जमिनीसाठी सावत्र भावाचा लोखंडी रॉड डोक्यात घालुन खून संघर्षित युवकास अटक विमानतळ पोलिसांची कामगिरी.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

विमानतळ पोलिसांनी एका विधी संघर्षित आरोपीस परराज्यात पोबारा करण्या अगोदरच ताब्यात घेण्यात यश मिळवले आहे.

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

जमिनीचे वादातुन सावत्र भावाचा लोखंडी रॉड डोक्यात घालुन खुन

जमिनीच्या वादातून सावत्र भावाचा लोखंडी रॉड डोक्यात घालून हत्या केल्याची घटना विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे,
सिताराम कांदन हेंबरम, वय २३ वर्षे, रा. बँक ऑफ बडोदाचे मागे, साठेवस्ती लोहगांव पुणे मुळ गाव मु.पो. लांबनिया, बंगिरीपोसी, जिल्हा मयुरबंज, ओरीसा राज्य असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे
तर त्याचा सावत्र भाऊ विधी संघर्ष बालक आहे, त्यास विमानतळ पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्याचा सावत्र भाऊ याने त्यांचे मुळगाव राज्य ओरीसा येथील जमिनीचे वादातुन जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने लोखंडी रॉडने मारहान केली,होती, लोखंडी रॉडचा इतका जबरदस्त फटका होता जागीच मृत झाला पोलिसांनी प्रथम त्याला स्थानिक साई श्रध्दा हॉस्पीटल येथे दाखल केले परंतु रक्तस्त्राव जादा झाल्याने पुढील उपचार साठी त्यास ससुन हॉस्पीटल पुणे येथे पाठविले असता तेथील डॉक्टरांनी त्यास तपासून उपचारपूर्वी २२:३३ वा मयत घोषीत केले. सदर बाबत विमानतळ पोलीस स्टेशन पुणे येथे भा.द.वि कलम ३०७,३०२ प्रमाणे अपराध नोंद करण्यात आला आहे.

तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार दाखल अपराधामधील विधी संघर्षीत बालकाचा शोध घेत असताना त्यांना गोपनिय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, सदर विधी संघर्षीत बालक हा त्याचे मुळगावी ओरीसा राज्य येथे निघुन जात असल्याची माहिती मिळाल्याने त्यांनी सदरची माहिती मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विलास सोंडे यांना सांगुन लागलीच लोहगाव बस स्टॉप येथे पोहचुन त्यास सतर्कपणे ताब्यात घेऊन विमानतळ पोलीस स्टेशन येथे आणुन त्याचेकडे तपास करता त्यांने अपराधाची कबुली दिल्याने त्यास दाखल अपराधामध्ये ताब्यात घेण्यात आलेले आहे. अपराधाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक एस. पी. निगुडकर हे करीत आहेत.

सदरची कारवाई ही मा. श्री. अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. श्री. संदिप कर्णिक, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, मा. श्री. नामदेव चव्हाण, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, मा. श्री. रोहीदास पवार, पोलीस उपायुक्त परि०४ पुणे शहर, श्री किशोर जाधव सहा पोलीस आयुक्त, येरवडा विभाग पुणे शहर यांचे आदेशान्वये श्री विलास सोंडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विमानतळ पोलीस स्टेशन पुणे शहर, श्री मंगेश जगताप पोलीस निरीक्षक (गुन्हे) विमानतळ पोलीस स्टेशन पुणे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि एस. पी. निगुडकर, तपास पथकाचे पोउनि रविंद्र ढावरे, अविनाश शेवाळे, किरण खुडे, उमेश धेंडे, अंकुश जोगदंडे, रिहान पठाण, रुपेश पिसाळ, सचिन जाधव, सचिन कदम, गिरीष नानेकर, सचिन डावखर, सचिन जगदाळे, रुपेश तोडेकर, शेखर वाघोले, नाना कर्चे, संजय आसवले, योगेश थोपटे यांचे पथकाने केली आहे.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *