यालय तसेच गुन्हे शाखोकडील ३२ पोलीस अंमलदार यांच्या वेगवेगळ्या टिम तयार करुन पुणे शहर आयुक्तालयाचे हद्दीत एकाच वेळी विमानतळ , कोंढवा व हडपसर पोलीस ठाणे हद्दीत वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारले . पोलीसांनी कारवाई करीत अवैद्यरित्या दारु विक्री होत असलेले तसेच हुक्का पार्लर व अंमली पदार्थ विक्री करणा – या एकुण १२ ठिकाणांवर छापे मारुन संबंधीत पोलीस स्टेशनला ११ गुन्हे नोंद करुन एकुण २,०७,५७३ / – रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन त्यामध्ये एकुण १५ आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे .
सदरची कारवाई पुणे शहरचे मा.पोलीस आयुक्त श्री . अमिताभ गुप्ता , मा . सह पोलीस आयुक्त , डॉ . रविंद्र शिसवे , मा . पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री श्रिनिवास घाडगे , यांचे मार्गदर्शनाखाली २ पोलीस निरीक्षक , २४ पोलीस उप निरीक्षक व पोलीस मुख्यालय तसेच गुन्हे शाखेकडील ३२ पोलीस अंमलदार यांनी केली आहे .
ACS POLICE CRIME SQUAD
ONLINE PORTAL NEWS
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526