तडीपार गुन्हेगार हत्यारासह युनिट -१ , गुन्हे शाखा यांचेकडून जेरबंद ,
युनिट १ गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार ची कामगिरी .
दिनांक २५/१२/२०२१ युनिट १ , गुन्हे शाखा पुणे शहर तब्बल १६ गुन्हे दाखल असलेला पुणे शहर , पिंपरी चिंचवड तसेच पुणे जिल्ह्याचे हद्दीतुन २ वर्ष तडीपार गुन्हेगार हत्यारासह युनिट -१ , गुन्हे शाखा , पुणे शहर यांचेकडून जेरबंद .
दिनांक २४/१२/२०२१ रोजी युनिट १ कडिल पोलीस अधिकारी व अंमलदार पोलीस अभिलेखावरील तडीपार करण्यात आलेले गुन्हेगार शहरात हे गुन्हे करीत आहेत , तसेच जवळ शस्त्र बाळगुन गुन्हे करणारे गुन्हेगार यांनी गुन्हे करु नयेत त्यास प्रतिबंध करुन त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत पेट्रोलींग करीत असताना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की रेकॉर्डवरील तडीपार इसम
नामे आबिद बागवान हा राजिव गांधी सोसायटी काशेवाडी पुणे
येथे सार्वजनिक रोडवर थांबलेला असल्याची अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने त्याबाबत वरिष्ठांना माहिती देवून परवानगीने युनिट १ , गुन्हे शाखा , पुणे शहर पथकाकडील पोलीस उपनिरीक्षक सुनिल कुलकर्णी स्टाफसह बातमीप्रमाणे जावुन नमुद आरोपीस पकडून त्यास त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव आबिद आलीम बागवान वय २७ वर्षे रा . ८३० भवानी पेठ पुणे
असे असल्याचे सांगितले व तो स्वतः तडीपार असल्याचे सांगितले . त्यास पुणे येथे येण्यासाठी कोणाची परवानगी घेतली काय ? याबाबत विचारणा करता त्याने कोणाचीही परवानगी घेतली नसल्याचे सांगितले . तसेच त्याची स्टाफचे मदतीने पंचासमक्ष झडती घेतली असता १ रॅम्बो चाकु मिळुन आल्याने सदरचा १,००० / – रु किमतीचा माल पंचा समक्ष जप्त करुन त्याचेविरुध्द खडक पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर ४६२ / २०२१ आर्म अॅक्ट क ४ ( २५ ) व महा.पो.अधि . क ३७ ( १ ) सह १३५ १४२ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आले असुन सदर आरोपीस पुढील कारवाई कामी खडक पोलीस स्टेशन यांचे ताब्यात देण्यात आले आहे . सदर आरोपीवर मारामारी घरफोडी , चोरी असे एकुण १६ गुन्हे खडक समर्थ , स्वारगेट पोलीस स्टेशन येथे दाखल आहेत .
सदरची कामगिरी मा.पोलीस आयुक्त पुणे शहर , श्री अमिताभ गुप्ता , मा.पोलीस सह आयुक्त डॉ . रविंद्र शिसवे , मा . अपर पोलीस आयुक्त , गुन्हे पुणे श्री रामनाथ पोकळे , मा.पोलीस उपायुक्त गुन्हे पुणे श्री श्रीनिवास घाडगे , मा . सहा . पोलीस आयुक्त गुन्हे -१ पुणे श्री गजानन टोम्प यांचे मार्गदशनाखाली युनिट -१ , गुन्हे शाखा , पुणे शहरचे पोलीस निरीक्षक श्री शैलेश संखे , पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड , सुनिल कुलकर्णी पोलीस अंमलदार अमोल पवार , इम्रान शेख अय्याज दड्डीकर , तुषार माळवदकर , महेश बामगुडे यांनी केली आहे .
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.
फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/
आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad