उत्तम नगर पोलिस स्टेशन की कामगिरी

ACS POLICE CRIME SQUAD

CRIME REPORTER RAEES KHAN

दिनांक – २४/०७/२०२१ पी.सी.बी. गुन्हे शाखे अंतर्गत कारवाई उत्तमनगर पो.स्टे . परिसरात दहशत पसरविणा – या अट्टल गुन्हेगारावर मा.पोलीस आयुक्त यांची एम.पी.डी.ए. कायदयान्वये स्थानबध्दतेची कारवाई मा.पोलीस आयुक्त , पुणे शहर ,

ONLINE PORTAL NEWS

श्री.अमिताभ गुप्ता यांनी पोलीस आयुक्त , पुणे शहर म्हणून पदभार स्विकारल्यानंतर शहरातील पुणे शहरातील टोळी गुन्हेगार , बेकायदेशिर धंदे करणारे , अंमली पदार्थ विक्रीचे रॅकेट चालविणारे , तसेच शरीर व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारे व लोकांमध्ये दहशत करणारे सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाई करुन त्यांचे समूळ उच्चाटन करणे तसेच पुणे शहर व पुणे जिल्हयातील रेकॉर्डवरील पाहिजे व फरार आरोपींचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश सर्व पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना दिलेले आहेत . उत्तमनगर पो . स्टे . हद्दीत राहणारा गुन्हेगार इसम नामे- दिनेश किसन वाजळे वय २१ वर्षे.रा . मराठी शाळे शेजारी , न्यु कोपरे गाव.ता हवेली , जि.पुणे . हा अभिलेखावरील सराईत गुन्हे करणारा गुन्हेगार आहे . त्याने त्याचे साथीदारांसह वारजे माळवाडी व उत्तमनगर पोलीस ठाणे , पुणे . हद्दीमध्ये कोयता , सुरा या सारख्या जीवघेणी हत्यारे बाळगुन खुनाचा प्रयत्न , जबरी दुखापत , दुखापत , बेकायदेशीर हत्यार बाळगणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत . मागील ०६ वर्षामध्ये . त्याचेविरूध्द ०८ गुन्हे दाखल आहेत . तो बालअपचारी असल्या पासुन त्यांचे विरुध्द ०५ गुन्हे दाखल आहेत . त्याचा गुन्हेगारी कृत्यांमुळे सदर परीसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झालेली होती . तसेच त्याच्यापासून जिवीताचे व मालमत्तेचे नुकसान होईल या भितीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करणेस धजावत नव्हते . वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती.वैशाली चांदगुडे , नेमणूक उत्तमनगर पो . स्टे . पुणे शहर . यांनी एमपीडीए कायदयान्वये नमुद इसमास स्थानबध्द करण्याकामी प्रस्ताव तयार करुन मा.पोलीस आयुक्त , पुणे शहर . यांचेकडे सादर केला होता . श्री अमिताभ गुप्ता , पोलीस आयुक्त , पुणे शहर . यांनी प्रस्तावाची पडताळणी करुन नमुद इसमाचे विरुध्द दि .२० / ०७ / २०२१ रोजी एमपीडीए कायदयान्वये एक वर्षाकरीता स्थानबध्दचे आदेश पारीत केले आहे . श्री.अमिताभ गुप्ता , पोलीस आयुक्त , पुणे शहर यांनी सक्रिय व दहशत निर्माण करणा – या अट्टल गुन्हेगारांवर कडक प्रतिबंधक कारवाई करण्याचे धोरण अवलंबिले आहे.त्यानुसार मागील १० महिन्याच्या कालावधी मध्ये ३१ गुन्हेगारांना एमपीडीए कायदयान्वये स्थानबध्द केले आहे . यापुढेही सराईत व अट्टल गुन्हेगारांचे कृत्यांना आळा घालण्यासाठी या प्रमाणे कारवाई करण्याचे ठरविले आहे ,

ACS POLICE CRIME SQUAD

ONLINE PORTAL NEWS

CRIME REPORTER RAEES KHAN

9881888008

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *