ट्राफिक हवालदार तुमच्या गाडीची चावी काढून घेऊ शकत नाही,

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

ट्राफिक हवालदार तुमच्या गाडीची चावी काढून घेऊ शकत नाही, तुम्हाला तक्रारीचा अधिकार, जाणून घ्या काय आहेत नियम.

रस्त्याने गाडी चालवताना अनेक वेळा तुम्ही हे पाहिलं असेल की, पोलिस वाहनांना थांबवतात आणि त्यांच्याकडे कागदपत्रांची मागणी करतात आणि तुमच्याकडे वाहनांशीसंबंधीत कागदपत्र नसेल, तर पोलिस तुमच्यावरती कारवाई करतात.

परंतु तुम्ही हे बऱ्याचदा पाहिले असेल की, पोलिस बाईक किंवा कारची चावी काढून घेतात किंवा गाडीच्या चाकामधील हवा काढतात. परंतु तुम्हाला हे माहित असणं गरजेचं आहे की, वाहतूक पोलिस चेकिंग करताना वाहनाची चावी काढून घेऊ शकत नाही. त्यांना हे करण्याचा कायद्याने अधिकार दिलेला नाही.

यासंदर्भात कायदा काय सांगतो जाणून घ्या.

अनेकदा वाहन प्रवासादरम्यान आपल्याकडून चुका होतात, चालकांकडून रहदारीच्या नियमांचे उल्लंघन होते. अशा वेळी वाहतूक पोलीस तुमच्याकडून चालान आकारू शकतात. मात्र ते तुमच्या गाडीची चावी काढून घेऊ शकत नाहीत किंवा तुमच्या गाडीच्या टायरची हवा काढू शकत नाहीत.

ट्राफिक हवालदार तुमच्या गाडीची चावी काढून घेऊ शकत नाही, तुम्हाला तक्रारीचा अधिकार, जाणून घ्या काय आहेत नियम.

वाहन जप्त करण्याचा अधिकारही हवालदाराला नसतो. मात्र, आपल्यापैकी अनेकांना याची माहिती नसते. आपली चूक आहे म्हटल्यावर चालक पोलिसांना घाबरतात. असे प्रसंग अनेकदा येऊ शकतात. मात्र अशा वेळी आपले म्हणजे नागरिकांचे हक्क देखील आपल्याला माहिती असायला हवेत. आज आम्ही याबद्दलच तुम्हाला माहिती देणार आहोत.

काय आहेत नियम?

मोटर वाहन कायद्यांतर्गत जसे वाहन चालकांसाठी नियम आहेत. तसेच नागरिक म्हणून आपले काही अधिकारही आहेत. भारतीय मोटार वाहन कायदा १९३२ अंतर्गत, केवळ एएसआय (असिस्टंट सब इन्स्पेक्टर) लेव्हलचा अधिकारीच रहदारीच्या उल्लंघनासाठी तुमचे चालान कापू शकतो. एएसआय, एसआय, इन्स्पेक्टर यांना स्पॉट फाइन करण्याचे अधिकार आहेत. त्यांना मदत करण्यासाठी वाहतूक हवालदारच असतात. कुणाच्याही गाडीच्या चाव्या काढण्याचा अधिकार त्यांना नाही. अनेकदा हवालदार गाडीच्या टायरमधली हवा काढून टाकतात. मात्र ही बाब गंभीर आहे. ट्राफिक पोलीस तुमच्या गाडीच्या टायरची हवा देखील काढू शकत नाहीत. ते तुमच्याशी चुकीच्या पद्धतीने बोलू शकत नाहीत किंवा वाईट वागू शकत नाहीत. ट्राफिक पोलीस तुम्हाला विनाकारण त्रास देत असतील तर तुम्ही त्यांच्यावरही कारवाई करू शकता.

अधिकाऱ्यांनी वाहतूक पोलिसाची बाजू घेतली तर काय करायचे?

यानंतरही पोलिस स्टेशन किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गैरवर्तन करणाऱ्या वाहतूक पोलिसाची बाजू घेतल्यास हे प्रकरण हायकोर्टात नेऊ शकता. जर तुम्ही दारिद्र्यरेषेखालील असाल आणि तुमच्याकडे बीपीएल कार्ड असेल, तर कायद्याचे जाणकार वकील तुम्हाला मोफत सल्ला देतील. त्यानंतर हायकोर्ट त्या वाहतूक पोलिसाला आणि त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समन्स काढेल.

या गोष्टींकडे लक्ष द्या.

तुमची चूक असेल तर तुम्ही देखील पोलिसांना सहकार्य करायला हवं. जी चूक केली असेल त्याबद्दलचा दंड भरायला हवा. तुमचे चालान कापण्यासाठी वाहतूक पोलिसांकडे चालान बुक किंवा ई-चलान मशीन असायला हवी. जर या दोन्हीपैकी एकही गोष्ट पोलिसाकडे नसेल तर ते तुमच्याकडून दंड वसूल करू शकत नाहीत. वाहतूक पोलीस त्यांच्या अधिकृत गणवेशात (युनिफॉर्म) असायला हवा. त्याच्या युनिफॉर्मवर बकल नंबर आणि त्याचं नाव असायला हवं. जर तो पोलीस गणवेशात नसेल तर तुम्ही त्याला त्याचं ओळखपत्र दाखवायला सांगू शकता.

ट्राफिक हेड कॉन्स्टेबल केवळ १०० रुपयांचा दंड आकारू शकतो.

वाहतूक पोलिसांचा हेड कॉन्स्टेबल तुमच्याकडून केवळ १०० रुपये इतकाच दंड आकारू शकतात. यापेक्षा जास्त दंड केवळ वाहतूक अधिकारी (ट्राफिक ऑफिसर) म्हणजेच एएसआय किंवा एसआय आकारू शकतात. म्हणजेच ते १०० रुपयांपेक्षा जास्त चालान लावू शकतात. ट्राफिक कॉन्स्टेबल जर तुमच्या गाडीची चावी काढून घेत असेल तर तुम्ही त्या घटनेचा व्हिडीओ बनवू शकता. हा व्हिडीओ तुम्ही त्या भागातील पोलीस ठाण्यात जाऊन वरिष्ठ अधिकाऱ्याला दाखवून तक्रार दाखल करू शकता. त्यामुळे अशा वेळी न घाबरता परिस्थिती शांतपणे हाताळायला हवी.

प्रवासादरम्यान पैसे नसतील तर न्यायालयात जाऊन दंड भरावा लागेल.

वाहन चालवताना तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स (चालक परवाना), प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची मूळ प्रत (पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेटची ओरिजिनल कॉपी) असायला हवी. तसेच वाहन नोंदणी (रजिस्ट्रेशन) आणि इन्शुरन्सची फोटोकॉपी देखील चालते. समजा तुमच्याकडून एखादी चूक झाली, किंवा तुम्ही रहदारीचा एखादा नियम मोडलात आणि चालान भरण्यासाठी तुमच्याकडे पैसे नसतील तर अशा परिस्थितीत न्यायालय चालान जारी करते, मात्र तुम्हाला ते न्यायालयात जाऊन भरावं लागेल. या काळात वाहतूक पोलीस अधिकारी तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स सोबत ठेवू शकतात. ते तुम्हाला चालान भरल्यानंतर मिळेल.

ट्राफिक पोलिसावर कारवाई होऊ शकते.

ट्राफिक पोलिसाने प्रवासादरम्यान तुमची गाडी अडवून गाडीची चावी काढून घेतली आणि तुम्ही त्याच्याविरोधात तक्रार केलीत तर त्याच्यावर कारवाई होऊ शकते. भारतीय मोटार वाहन कायदा १९८८ मध्ये पोलीस कर्मचाऱ्याला वाहन तपासणीदरम्यान वाहनाची चावी काढण्याचा अधिकार देण्यात आलेला नाही. मात्र पोलीस कर्मचार्‍याने तपासणी करताना वाहन चालक/मालकाला चालक परवाना म्हणजेच ड्रायव्हिंग लायसन्स दाखवायला सांगितलं तर तुम्हाला ते दाखवावं लागेल. तसेच वाहनाशी संबंधित कागदपत्रे दाखवावीत.

कायदा काय सांगतो?

मोटार वाहन कायदा, १९८८ च्या कलम ३, ४ अंतर्गत, सर्व चालकांकडे त्यांचा चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) असणे आवश्यक आहे. कलम १८३, १८४ आणि १८५ अंतर्गत वाहनाची वेगमर्यादा योग्य असणे आवश्यक आहे. तसेच तुम्ही मद्यपान करून वाहन चालवू शकत नाही. जर तुम्ही या चुका केल्यात तर वर दिलेल्या कलमांतर्गत तुमच्याकडून एक हजार रुपयांपासून ते दोन हजार रुपयंपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. त्यामुळे वाहन चालवताना तुम्ही स्वतः कोणतीही चूक करू नका, केलीत तर वाहतूक अधिकाऱ्याकडे दंड भरा आणि त्याची पावती घ्या. त्याचबरोबर तुमची काही नसेल तर घाबरू नका.

तपासणीच्या नावाखाली गुंडगिरी करता येणार नाही.

हे जाणून घ्या की मोटार वाहन कायदा २०१९ कोणत्याही वाहतूक पोलिसाला चेकिंगच्या नावाखाली गुन्हा करण्याचा अधिकार देत नाही. अधिकारी कितीही वरिष्ठ असला तरी तो तुमच्याशी गैरवर्तन करू शकत नाही आणि तुमच्या गाडीची चावी काढू शकत नाही.

विशेष म्हणजे, एका आरटीआयला उत्तर देताना हरियाणा पोलिसांनी म्हटले आहे की, वाहतूक पोलिस हाताचा इशारा देऊन तुमचे वाहन थांबवू शकतात परंतु ते तुमच्या गाडीच्या चावीला हात लावू शकत नाही. हे लक्षात घ्या की, तुमच्याकडे कोणतेही कागदपत्र नसले तर, पोलिस त्यासंदर्भात तुमच्यावरती दंड आकारु शकतात, तुमची गाडी थांबवू शकतात. परंतु तुमच्या गाडीला नुकसान पोहोचवू शकत नाही.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *