राजेश पुराणिक यांच्या कारवाईला ब्रेक लावण्यासाठी,गुन्हेगारांकडून नाहक बदनामीचे षडयंत्र.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

सामाजिक सुरक्षा विभागाचे राजेश पुराणिक यांच्या कारवाईला ब्रेक लावण्यासाठी,
समदुःखी पोलीस व गुन्हेगारांकडून नाहक बदनामीचे षडयंत्र.

सामाजिक सुरक्षेतील पोलीसांच्या अंगावर बिअर आणि सोडा वॉटरच्या बाटल्या फेकल्या तेंव्हा कुठे होता मानवी हक्क…


१) जुगार चालवणारे- जुगार खेळणारे दोघेही दोषीच….
२) नागरिकांच्या मनात पोलिसांविषयी कृतज्ञतेची भावना, गुन्हेगारांच्या मनात पोलिसांविषयी भीती असण्याची आवश्यकता
.
३) जुगार अड्डा- ड्रग्ज- वेश्याव्यवसाय चालविणाऱ्यांवर थर्ड डिग्री हवीच,
४)३२ पोलीस स्टेशन दीड डझन गुन्हे शाखेतील २५० वरीष्ठ पोलीस अधिकारी असतांना त्यांनी कारवाई का केली नाही.


५)सामाजिक सुरक्षा विभागातील पोलीसांच्या अंगावर बिअर आणि सोडा वॉटरच्या बाटल्या टाकल्या त्यावेळी निषेध करायला पुढे कुणी का आले नाही….

६) स्थानिक पोलीसांनी बघ्याची भूमिका का घेतली….
७) मसाज पार्लर आणि स्पाच्या नावाखाली सुरू असलेला वेश्याव्यवसाय, ऑनलाईन लॉटरी, जुगार अड्डे यामुळे समाजव्यवस्था कोलमडून पडत असतांना, स्थानिक पोलीसांसह खाजगी वृत्तवाहिन्या गप्प का….

प्रतिनिधी/ ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.९८२२३३१५२६
पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील सामाजिक सुरक्षा विभागाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक यांनी पदभार स्वीकारल्यापासून अवघ्या साडेपाच महिन्यात ३२ पोलीस स्टेशनच्या हद्दीत जुगार अड्डा- ड्रग्ज- वेश्याव्यवसाय चालविणाऱ्यांवर ५८ जबरी कारवाया करून ६०० पेक्षा अधिक गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली आहे.

कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल जप्त करून रोख रकमा शासन जमा केल्या असल्यानेच, दुखावलेल्या समदुःखी पोलीस आणि गुन्हेगारांनी एकत्र आघाडी करून, सामाजिक सुरक्षा विभागाचे राजेश पुराणिक यांच्या बदनामीचे षडयंत्र रचले असल्याचे आज पुण्यात दिसून आले आहे.

एका जुगार अड्डयावर लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करून गुन्हेगारांना मेडिकलला पाठवितांनाचा कुठला तरी जुना व्हिडीओ व्हायरल करण्यात आलेला आहे. तथापी स्थानिक पुणेकर राजेश पुराणिक यांच्या पाठीशी ठामपणे उभे असुन गुन्हेगारांवर थर्ड डिग्रीचा अवलंब केलाच पाहिजे अशी देखील प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
आज शिवाजीनगर न्यायालय येथे गुन्हेविषयक बातमीच्या अनुषंगाने आलो असता, काही नागरीक व वकीलांनी त्यांच्या प्रतिक्रीया दिल्या आहेत.

शिवाजीनगर न्यायालयाजवळील नागरीकांच्या प्रतिक्रिया –
श्री. राजेश पुराणिक यांच्या विरूद्ध प्रसारित व्हिडीओबात शिवाजीगनर न्यायालयाजवळ असतांना गेट क्र. ४ जवळ नागरीकांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या त्या अशा आहेत,
पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रिय स्तरावर सुमारे ३२ पोलीस स्टेशन आणि एक ते दीड डझन गुन्हे शाखेच्या युनिट कार्यरत आहेत. यामध्ये सुमारे २५० पेक्षा अधिक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी कार्यरत आहेत. एवढा मोठा पोलीस फौजफाटा असतांना देखील, पुणे शहरात जुगार अड्डे, वेश्याव्यवसाय, गांजा, मेफेड्रॉन सारखे अंमली पदार्थ, हुक्का पार्लरच्या नावाखाली सुरू असलेला दिवस-रात्रौ हैदोस, या सर्व पार्श्वभूमिवर पुणे शहरात वाढत असणारी गुन्हेगारी व गुन्हेगारी टोळ्यांचे वर्चस्व. यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभिर प्रश्न निर्माण झाला आहे.


याच वेळी पुणे शहर पोलीस दलात राजेश पुराणिक नावाचे धाडसी अधिकारी पुढे येवून या सर्व प्रस्थापित यंत्रणेविरूद्ध दंड थोपटून उभे राहतात आणि धडाधड कारवाई करून, गुन्हेगारांना जेरबंद केले जाते. अशा वेळी दुखावलेली गुन्हेगारी आणि दुखावलेली पोलीस यंत्रणा त्या धाडसी पोलीस अधिकाऱ्याच्या पाठीशी उभे न राहता, राजेश पुराणिक यांचे काहीतरी हाती लागावे म्हणून धडपडत असतात. त्यातच जुन्या कारवाईचा जुनाच व्हिडीओ व्हायरल करून त्यांच्या विरूद्ध मिडीयात बातमी देवून त्यांची बदनामी करण्याचा प्रकार आज पुणे शहरात दिसून आला आहे.

शिवाजीनगर न्यायालयाजवळील वकीलांच्या प्रतिक्रिया –
पुण्यात दिवसेंदिवस जुगार अड्डा चालवणाऱ्यांची संख्या वाढली असून जुगार खेळणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. संपूर्ण पुणे शहर जुगार अड्डा बनत चालला आहे. अशा परिस्थितीत पोलिसांनी पुढे येऊन कायदेशीर मार्गाचा अवलंब करून पुणे शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याकरिता, गुन्हेगारांसह जुगार अड्डे, वेश्याव्यवसाय चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे आवश्यक व अपेक्षित आहे. वेळप्रसंगी राजकीय दबाव, वरिष्ठ अधिकारी काय म्हणतील, याचा किंचितही विचार न करता, गुन्हेगारांवर कठोर शासन करण्याच्या उद्देशाने प्रसंगी पोलिसी भाषेत थर्ड डिग्रीचा अवलंब करून नागरिकांची सुरक्षितता अबाधित ठेवली पाहिजे.
कायद्याद्वारा स्थापित, कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने कायद्यात ज्या तरतुदी आहेत त्यांचा अवलंब करून गुन्हेगारांवर कठोर शासन झाले पाहिजे. अन्यथा पुणे शहराचे कायदा आणि सुव्यवस्था मोडकळीस येऊन पुण्याचा युपी- बिहार होण्यास वेळ लागणार नाही. प्रसंगी कायद्याच्या दृष्टीने अलर्ट होऊन गुन्हेगारांवर कुठल्याही प्रकारची दया-माया न दाखवता, कुठल्याही प्रकारचा राजकीय दबाव न मानता, गुन्हेगारांवर कारवाई होणे आवश्यक आहे.


श्री राजेश पुरानिक यांच्या कठोर कारवाईमुळे पुणे शहरातील अनेक बेकायदा स्वरूपाचे अवैद्य धंदे बंद झाले आहेत. अवैधपणे हातभट्टी, विदेशी दारू विक्री करण्यास कारवाई केल्यामुळे तसेच गांजा, मेफेड्रोन यासारखे अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई केल्यामुळे पुणे शहरातून सर्व अवैद्य धंदे बंद झाले आहेत, होत आहेत. पोलिसांनी स्थानिक परिस्थितीचा विचार करता, गुन्हेगारांवर कठोरातील कठोर कारवाई करणे आवश्यक आहे.

अशी प्रतिक्रीया व्यक्त केली आहे.

(क्रमशः)

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *