गारवा हॉटेलचे मालक रामदास आखाडे यांचे खुनाचे मुख्य मारेकर – यासह इतर ८ आरोपींना अटक

ACS POLICE CRIME SQUAD

ONLINE PORTAL NEWS

दिनांक -२५/०७/२०२१ लोणी काळभोर पोलीस स्टेशन , पुणे शहर सुप्रसिध्द गारवा हॉटेलचे मालक रामदास आखाडे यांचे खुनाचे मुख्य मारेकर – यासह इतर ८ आरोपींना अटक लोणीकाळभोर पोलीस स्टेशन हददीत

CRIME REPORTER RAEES KHAN

दि.१८-०७-२०२१ रोजी राञो . ०८ / ४५ वा.चे सुा उरुळीकांचन येथील प्रसध्दि गारवा हॉटेलचे मालक रामदास रघुनाथ आखाडे , रा . जावजीबुवाची वाडी , ता . दौंड , जिह . पुणे हे त्यांचे गारवा हॉटेल येथे असताना दोन अनोळखी इसमांनी मोटारसायकलवरुन येऊन त्यातील एकाने रामदास आखाडे यांचे डोक्यात , हातावर , पायावर त्याचेकडील तलवारीने वार करुन गंभीर जखमी केले होते . तसेच मारेक – यास अडविण्यासाठी आलेल्या लोकांना देखील मारेकरी याने त्याचे हातातील तलवार हवेत फिरवुन दहशत माजवुन पसार झाले होते . जखमी रामदास रघुनाथ आखाडे यांचेवर उपचार चालु असताना ते दिनांक २०/०७/२०२१ रोजी मयत झाले असुन सदर बाबत लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि . नं . ३८१/२०२१ भा . दं . वि . क . ३०२,३४,१२० ब , आर्म अॅक्ट ४ ( २५ ) , क्रिमीनल लॉ . अमेंटमेंट ३,५,७ म . पो . अ . क . ३७ , ( १ ) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल आहे . वरीलप्रमाणे दाखल गुन्हयात आरोपीबाबत कोणताही सबळ पुरावा अथवा माहिती उपलब्ध नसताना मा . नम्रता पाटील मॅडम , पोलीस उप – आयुक्त परि .०५ , पुणे शहर , मा . कल्याणराव विधाते , सहा . पोलीस आयुक्त हडपसर विभाग , पुणे शहर यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे वपोनि / राजेन्द्र मोकाशी यांनी तपास पथकास आरोपी शोध बाबत आदेश देऊन त्याप्रमाणे तपास पथकातील पोहवा / नितीन गायकवाड , पोना / अमित साळुखे , पोकॉ / निखील पवार , यांना सदर गुन्हयात आशोका हॉटेलचे मालक बाळासाहेब जयवंत खेडेकर , यांचा भाचा सौरभ ऊर्फ चिम्या याचा सहभाग असल्याचे गुप्त माहिती मिळाल्याने तपास पथकाने सौरभ ऊर्फ चिम्या यास ताब्यात घेऊन कौशल्याने तपास केला असता सौरभ ऊर्फ चिम्या याने बाळासाहेब जयवंत खेडेकर व त्यांचा मुलगा निखील याचे सांगण्यावरुन अक्षय अविनाश दाभाडे , करन विजय खडसे , प्रथमेश राजेन्द्र कोलते , गणेश मधुकर माने , निखील मंगेश चौधरी , निलेश आरते व एक विधीसंघर्षग्रस्त बालक यांचेसह रामदास आखाडे यांचे खुनाचा कट रचुन त्याप्रमाणे निलेश आरते व एक विधीसंघर्षग्रस्त बालक यांनी दिनांक १८/०७/२०२१ रोजी गारवा हॉटेलचे मालक रामदास आखाडे यांचेवर तलवारीने प्राणघातक हल्ला केला असल्याचे सांगीतले . त्याप्रमाणे लोणीकाळभोर पोलीसांनी यापुर्वी आशोका हॉटेलचे मालक बाळासाहेब जयवंत खेडेकर यांचा मुलगा निखील , अक्षय अविनाश दाभाडे , करन विजय खडसे , प्रथमेश राजेन्द्र कोलते , गणेश मधुकर माने , निखील मंगेश चौधरी यांना अटक केली असुन तपासादरम्यान यातील आरोपी बाळासाहेब जयवंत खेडेकर यांनी त्यांचे मालकीचे आशोका हॉटेलचा व्यवसाय वाढविण्याचे उद्देशाने तसेच हॉटेल व्यवसायातील स्पर्धेतुन त्यांचा भाचा सौरभ ऊर्फ चिम्या व इतर यांना दररोज एक ते दोन हजार देण्याचे सांगुन सदरचा खुन घडवुन आणल्याचे निष्पन्न झाले आहे .

यातील आरोपी नामे निलेश आरते हा सराईत गुन्हेगार असुन तो व एक विधीसंघर्षग्रस्त बालक हे गुन्हा करुन पसार झाले होते . त्यांचा शोध घेऊनही त्यांचे बाबत काही एक माहिती मिळत नसल्याने व . पो . नि . राजेन्द्र मोकाशी यांनी तपास पथकातील सपोनि / राजु महानोर , पोसई / अमित गोरे , व पोलीस अंमलदार यांना गुन्हयातील आरोपी यांचा शोध घेण्याबाबत मार्गदर्शन करुन सुचना वजा आदेश देऊन दोन वेगवेगळ्या टिम आरोपी शोध कामी तयार केल्या त्या प्रमाणे सदर टिमने सिसिटीव्ही फुटेज तपासणी तसेच तांत्रीक विश्लेषणाचे आधारे सलग सात दिवस सतत तपास करुन आरोपी यांचा पुणे अहमदनगर , बार्शी , सोलापुर लातुर उस्मानाबाद जिल्हयात शोध घेत असताना यातील आरोपी हे लातुर जिल्हयातील गांधी चौक येथे गेले असल्याचे माहिती तपास पथकास मिळाली बातमी प्रमाणे तपास पथकाने दिनांक २४/०७/२०२१ रोजी गांधी चौक लातुर येथे जाऊन सापळा रचला असता तेथे मिळाल्या बातमी प्रमाणे दोन संशयीत दिसुन आले . परंतु त्यांना पोलीसांची चाहुल लागल्याने ते तेथुन अंधाराचा फायदा घेऊन त्यांचेकडील मोटारसायकलवरुन पळुन जाऊ लागले असता तपास पथकाने त्यांचा सुमारे १० ते १२ कि . मी . थरारकपणे पाठलाग करुन शिताफीने निलेश मधुकर आरते वय २३ वर्षे , रा . तुकाई दर्शन , हडपसर , पुणे व आणखी एक विधीसंघर्षग्रस्त बालक यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन येथे आणुन चौकशी करता त्यांचा दाखल गुन्हयातील सहभाग निष्पन्न झाला आहे . यातील आरोपी निलेश आरते हा हडपसर पोलीस स्टेशन येथुन पुणे शहर व पुणे जिल्हा हद्दीतुन दोन वर्षाकरीता तडीपार आहे . सदर गुन्हयात एकुन आरोपींना अटक करण्यात आली असुन पुढील तपास सुभाष काळे पोनि ( गुन्हे ) हे करीत आहेत ,

सदर उल्लेखनिय कामगिरी मा . श्री . नामदेव चव्हाण , अपर पोलीस आयुक्त , पुर्व प्रादेशीक विभाग , पुणे शहर , मा . पाटील , पोलीस उप – आयुक्त परिमंडळ -०५ , मा , कल्याणराव विधाते , स . पो . आ . हडपसर विभाग , श्री . राजेन्द्र मोकाशी , वपोनि , सुभाष काळे पोनि ( गुन्हे ) , यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि / राजु महानोर , सपोनि / दादाराजे पवार , पोसई / अमित गोरे , पोहवा / नितीन गायकवाड , गणेश सातपुते , राजु पुणेकर , पोना / अमित साळुखे , श्रीनाथ जाधव , सुनिल नागलोत , संतोष अंदुरे , संदीप धनवटे , सतीश सायकर , पोकॉ / बाजीराव वीर , निखील पवार , गणेश भापकर , शैलेश कुदळे , राजेश दराडे , दिगंबर सालुंके यांचे पथकाने केली आहे .

ACS POLICE CRIME SQUAD

ONLINE PORTAL NEWS

CRIME REPORTER RAEES KHAN

9881888008

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *